*देवणी येथील खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला अटक. स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे देवणीची संयुक्त कारवाई.*


 *देवणी येथील खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला अटक. स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे देवणीची संयुक्त कारवाई.*

   देवणी - ठाणे देवणी हद्दीत शिवपार्वती लॉज येथे दिनांक 26 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर च्या मध्यरात्री कोणीतरी अज्ञात आरोपीने अशोक मन्मथप्पा लुल्ले, वय 64 वर्ष, राहणार देवणी यांचा कोणीतरी अज्ञात आरोपीने निघृण खून केला होता. त्यावरून अज्ञात आरोपीविरुद्ध पोलीस ठाणे देवणी येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 284/ 2023 कलम 302, 201 भादवी प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
                 सदरच खुनाचा उलघडा व खुनातील आरोपीचा शोध घेण्याकरिता पोलीस अधीक्षक श्री.सोमय मुंडे यांनी मार्गदर्शन व सूचना केल्या होत्या. त्याअनुषंगाने पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी (निलंगा) डॉ.नितीन कटेकर यांचे मार्गदर्शनात व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले तसेच पोलिस ठाणे देवणी चे पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे यांचे नेतृत्वात चार पथके तयार करून खुनाच्या कारणांचा व अज्ञात मारेकरीचा विविध मार्गाने शोध घेऊन तपास करण्यात येत होता. 
                 नमूद पथकाने विविध मार्गाने चौकशी करून मिळालेल्या माहितीचे बारकाईने अभ्यास व विश्लेषण करून सदर खुणाच्या गुन्हयातील आरोपी हा लातूर येथील खंडापूर येथे राहणारा सचिन नारायण पाटील हा असुन त्यांनेच सदरचा खून केल्याचे निष्पन्न केले.
             अशोक मन्मथप्पा लुल्ले यांचा खून केल्यानंतर आरोपी सचिन नारायण पाटील फरार होऊन सतत राहण्याचे ठिकाण बदलत होता. ‌सदर आरोपीच्या मागावर असलेल्या पोलीस पथकांनी सचिन पाटील यांने वास्तव्य केलेल्या विविध ठिकाणी भेटी देऊन बातमीदार तयार केले होते. तसेच सदर पथका कडून पुणे, पनवेल, मुंबई, दौंड, कुर्डूवाडी येथे जाऊन शोध घेण्यात येत होता. दरम्यान बातमीदाराकडून मिळाले मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून फरार आरोपी नामे 

1) सचिन नारायण पाटील, राहणार खंडापूर, तालुका लातूर जिल्हा लातूर.
             हा नांदेड शहरात स्वतःचे अस्तित्व लपवून फिरत असल्याचे पथकाला समजले. त्यावरून दिनांक 03/10/2023 रोजी पोलीस ठाणे देवणी चे पथक नांदेड येथे पोहोचून नमूद आरोपी सचिन पाटील यास ताब्यात घेऊन पोलीस देवनी येथे आणण्यात आले. त्याच्याकडे नमूद गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्याने उधारीवर पैसे देण्या घेण्याच्या कारणावरून भांडण होऊन अशोक मन्मथप्पा लुल्ले यांना मारहाण करून खून केल्याचे कबूल केले. त्यावरून पोलीस ठाणे देवणी येथे दाखल असलेल्या गुन्हायात गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.
             गुन्ह्याचा पुढील तपास देवणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे हे करीत आहेत.
                    सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे, अपर पोलिस अधीक्षक डॉ.अजय देवरे,उपविभागीय पोलीस अधिकारी निलंगा डॉ. नितीन कटेकर यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले, देवणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवप्रसाद कत्ते, पोलीस अमलदार गुनाले, आगलावे, उस्तुर्गे ,कांबळे, बुजारे, डोईजोडे, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण राठोड, पोलीस अमलदार माधव बिल्लापट्टे, नवनाथ हासबे, राजेश कंचे, जमीर शेख, राजू मस्के, नकुल पाटील, सायबर सेल, लातूर येथील पोलीस निरीक्षक अशोक बेले, पोलीस अमलदार गणेश साठे, शैलेश सुडे यांनी केली आहे.

टिप्पण्या