मुख्य सामग्रीवर वगळा

*न्यायप्रिय, तत्वनिष्ठ आणि सामाजिक जाण व भान असणारे एक संयमी संघर्षशील व्यक्तिमत्व : प्राचार्य एकनाथ पाटोदेकर*

*न्यायप्रिय, तत्वनिष्ठ आणि सामाजिक जाण व भान असणारे एक संयमी संघर्षशील व्यक्तिमत्व : प्राचार्य एकनाथ पाटोदेकर*
---------------------------------------
    माणसाच्या जीवनात त्याला वेळोवेळी संघर्ष करावा लागतो. दुःखाच्या, अडचणीच्या तसेच उणीवांच्या झळा सोसून देखील आपल्या विचाराशी व तत्वाशी कधीही तडजोड न करता संकटाशी दोन हात करण्याची जिद्द बाळगून जीवनात संघर्ष करावा लागतो. ही शिकवण अंगीकारूण, आपण नेहमीच इतराच्या कामी यावे. संकटकाळी, गरजेच्यावेळी इतरांसाठी धावून जावे. असा वसा घेवून जीवन जगणारी माणसं दुर्मिळच... काही माणसं अशीच भावना उराशी बाळगून जीवन जगत असतात. त्यापैकीच प्राचार्य एकनाथ पाटोदेकर हे एक नाव...
       प्राचार्य एकनाथ दत्तराम पाटोदेकर हे माध्यमिक आश्रमशाळा व उच्च माध्यमिक विदयालय कुंटूर तांडा येथे जवळपास 32 वर्षे सेवा करून सेवानिवृत्त झाले आहेत. धर्माबाद तालुक्यातील पाटोदा (थडी ) सारख्या लहानशा खेड्यात त्यांचा जन्म दि. 1 जून 1965 रोजी झाला.. गावातच प्राथमिक शिक्षण संपल्यानंतर माध्यमिक शिक्षणासाठी त्यांनी कुंडलवाडी येथे पायी येणे - जाणे करून शिक्षण पूर्ण केले. शालेय जीवनात ते अत्यंत हुशार व चांगल्या स्वभावाचे असल्याने सर्व शिक्षकांचे व वर्गमित्राचे ते लाडके होते.त्यांच्या आईवडिलांनी त्यांना खूप कष्टाने व जिद्दीने पुढील शिक्षणासाठी पाठवले. धर्माबाद येथे पदवीपर्यंतचे शिक्षण संपल्यानंतर त्यांनी नांदेड येथे बी. एड. चे शिक्षण घेतले. त्यानंतर 1992 पासून कुंटूर तांडा सारख्या लहानशा तांड्यावर अध्यापणाचे कार्य सुरु केले.
       आपल्या आई वडिलांच्या कष्टाची, जिद्दीची आठवण ठेवून आयुष्यभर गोरगरीब, भटक्या जमातीचे व ग्रामीण भागातले विद्यार्थी घडविण्यासाठी प्रयत्न केले. वेगवेगळ्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी जीव ओतून धडपडत राहिले. तसेच आई वडिलांची सेवा सुद्धा इतरांना खरोखरचं प्रेरणादायी आहे. शिक्षक, कर्मचारी व व्यवस्थापन तसेच विद्यार्थी पालक यांच्याशी योग्य समन्व्य साधून चालविलेले प्रशासन आजही इतरांसाठी प्रेरणादायी, मार्गदर्शक आहे यात शंका नाही.
        शिक्षक चळवळीतही सरांचे मोठे योगदान आहे.मराठवाडा शिक्षक संघासारख्या मराठवाड्यातील चळवळीत अग्रेसर असलेल्या संघटनेत ते जिल्हा व मराठवाडा पातळीवर सक्रिय कार्यकर्ते आहेत. सेवानिवृत्तीनंतरही ते केंद्रीय कार्यकारिणीत असून अन्यायग्रस्त शिक्षक, शिक्षकांचे प्रश्न, शैक्षणिक समस्या सोडवून घेण्यासाठी तत्पर असतात. धरणे, आंदोलने, मोर्चात ते सहभागी होतात. स्व. भारतभूषण गायकवाड यांच्या प्रेरणेतून तसेच शंकर बोईनवाड व इतर साहित्यिक मित्राच्या सहवासामुळे ते साहित्य क्षेत्रात देखील काव्यलेखन करीत असतात. सरांना अध्यात्मिक ओढ असल्याने अत्यंत चांगल्या विचाराचा, संताचा सहवास लाभला.
    हे सर्व करीत असताना कुटुंबाकडेही त्यांनी जाणीवपूर्वक लक्ष दिले. सरांना दोन भाऊ, बहीण तसेच मुलगा व दोन मुली असून सर्व उच्च शिक्षित आहेत. मुलगा योगेश नौकरी करतो. मोठी मुलगी अनुजा ही अमेरिकेत पी. जी. चे शिक्षण घेतले. तर छोटी मुलगी अंकिता हिने बी. ए. एम. एस. चे शिक्षण घेतले. प्राचार्य एकनाथ पाटोदेकर यांच्या पत्नी सौ. अनिता एकनाथ पाटोदेकर यांचे सरांच्या वाटचालीत आणि मुलांच्या जडनघडणीत महत्वाचे योगदान आहे.
    आपल्या गावामध्ये सुद्धा प्राचार्य एकनाथ पाटोदेकर यांनी शाळा, ग्रामस्वच्छता तसेच इतर विकासाबाबतीत सुद्धा मोलाचे योगदान आहे. अजूनही आपल्या जन्मभूमितील लोकांसाठी, वृद्धासाठी, गावातील शाळेच्या विकासासाठी हातभार लावावा असा त्यांचा मानस आहे. लोकांमध्ये वैचारिक जागरूकता यावी यासाठी ते प्रयत्न करणार आहेत. प्राचार्य एकनाथ पाटोदेकर यांनी त्यांच्या कार्यकाळात प्रामाणिकपणा व निस्वार्थी भावनेने काम करून नावलौकिक मिळविला. अजूनही हीच भावना ठेवून ते कार्य करीत आहेत.सेवा निवृत्तीनंतरही त्यांच्याकडून शैक्षणिक व सामाजिक कार्य घडत राहावे यासाठी त्यांना आज वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया!

   *शंकर बोईनवाड,उदगीर*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

*विद्रोही साहित्यातील सावित्री!डॉ.प्राजक्ताताई पांडुरंग कलंबरकर*

*विद्रोही साहित्यातील सावित्री!डॉ.प्राजक्ताताई पांडुरंग कलंबरकर* ----------------------- *देवणी* : उपासपोटी संघर्षातून क्रांती व विद्रोह निर्माण होत असतो सोसलं भोगलं व अनुभवलं यातून क्रांतीची ज्वाला निर्माण होऊन बाहेर पडतात परंतु प्राजक्ताताईला कसल्याही गरिबी दारिद्र्याच्या झळा सोसाव्या लागल्या नाही समाजाच्या व्यथा वेदना पाहून प्राजक्ताताच्या शब्दा शब्दात मात्र विद्रोह दिसून येतो प्राजक्ता चे वडील पांडुरंग कलंबरकर हे वैद्यकीय अधिकारी परंतु घरात फुले शाहू आंबेडकर विचाराचे विद्रोही वातावरण त्यातून विद्रोही साहित्य निर्मिती होणं सहाजिक आहे मात्र  एम. बी. बी.एसचं वैद्यकीय उच्च शिक्षण घेता घेता अभ्यासाचा एवढा व्याप असताना विद्रोही साहित्याची निर्मिती डॉ प्राजक्ता कलंबरकरताई यांच्या हातून  विद्रोही साहित्याची निर्मिती होणं त्या साहित्याची दखल विदेशातील नामांकित फेम टाइम्स या मीडियाने दाखल घेऊन 2025 मधील सर्वात प्रेरणादायी तरुणी लेखिका म्हणून  जागतिक महिलांचा बरोबरी करणारा[Most Inspring young Woman Author Of The Year 2025] हा पुरस्कार तिला बहाल करणं म्हणजे डॉ बाबासाह...

*“एक संसार, दोन शिक्षक… आणि समाजासाठी आयुष्यभराची शिदोरी”*

*“एक संसार, दोन शिक्षक… आणि समाजासाठी आयुष्यभराची शिदोरी”*   आजचा दिवस श्री. सुनील शांतप्पा क्षीरसागर (माजी मुख्याध्यापक) आणि सौ. मिनाक्षी सुनील क्षीरसागर यांच्या आयुष्यातील एक अत्यंत गौरवशाली क्षण आहे. त्यांच्या विवाहाला आज ३३ वर्षे पूर्ण होत असून, हा केवळ वैवाहिक सहजीवनाचा टप्पा नाही, तर संस्कार, शिक्षण, संयम आणि सामाजिक बांधिलकीने समृद्ध झालेल्या सहप्रवासाचा उत्सव आहे. दोघेही उच्चशिक्षित, पेशाने शिक्षक आणि विचाराने समाजघडविणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. शिक्षक हा केवळ व्यवसाय नसून तो एक संस्कार आहे, हे त्यांनी आपल्या आयुष्यभराच्या कार्यातून दाखवून दिले. अध्यापन, शिस्त, विद्यार्थ्यांच्या जडणघडणीसाठी केलेले प्रयत्न आणि शिक्षणव्यवस्थेतील निष्ठा या साऱ्या बाबी त्यांच्या कार्यकाळात ठळकपणे जाणवतात. त्यांच्या जीवनप्रवासाकडे पाहताना आपसूकच हे शब्द आठवतात   *शब्दांनी शिकवलं नाही, जगून दाखवलं ज्ञान,वर्गात घडले विद्यार्थी, घरात फुलला सन्मान,३३ वर्षांचा हा प्रवास — संस्कारांचीच ओळख पटवणारा महान* .* श्री. सुनील क्षीरसागर यांनी मुख्याध्यापक म्हणून कार्य करताना के...

*दावनगाव गणातून सर्वसामान्यांची उमेदवार म्हणून पुढे आलेल्या – सौ. कोमल कमलाकर फुले*

*दावनगाव गणातून सर्वसामान्यांची उमेदवार म्हणून पुढे आलेल्या – सौ. कोमल कमलाकर फुले* दावनगाव गण पंचायत समिती निवडणुकीत सौ. कोमल कमलाकर फुले या सर्वसामान्यांच्या, विशेषतः महिलांच्या आवाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या उमेदवार म्हणून पुढे आल्या आहेत. साधी, सुज्ञ आणि तळागाळाशी जोडलेली असल्यामुळे त्यांचा लोकांत वेगळाच ओढा निर्माण झाला आहे. सौ. कोमल फुले यांनी अल्पावधीतच गावोगाव फिरत महिलांशी, शेतकऱ्यांशी, तरुणांशी थेट संवाद साधायला सुरुवात केली आहे. शासकीय योजनांची माहिती देणे, विधवा, निराधार, श्रमिक, दिव्यांग आणि शेतकरी कुटुंबांच्या अडचणी समजून घेणे आणि त्यावर प्रत्यक्ष उपाययोजना करण्याची त्यांची धडपड लोक अनुभवत आहेत. त्यांचे पती कमलाकर बालाजीराव फुले हे अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. तरुणांना एकत्र करून त्यांना योग्य सल्ला देणे, कोणताही कार्यक्रम असो वा एखाद्या कुटुंबाची अडचण असो “सगळ्यात आधी धावून जाणारे” नाव म्हणजे कमलाकर फुले, अशी ओळख स्थानिक पातळीवर तयार झाली आहे.कमलाकर फुले यांना कोणताही राजकीय वारसा लाभला नसला, तरी त्यांच्या कुटुंबाची समाजसेवेची परंपरा मजबूत आह...