मुख्य सामग्रीवर वगळा

*आ. बस्वराजजी पाटील यांच्या पारिवारिक सत्काराचे आयोजन*

आ. बस्वराजजी पाटील यांच्या पारिवारिक सत्काराचे आयोजन* 
------------------------------------
उदगीर / प्रतिनिधी : माजी राज्यमंत्री तथा विधान परिषद सदस्य आ. बस्वराजजी पाटील मुरूमकर यांच्या पारिवारिक सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे.
     या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे माजी मंत्री आ. संजयजी बनसोडे हे राहणार असून या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून औसाचे आ. अभिमन्यू पवार, मुरूमचे नगराध्यक्ष श्री. बापूरावजी पाटील, उमरगा जनता बँकेचे चेअरमन श्री. शरणजी पाटील व उदगीरच्या नगरध्यक्षा सौ. स्वाती हुडे यांची उपस्थिती राहणार आहे. सोमवारी दि. 10 ऑगस्ट रोजी सकाळी 11वा. येथील यशवंत दाल मिल, बिदर रोड या ठिकाणी संपन्न होणाऱ्या या पारिवारिक सत्कार सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक श्री. दिगंबरराव यशवंतराव बिरादार माळेवाडीकर, मधुमेह तज्ञ तथा उदगीर नगर परिषदेचे स्वीकृत नगरसेवक डॉ. बालाजी बिरादार, युवा उद्योजक श्री.दत्ता बिरादार यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

*“एक संसार, दोन शिक्षक… आणि समाजासाठी आयुष्यभराची शिदोरी”*

*“एक संसार, दोन शिक्षक… आणि समाजासाठी आयुष्यभराची शिदोरी”*   आजचा दिवस श्री. सुनील शांतप्पा क्षीरसागर (माजी मुख्याध्यापक) आणि सौ. मिनाक्षी सुनील क्षीरसागर यांच्या आयुष्यातील एक अत्यंत गौरवशाली क्षण आहे. त्यांच्या विवाहाला आज ३३ वर्षे पूर्ण होत असून, हा केवळ वैवाहिक सहजीवनाचा टप्पा नाही, तर संस्कार, शिक्षण, संयम आणि सामाजिक बांधिलकीने समृद्ध झालेल्या सहप्रवासाचा उत्सव आहे. दोघेही उच्चशिक्षित, पेशाने शिक्षक आणि विचाराने समाजघडविणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. शिक्षक हा केवळ व्यवसाय नसून तो एक संस्कार आहे, हे त्यांनी आपल्या आयुष्यभराच्या कार्यातून दाखवून दिले. अध्यापन, शिस्त, विद्यार्थ्यांच्या जडणघडणीसाठी केलेले प्रयत्न आणि शिक्षणव्यवस्थेतील निष्ठा या साऱ्या बाबी त्यांच्या कार्यकाळात ठळकपणे जाणवतात. त्यांच्या जीवनप्रवासाकडे पाहताना आपसूकच हे शब्द आठवतात   *शब्दांनी शिकवलं नाही, जगून दाखवलं ज्ञान,वर्गात घडले विद्यार्थी, घरात फुलला सन्मान,३३ वर्षांचा हा प्रवास — संस्कारांचीच ओळख पटवणारा महान* .* श्री. सुनील क्षीरसागर यांनी मुख्याध्यापक म्हणून कार्य करताना के...

*दावनगाव गणातून सर्वसामान्यांची उमेदवार म्हणून पुढे आलेल्या – सौ. कोमल कमलाकर फुले*

*दावनगाव गणातून सर्वसामान्यांची उमेदवार म्हणून पुढे आलेल्या – सौ. कोमल कमलाकर फुले* दावनगाव गण पंचायत समिती निवडणुकीत सौ. कोमल कमलाकर फुले या सर्वसामान्यांच्या, विशेषतः महिलांच्या आवाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या उमेदवार म्हणून पुढे आल्या आहेत. साधी, सुज्ञ आणि तळागाळाशी जोडलेली असल्यामुळे त्यांचा लोकांत वेगळाच ओढा निर्माण झाला आहे. सौ. कोमल फुले यांनी अल्पावधीतच गावोगाव फिरत महिलांशी, शेतकऱ्यांशी, तरुणांशी थेट संवाद साधायला सुरुवात केली आहे. शासकीय योजनांची माहिती देणे, विधवा, निराधार, श्रमिक, दिव्यांग आणि शेतकरी कुटुंबांच्या अडचणी समजून घेणे आणि त्यावर प्रत्यक्ष उपाययोजना करण्याची त्यांची धडपड लोक अनुभवत आहेत. त्यांचे पती कमलाकर बालाजीराव फुले हे अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. तरुणांना एकत्र करून त्यांना योग्य सल्ला देणे, कोणताही कार्यक्रम असो वा एखाद्या कुटुंबाची अडचण असो “सगळ्यात आधी धावून जाणारे” नाव म्हणजे कमलाकर फुले, अशी ओळख स्थानिक पातळीवर तयार झाली आहे.कमलाकर फुले यांना कोणताही राजकीय वारसा लाभला नसला, तरी त्यांच्या कुटुंबाची समाजसेवेची परंपरा मजबूत आह...

*जनतेच्या मनात स्थान मिळवलेले लोकसेवक — राम नरसिंग बिरादार चवणहिप्परगेकर.*

*जनतेच्या मनात स्थान मिळवलेले लोकसेवक — राम नरसिंग बिरादार चवणहिप्परगेकर.* देवणी तालुक्यातील सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात आपला ठसा उमटविणारे नाव म्हणजे राम नरसिंग बिरादार चवण चवणहिप्परगेकर. विकासाची गती वाढविणे, समाजातील सर्व घटकांना समान न्याय मिळवून देणे आणि प्रत्येक घरापर्यंत प्रगतीचे किरण पोहोचवणे हा त्यांचा जीवनधर्म आहे.राम नरसिंग बिरादार हे केवळ राजकारणी नाहीत, तर एक सामाजिक कार्यकर्ते, शिक्षणप्रेमी आणि सेवाभावी व्यक्तिमत्व आहेत.रास्त भाव दुकानाचे चेअरमन म्हणून त्यांनी शेकडो गरीब कुटुंबांपर्यंत परवडणाऱ्या दरात अन्नधान्य पोहोचवले.कै. गंगाई बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे सचिव म्हणून समाजातील वंचित, दिव्यांग, विधवा आणि गरजू घटकांसाठी विविध उपक्रम राबवले. त्यांची साई इंग्लिश स्कूल, चवणहिप्परगा ही संस्था ग्रामीण भागात इंग्रजी माध्यमाचे दर्जेदार शिक्षण देणारी अग्रगण्य शाळा आहे. गावातील गरिब, शेतकरी आणि मजूर वर्गातील विद्यार्थ्यांना ते मोफत प्रवेश देतात, शैक्षणिक साहित्य आणि गणवेश स्वतःच्या खर्चाने देतात.“कोणतेही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये” ही त्यांची भूमिका अस...