मुख्य सामग्रीवर वगळा

नगर परिषद उदगीर प्रभाग क्रमांक 16 मधील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार सामान्यांच्या संवेदनेशी नाळ असणारा तरुण नेता - चंदन पाटील नागराळकर

नगर परिषद उदगीर प्रभाग क्रमांक 16 मधील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार 
सामान्यांच्या संवेदनेशी नाळ असणारा तरुण नेता - चंदन पाटील नागराळकर

या देशाचे अन मातीचे
 ऋण कधीही ना विसरू
 जिने आमुचे पोषण केले 
तिची सदैव सेवा करू

 आपण समाजाचे ,देशाचे काही देणे लागतो, सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या, अडचणीत त्यांच्या मदतीला धावून जाण्याची प्रवृत्ती, धाडसी व लोकाभिमुख नेतृत्व म्हणून पुढे आलेले उदयोन्मुख नेते म्हणून चंदन बसवराज पाटील नागराळकर यांना उदगीर परिसरात ओळखले जाते . 

नगर परिषद उदगीर येथील प्रभाग क्रमांक 16 मधून ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. विचारात असलेली विकासाची गंगा प्रत्यक्षात उतरवण्यासाठी एका मजबूत व प्रयत्नशील अशा उमेदवाराला निवडून देणे हे आपले कर्तव्य आहे. संत तुकाराम महाराजांच्या उक्ती प्रमाणे , उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली. तुमच्या प्रभागामधील सर्व प्रकारच्या अडचणी दूर करुन हा उमेदवार एक भक्कम भविष्य निर्माण केल्याशिवाय राहणार नाही.

उदगीर पंचक्रोशीतील अतिशय सुसंस्कृत पाटील नागराळकर परिवारात त्यांचा जन्म झाला. या परिसरातील ऋषीतुल्य व्यक्तिमत्व असलेले कै. मलशेटृटीअप्पा पाटील नागराळकर हे त्यांचे आजोबा . मलशेटृटीअप्पा पाटील नागराळकर हे उदगीर येथील पंचायत समिती व कृषी उत्पन्न बाजार समितीचे पहिले सभापती होते ‌.तर कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षण संस्था उदगीरचे अध्यक्ष व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा उदगीरचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी उदगीरचे अध्यक्ष मा श्री बसवराज म. पाटील नागराळकर हे त्यांचे वडील तर त्यांचे चुलते लातूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मा श्री दिलीप पाटील नागराळकर हे लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आहेत.

चंदन पाटील नागराळकर यांच्या घराण्यात आजोबापासून राजकारण ,समाजकारण चालत आलेले आहे. त्यांचाच वारसा पुढे चालवण्याची धुरा आपल्या खांद्यावर स्वीकारुन , सध्या ते राजकारणात सक्रिय सहभागी आहेत. समाजातील सर्वसामान्य जनता यांच्या समस्या जाणून, त्यांना तत्परतेने मदत करण्याची वृत्ती असलेला तरुण नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.

चंदन बसवराज पाटील नागराळकर हे उच्च विद्याविभूषित आहेत. त्यांनी बॅचलर इन हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी , या विषयात पदवीचे शिक्षण लोणावळा येथील सिंहगड इन्स्टिट्यूट मधून पूर्ण केले . या कॉलेजमध्ये असताना त्यांना सांस्कृतिक विभागातर्फे अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलिना या राज्यात पाठविण्यात आले . तिथे त्यांनी आठ महिने राहून कोर्स पूर्ण केला . त्यानंतर पदव्युत्तर शिक्षण हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट , या विषयात करण्यासाठी ते लंडनला 2008 मध्ये गेले व तेथे अडीच वर्ष वास्तव्य करुन पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण झाल्यावर भारतात येऊन त्यांनी आपला व्यवसाय सुरु केला. व्यवसायात यशस्वी होण्यासाठी ते आफ्रिका देशातील इथिओपिया या ठिकाणी जाऊन प्रशिक्षण घेतले. त्यांचे शिक्षण पूर्ण होताच, त्यांच्या अंगी असलेली गुणवत्ता पाहून जगातील पहिल्या सातमध्ये क्रमांक पटकावणारी डॉयल कलेक्शन या हॉटेल शृंखलेतील कंपनीने त्यांना कस्टमर केअर एक्झिक्यूटिव्ह म्हणून संधी दिली . त्यांनी तिथे तीन वर्ष काम केले. तिथे त्यांना चांगला पगार असुनही त्यांचे मन तिथे रमत नव्हते. परकीय राष्ट्रात वास्तव्य करून देखील त्यांनी भारतीय संस्कृती सोडली नाही . तरुणाईची झेप मोठमोठ्या शहराकडे असताना मातृभूमीची हाक ऐकत चंदन पाटील नागराळकर विदेशातून गावाकडे परतले. गलेलठ्ठ पगाराची नौकरी, सुखासीन जीवन यावर पाणी सोडून तीन पिढ्यांपासून चालू असलेला घराण्याचा राजकारण, समाजकारण, समाजसेवेचा वारसा पुढे नेण्यासाठी चंदन पाटील नागराळकर यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात आपले पाऊल टाकुन जनतेची सेवा करत आहेत.

उदगीर येथील कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षण संस्थेचे ते उपाध्यक्ष आहेत. या संस्थेच्या अंतर्गत उदगीर येथे श्री छत्रपती शाहू महाराज सैनिकी विद्यालय व एम व्ही पाटील सीबीएसई पब्लिक स्कूल या दोन शाळा अवलकोंडा रोडवरील सैनिकी विद्यालयाच्या ज्ञानगिरी परिसरात उत्तम प्रकारे चालविण्याचे कार्य ते करत आहेत. या परिसरातील विद्यार्थ्यांना सैनिकी शिक्षण व सीबीएसईचे शिक्षण उपलब्ध करुन देण्यासाठी या विद्यालयाची स्थापना करण्यात आली आहे. चंदन पाटील नागराळकर हे नेहमी शिक्षक, पालक व विद्यार्थी यांच्याशी सुसंवाद साधून त्यांना मार्गदर्शन करतात. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास व्हावा, आजचा विद्यार्थी उद्याचा सुजाण व आदर्श नागरिक व्हावा तसेच त्यांची गुणवत्ता वाढावी यासाठी शिक्षकांनी विद्यालयात वेगवेगळे उपक्रम राबवावेत,अशा सूचना ते नेहमी शिक्षकांना करतात. सैनिकी विद्यालयाचे अनेक विद्यार्थी आज भारतीय सैन्यात, प्रशासकीय सेवेत, डाॅक्टर, इंजिनिअर, शिक्षक, प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. याचे श्रेय आपल्याला चंदन पाटील नागराळकर यांना द्यावे लागते.
   
चंदन पाटील नागराळकर यांना सर्वसामान्यांच्या अडीअडचणी सोडविणे व समाजातील सर्व घटकांना न्याय मिळवून देणे व प्रभागाचा विकास यासाठी प्रभाव क्रमांक 16 मधील मतदारांनी त्यांना प्रचंड मताधिक्याने निवडून देऊन सेवेची संधी द्यावी.

उदगीर नगरपरिषद निवडणूक २०२५ यामध्ये महाविकास आघाडीने प्रचाराची जोरदार सुरुवात केली असून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार डॉ. अंजुम फातेमा खादरी यांच्यासह प्रभाग 16 अ चे उमेदवार मिर्झा रेश्मा जबीन अक्रम बेग , प्रभाग 16 ब चे उमेदवार चंदन बसवराज पाटील नागराळकर यांच्या प्रचाराला स्थानिक पातळीवर वाढता प्रतिसाद मिळत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

*“एक संसार, दोन शिक्षक… आणि समाजासाठी आयुष्यभराची शिदोरी”*

*“एक संसार, दोन शिक्षक… आणि समाजासाठी आयुष्यभराची शिदोरी”*   आजचा दिवस श्री. सुनील शांतप्पा क्षीरसागर (माजी मुख्याध्यापक) आणि सौ. मिनाक्षी सुनील क्षीरसागर यांच्या आयुष्यातील एक अत्यंत गौरवशाली क्षण आहे. त्यांच्या विवाहाला आज ३३ वर्षे पूर्ण होत असून, हा केवळ वैवाहिक सहजीवनाचा टप्पा नाही, तर संस्कार, शिक्षण, संयम आणि सामाजिक बांधिलकीने समृद्ध झालेल्या सहप्रवासाचा उत्सव आहे. दोघेही उच्चशिक्षित, पेशाने शिक्षक आणि विचाराने समाजघडविणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. शिक्षक हा केवळ व्यवसाय नसून तो एक संस्कार आहे, हे त्यांनी आपल्या आयुष्यभराच्या कार्यातून दाखवून दिले. अध्यापन, शिस्त, विद्यार्थ्यांच्या जडणघडणीसाठी केलेले प्रयत्न आणि शिक्षणव्यवस्थेतील निष्ठा या साऱ्या बाबी त्यांच्या कार्यकाळात ठळकपणे जाणवतात. त्यांच्या जीवनप्रवासाकडे पाहताना आपसूकच हे शब्द आठवतात   *शब्दांनी शिकवलं नाही, जगून दाखवलं ज्ञान,वर्गात घडले विद्यार्थी, घरात फुलला सन्मान,३३ वर्षांचा हा प्रवास — संस्कारांचीच ओळख पटवणारा महान* .* श्री. सुनील क्षीरसागर यांनी मुख्याध्यापक म्हणून कार्य करताना के...

*दावनगाव गणातून सर्वसामान्यांची उमेदवार म्हणून पुढे आलेल्या – सौ. कोमल कमलाकर फुले*

*दावनगाव गणातून सर्वसामान्यांची उमेदवार म्हणून पुढे आलेल्या – सौ. कोमल कमलाकर फुले* दावनगाव गण पंचायत समिती निवडणुकीत सौ. कोमल कमलाकर फुले या सर्वसामान्यांच्या, विशेषतः महिलांच्या आवाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या उमेदवार म्हणून पुढे आल्या आहेत. साधी, सुज्ञ आणि तळागाळाशी जोडलेली असल्यामुळे त्यांचा लोकांत वेगळाच ओढा निर्माण झाला आहे. सौ. कोमल फुले यांनी अल्पावधीतच गावोगाव फिरत महिलांशी, शेतकऱ्यांशी, तरुणांशी थेट संवाद साधायला सुरुवात केली आहे. शासकीय योजनांची माहिती देणे, विधवा, निराधार, श्रमिक, दिव्यांग आणि शेतकरी कुटुंबांच्या अडचणी समजून घेणे आणि त्यावर प्रत्यक्ष उपाययोजना करण्याची त्यांची धडपड लोक अनुभवत आहेत. त्यांचे पती कमलाकर बालाजीराव फुले हे अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. तरुणांना एकत्र करून त्यांना योग्य सल्ला देणे, कोणताही कार्यक्रम असो वा एखाद्या कुटुंबाची अडचण असो “सगळ्यात आधी धावून जाणारे” नाव म्हणजे कमलाकर फुले, अशी ओळख स्थानिक पातळीवर तयार झाली आहे.कमलाकर फुले यांना कोणताही राजकीय वारसा लाभला नसला, तरी त्यांच्या कुटुंबाची समाजसेवेची परंपरा मजबूत आह...