*ब्लू बेल्स शाळेचा अविर पाटील राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत भारतात पहिला*

*ब्लू बेल्स शाळेचा अविर पाटील राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत भारतात पहिला*
----------------------------------------
नायगाव / प्रतिनिधी : आज हैदराबाद येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय अबॅकस प्रतियोगितेमध्ये *अविर पाटील यांने भारतात पहिला क्रमांक पटकावला.*                          
    ब्लू बेल्स शाळेत शैक्षणिक वर्षे 2023- 24 मध्ये इयत्ता पाचवी ते सातवीच्या सर्व विद्यार्थ्यांना अबॅकस घेण्यात आले होते. अबॅकसमुळे विदयार्थी कमी वेळात जास्तीत जास्त गणित सोडवितो. गणिताबद्दल ओढ निर्माण होते.यात त्यांनी आपले कौशल्य दाखविले.                                                                     
शाळा स्तरावर अबॅकसचा सराव घेऊन काही निवडक विद्यार्थ्यांची जिल्हास्तरासाठी निवड करण्यात आली होती. नांदेड येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत शाळेच्या विद्यार्थ्यांनी पहिला, दुसरा क्रमांक पटकावला होता. यातूनच राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेसाठी आर्जुन राठोड, शौर्य कवटीकवार, अवीर पाटील, विश्वजित गायकवाड व शिवम या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. ती राज्यस्तरीय स्पर्धा हैदराबाद येथे घेण्यात आली होती. त्या स्पर्धेतही शाळेच्या विद्यार्थ्यांनी पहिला, दुसरा क्रमांक पटकावला व राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेसाठी पात्र ठरले होते, त्यात अविर पाटील, , शौर्य कवटीकवार आणि आर्जुन राठोड या तीन विद्यार्थ्यांची निवड झाली होती.        
    आज हैद्राबाद येथे झालेल्या *राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत अविर पाटील यांनी भारतातून पहिला क्रमांक पटकावला व त्याची निवड आंतरराष्ट्रीय स्तरावरील अबॅकस स्पर्धेसाठी झाली आहे.*                     
    या विद्यार्थ्यांना सौ.सुनंदा मामीडवार, सिद्धार्थ गायकवाड, स्वप्निल सब्बनवार, नागेश घंटे, तानाजी सर या शिक्षकांनी मार्गदर्शन केले होते. या यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे                           
 *संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.के. हरीबाबू, सल्लागार डॉ. साई दीप्ती कोप्पोलू, डॉ. गड्डमवार, डॉ गायकवाड, गोविंद पवार, पर्यवेक्षक दत्ता कंदुर्के, विलास कानगुले, गंगाधर कानगुले, राजू गडगेकर, लक्ष्मण पिटलेवाड, इरबा शेळके,सौ.वर्षा मॅडम सौ.संगिता मॅडम व सर्व शिक्षकवृंद यांनी अभिनंदन केले आहे.*

टिप्पण्या