मुख्य सामग्रीवर वगळा

*साने गुरुजी विद्यालयाचे वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात साजरे.*

*साने गुरुजी विद्यालयाचे वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात साजरे.* 
उदगीर / प्रतिनिधी : 
येथील साने गुरुजी विद्यालयात 2025-26 चे वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात साजरे करण्यात आले. सायं. 05:00 वाजता नव समाज शिक्षण प्रसारक मंडळ, उदगीरचे सचिव तथा नगर परिषदेचे नव निर्वाचित नगरसेवक मनोजदादा पुदाले साहेब यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष बापूसाहेब कज्जेवाड तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे कोषाध्यक्ष ऍड. उन्मेष हिबारे, शालेय समिती अध्यक्ष अमोल बागबंदे तसेच व्यासपीठावर प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक संजीव मुसने व माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक सुशांत कोंडेकर उपस्थित होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते साने गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.शाळेच्या वतीने व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन व विद्यार्थ्यांच्या शब्दसुमनाने स्वागत करण्यात आले.
यावेळी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक संजीव मुसने यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. व्यासपीठावरील मान्यवरांच्या मनोगतानंतर बालवर्ग ते 10 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी अतिशय उत्कृष्ट प्रकारचे नृत्य सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. यात देशभक्ती,भक्तीगीत, समाजप्रबोधनपर, लोकगीते अशा विविध प्रकारच्या मराठी व हिंदी गीतावर विद्यार्थ्यांनी आपली नृत्यकला सादर केली.
कार्यक्रमाचे संचलन शालिनी मोगले, शिवकांत सोनटक्के, दीपक सोनकांबळे व देविदास खिंडे यांनी केले तर आभार दीपक सोनकांबळे यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

*“एक संसार, दोन शिक्षक… आणि समाजासाठी आयुष्यभराची शिदोरी”*

*“एक संसार, दोन शिक्षक… आणि समाजासाठी आयुष्यभराची शिदोरी”*   आजचा दिवस श्री. सुनील शांतप्पा क्षीरसागर (माजी मुख्याध्यापक) आणि सौ. मिनाक्षी सुनील क्षीरसागर यांच्या आयुष्यातील एक अत्यंत गौरवशाली क्षण आहे. त्यांच्या विवाहाला आज ३३ वर्षे पूर्ण होत असून, हा केवळ वैवाहिक सहजीवनाचा टप्पा नाही, तर संस्कार, शिक्षण, संयम आणि सामाजिक बांधिलकीने समृद्ध झालेल्या सहप्रवासाचा उत्सव आहे. दोघेही उच्चशिक्षित, पेशाने शिक्षक आणि विचाराने समाजघडविणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. शिक्षक हा केवळ व्यवसाय नसून तो एक संस्कार आहे, हे त्यांनी आपल्या आयुष्यभराच्या कार्यातून दाखवून दिले. अध्यापन, शिस्त, विद्यार्थ्यांच्या जडणघडणीसाठी केलेले प्रयत्न आणि शिक्षणव्यवस्थेतील निष्ठा या साऱ्या बाबी त्यांच्या कार्यकाळात ठळकपणे जाणवतात. त्यांच्या जीवनप्रवासाकडे पाहताना आपसूकच हे शब्द आठवतात   *शब्दांनी शिकवलं नाही, जगून दाखवलं ज्ञान,वर्गात घडले विद्यार्थी, घरात फुलला सन्मान,३३ वर्षांचा हा प्रवास — संस्कारांचीच ओळख पटवणारा महान* .* श्री. सुनील क्षीरसागर यांनी मुख्याध्यापक म्हणून कार्य करताना के...

*बोरोळ जिल्हा परिषद गट काँग्रेसकडे *रतन पाटील नागराळकरांच्या नियोजनबद्ध प्रचाराला यश*

*बोरोळ जिल्हा परिषद गट काँग्रेसकडे *रतन पाटील नागराळकरांच्या नियोजनबद्ध प्रचाराला यश*  देवणी | प्रतिनिधी — सध्या पार पडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत बोरोळ जिल्हा परिषद गटातून काँग्रेसचे उमेदवार औदुंबर पांचाळ विजयी झाले आहेत. देवणी तालुक्यातील तीन जिल्हा परिषद जागांपैकी एक जागा काँग्रेसला मिळाल्याने राजकीयदृष्ट्या या निकालाकडे महत्त्वपूर्ण घडामोड म्हणून पाहिले जात आहे. या निकालामागे काँग्रेसचे तालुकास्तरावरील संयोजक रतन पाटील नागराळकर यांनी केलेला नियोजनबद्ध प्रचार, संघटनात्मक बांधणी आणि सातत्यपूर्ण संपर्क हे महत्त्वाचे घटक ठरल्याचे पक्षांतर्गत सांगितले जात आहे. प्रचाराच्या सुरुवातीपासून शेवटच्या टप्प्यापर्यंत रतन पाटील नागराळकर यांनी गटातील प्रत्येक गाव, वाडी-वस्ती येथे प्रत्यक्ष उपस्थित राहून कार्यकर्त्यांना सक्रिय ठेवले.रतन पाटील नागराळकर हे उदगीर पंचायत समितीचे पहिले सभापती स्व. मलशेट्टी आप्पा पाटील नागराळकर यांचे नातू असून माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप पाटील नागराळकर यांचे पुतणे आहेत. सार्वजनिक जीवनाची पार्श्वभूमी असली, तरी या निवडणुकीत त्यांनी वैयक्तिक श्रेयापेक्षा...