*एक सेवाभावी व्यक्तिमत्व : गोपाळराव कांबळे* ------------------------------------ सेवाभावी वृतीने आयुष्यभर विद्यार्थी घडवीणारे, विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून शिक्षण देणारे सेवाभावी व्यक्तिमत्व म्हणजे सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री. गोपाळराव कांबळे हे होत. आज शिक्षक दिन त्यानिमित्त त्यांच्या कार्याचा आढावा घेणारा हा लेख. श्री गोपाळराव मरेप्पा कांबळे यांचा जन्म दि.2० जानेवारी १६६३ रोजी लखनगाव ता. भालकी जि. बिदर येथे एका गरीब कुटुंबात झाला. त्यांचे प्राथमिक ते माध्यमिक पर्यंतचे शिक्षण जि. प. हायस्कूल लखनगाव, उच्च माध्यमिक शिक्षण शिवाजी महाविद्यालय उदगीर, अध्यापन पदविका मराठी बी. टी. आय. बिदर येथून पूर्ण केली., पदवी व पदव्युत्तर शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथे बहिस्थ पध्दतीने घेतले.बी.एड.व एम.एड.चे शिक्षण यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक, येथुन घेतले. एम. ए. राज्यशास्त्र ही पदवीही त्यांनी प्राप्त केली.श्री. कांबळे सर हे १२ वी ला असताना पाच वेळा नापास झाले पण शिक्षणाची ज...