मुख्य सामग्रीवर वगळा

*दावनगाव गणातून सर्वसामान्यांची उमेदवार म्हणून पुढे आलेल्या – सौ. कोमल कमलाकर फुले*


*दावनगाव गणातून सर्वसामान्यांची उमेदवार म्हणून पुढे आलेल्या – सौ. कोमल कमलाकर फुले*

दावनगाव गण पंचायत समिती निवडणुकीत सौ. कोमल कमलाकर फुले या सर्वसामान्यांच्या, विशेषतः महिलांच्या आवाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या उमेदवार म्हणून पुढे आल्या आहेत. साधी, सुज्ञ आणि तळागाळाशी जोडलेली असल्यामुळे त्यांचा लोकांत वेगळाच ओढा निर्माण झाला आहे.
सौ. कोमल फुले यांनी अल्पावधीतच गावोगाव फिरत महिलांशी, शेतकऱ्यांशी, तरुणांशी थेट संवाद साधायला सुरुवात केली आहे. शासकीय योजनांची माहिती देणे, विधवा, निराधार, श्रमिक, दिव्यांग आणि शेतकरी कुटुंबांच्या अडचणी समजून घेणे आणि त्यावर प्रत्यक्ष उपाययोजना करण्याची त्यांची धडपड लोक अनुभवत आहेत. त्यांचे पती कमलाकर बालाजीराव फुले हे अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. तरुणांना एकत्र करून त्यांना योग्य सल्ला देणे, कोणताही कार्यक्रम असो वा एखाद्या कुटुंबाची अडचण असो “सगळ्यात आधी धावून जाणारे” नाव म्हणजे कमलाकर फुले, अशी ओळख स्थानिक पातळीवर तयार झाली आहे.कमलाकर फुले यांना कोणताही राजकीय वारसा लाभला नसला, तरी त्यांच्या कुटुंबाची समाजसेवेची परंपरा मजबूत आहे. त्यांचे वडील श्री बालाजीराव फुले यांनी सन 2000 मध्ये पंचायत समितीचे उपसभापती म्हणून जबाबदारी सांभाळली. त्यांच्या कार्यकाळात अनेक गावांमध्ये विकासकामे झाली, अनेक सर्वसामान्य नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळाला. “काम असलं की बालाजीराव फुलेंच्या दारी गेलं की हात धरून काम करून देणारा माणूस होता” अशी लोकांची आजही भावनिक आठवण आहे. हाच सेवाभाव, लोकाभिमुख वृत्ती आणि सर्वसमावेशक विचार आज सौ. कोमल कमलाकर फुले यांच्या उमेदवारीला बळ देत आहे. त्या प्रामुख्याने महिलांचे सक्षमीकरण, शिक्षण व विद्यार्थ्यांचे प्रश्न, शेतकऱ्यांच्या अडचणी, बेरोजगार तरुणांसाठी मार्गदर्शन, ग्रामविकासात पारदर्शकता यांना प्राधान्य देण्याचा निर्धार व्यक्त करत आहेत. दावनगाव गणातील नागरिकांमध्ये असा सूर ऐकू येत आहे की, “घराणेशाही किंवा फक्त राजकारणासाठी नव्हे, तर काम करण्यासाठी आणि सहज भेटणारी, सामान्यांशी मिसळणारी व्यक्ती पंचायत समितीत पाहिजे आणि त्या दृष्टीने कोमल ताई योग्य उमेदवार आहेत.” सौ. कोमल कमलाकर फुले या स्वतःला “लोकांच्या घरी जाऊन त्यांची समस्या समजून घेणारी लोकप्रतिनिधी” म्हणून पाहू इच्छितात. त्यांचे म्हणणे आहे “आपल्या गणातील प्रत्येक कुटुंबाला प्रशासनापर्यंत पोहोचवणारा दुवा व्हायचे आहे. पद हे साधन आहे, उद्दिष्ट नाही; उद्दिष्ट आहे – सर्वसामान्यांचे आयुष्य थोडं तरी सोपं करणे.” दावनगाव गणातील मतदारांच्या अपेक्षा, स्थानिक प्रश्न आणि विकासाच्या गरजा जाणणारी, आणि घराघरातून विश्वास मिळवणारी उमेदवार म्हणून सौ. कोमल कमलाकर फुले यांच्याकडे पाहिले जात आहे.
*दयानंद कांबळे नागराळकर*
7887827886

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

*“एक संसार, दोन शिक्षक… आणि समाजासाठी आयुष्यभराची शिदोरी”*

*“एक संसार, दोन शिक्षक… आणि समाजासाठी आयुष्यभराची शिदोरी”*   आजचा दिवस श्री. सुनील शांतप्पा क्षीरसागर (माजी मुख्याध्यापक) आणि सौ. मिनाक्षी सुनील क्षीरसागर यांच्या आयुष्यातील एक अत्यंत गौरवशाली क्षण आहे. त्यांच्या विवाहाला आज ३३ वर्षे पूर्ण होत असून, हा केवळ वैवाहिक सहजीवनाचा टप्पा नाही, तर संस्कार, शिक्षण, संयम आणि सामाजिक बांधिलकीने समृद्ध झालेल्या सहप्रवासाचा उत्सव आहे. दोघेही उच्चशिक्षित, पेशाने शिक्षक आणि विचाराने समाजघडविणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. शिक्षक हा केवळ व्यवसाय नसून तो एक संस्कार आहे, हे त्यांनी आपल्या आयुष्यभराच्या कार्यातून दाखवून दिले. अध्यापन, शिस्त, विद्यार्थ्यांच्या जडणघडणीसाठी केलेले प्रयत्न आणि शिक्षणव्यवस्थेतील निष्ठा या साऱ्या बाबी त्यांच्या कार्यकाळात ठळकपणे जाणवतात. त्यांच्या जीवनप्रवासाकडे पाहताना आपसूकच हे शब्द आठवतात   *शब्दांनी शिकवलं नाही, जगून दाखवलं ज्ञान,वर्गात घडले विद्यार्थी, घरात फुलला सन्मान,३३ वर्षांचा हा प्रवास — संस्कारांचीच ओळख पटवणारा महान* .* श्री. सुनील क्षीरसागर यांनी मुख्याध्यापक म्हणून कार्य करताना के...

नगर परिषद उदगीर प्रभाग क्रमांक 16 मधील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार सामान्यांच्या संवेदनेशी नाळ असणारा तरुण नेता - चंदन पाटील नागराळकर

नगर परिषद उदगीर प्रभाग क्रमांक 16 मधील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार  सामान्यांच्या संवेदनेशी नाळ असणारा तरुण नेता - चंदन पाटील नागराळकर या देशाचे अन मातीचे  ऋण कधीही ना विसरू  जिने आमुचे पोषण केले  तिची सदैव सेवा करू  आपण समाजाचे ,देशाचे काही देणे लागतो, सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या, अडचणीत त्यांच्या मदतीला धावून जाण्याची प्रवृत्ती, धाडसी व लोकाभिमुख नेतृत्व म्हणून पुढे आलेले उदयोन्मुख नेते म्हणून चंदन बसवराज पाटील नागराळकर यांना उदगीर परिसरात ओळखले जाते .  नगर परिषद उदगीर येथील प्रभाग क्रमांक 16 मधून ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. विचारात असलेली विकासाची गंगा प्रत्यक्षात उतरवण्यासाठी एका मजबूत व प्रयत्नशील अशा उमेदवाराला निवडून देणे हे आपले कर्तव्य आहे. संत तुकाराम महाराजांच्या उक्ती प्रमाणे , उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली. तुमच्या प्रभागामधील सर्व प्रकारच्या अडचणी दूर करुन हा उमेदवार एक भक्कम भविष्य निर्माण केल्याशिवाय राहणार नाही. उदगीर पंचक्रोशीतील अतिशय सुसंस्कृत प...