मुख्य सामग्रीवर वगळा

महात्मा पब्लिक स्कूलची यशस्वी वाटचाल; दहाव्या वर्षात पदार्पण

महात्मा पब्लिक स्कूलची यशस्वी वाटचाल; दहाव्या वर्षात पदार्पण

उदगीर : नाईक चौक, देगलूर रोड येथील ए-मार्टच्या शेजारी स्थित महात्मा पब्लिक स्कूलने यशस्वी शैक्षणिक वाटचालीची नऊ वर्षे पूर्ण करून आता दहाव्या वर्षात पदार्पण केले आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण, संस्कारमूल्ये आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देत शाळेने अल्पावधीतच पालकांचा विश्वास संपादन केला आहे.

सन २०१७ मध्ये स्वामी विवेकानंद ग्रामसेवा प्रतिष्ठान, उदगीर अंतर्गत संचालक दीपक पाटील नेत्रगावे व सौ. संगीता नेत्रगावे यांनी महात्मा पब्लिक स्कूलची स्थापना केली. सुरुवातीला प्ले ग्रुप, नर्सरी, एलकेजी व यूकेजीच्या अवघ्या ३० विद्यार्थ्यांसह आणि सहा शिक्षकांच्या सहकार्याने सुरू झालेली ही शाळा आज ११० विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली असून सात शिक्षक विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य करीत आहेत.

शाळेत विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासोबतच शिस्त, संस्कार, आत्मविश्वास आणि स्पर्धात्मकतेचे धडे दिले जातात. लहान वयापासून विद्यार्थ्यांमध्ये बौद्धिक विकास घडावा यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. नियमित अभ्यासक्रमासोबतच विविध स्पर्धा परीक्षा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि शैक्षणिक उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतले जाते.

शिवजयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, महात्मा गांधी, पंडित नेहरू यांसह विविध महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथीचे आयोजन करून विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्याची ओळख करून दिली जाते. तसेच वाचन प्रेरणा दिवस, गुरुपौर्णिमा, शिक्षक दिन, गोकुळाष्टमी, मकरसंक्रांत, गुढीपाडवा, दसरा, रमजान ईद, धुळवड, १ मे, १५ ऑगस्ट, २६ जानेवारी आणि १७ सप्टेंबर यांसारखे विविध दिनविशेष उत्साहात साजरे केले जातात.

शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनात नृत्य, गायन, वक्तृत्व, नाटिका यांसारख्या कार्यक्रमांद्वारे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव दिला जातो. प्रत्येक विद्यार्थ्याचा वाढदिवस साजरा केला जातो. तसेच विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करून विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासालाही प्रोत्साहन दिले जाते.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासोबतच त्यांच्या आरोग्याचीही विशेष काळजी घेतली जाते. शाळेमार्फत दर महिन्याला विविध आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येते. यामध्ये नेत्रतपासणी, दंततपासणी, शारीरिक आरोग्य तपासणी तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्यविषयक समस्यांबाबत तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन केले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण होण्यास मदत होते. तसेच विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी दर महिन्याला पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात येते. यात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेऊन पालकांशी संवाद साधला जातो.
विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून ज्ञान मिळावे यासाठी शैक्षणिक सहलींचे आयोजन केले जाते. उदगीर किल्ला, पोस्ट ऑफिस, पोलीस स्टेशन, शासकीय रुग्णालय, साईधाम, रेल्वे स्टेशन, बौद्ध विहार, राजराजेश्वरी मंदिर तसेच प्रगत शेतांना भेटी देऊन विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष ज्ञान दिले जाते.

शाळेतील विविध कार्यक्रमांना माजी नगराध्यक्ष सुधीरभाऊ भोसले, सत्यवान बोरोळकर, डॉ. विद्यासागर अचोले, डॉ. बालाजी बिरादार, शहाजी पाटील तळेगावकर, डॉ. दत्तात्रय इनामदार, डॉ. अयुब पठाण, डॉ. माधुरी शेळके, ब्युटीशियन व न्यूट्रिशियन तज्ञ मोहिनी अचोले, सह्याद्री इंटरनॅशनल ज्युनिअर कॉलेज अहिल्यानगरचे संचालक सचिदानंद घोणसे, डॉ. उमेश लहाने, डॉ. विठ्ठल चामवाड, डॉ. सुनील माने डॉ. पंकज मुंडे यांच्यासह अनेक मान्यवर व शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांचे व शाळेच्या कार्याचे कौतुक केले आहे.

संचालक दीपक पाटील नेत्रगावे व सौ. संगीता नेत्रगावे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य आनंद चिंचोले तसेच स्वाती चिंचोले, प्रदेवी वाडीकर, रेचल सूर्यवंशी, सुचिता पाटील, शिवकन्या वाघमारे, दिक्षा कांबळे आणि इतर कर्मचारी शाळेच्या प्रगतीसाठी सातत्याने कार्यरत आहेत.

भविष्यात जकनाळ येथे ‘सह्याद्री स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज’च्या माध्यमातून इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतचे आधुनिक शैक्षणिक संकुल उभारण्याचा संस्थेचा मानस आहे.

महात्मा पब्लिक स्कूलने अल्पावधीत केलेली उल्लेखनीय प्रगती पाहता आगामी काळातही ही संस्था शिक्षण क्षेत्रात नवे मानदंड प्रस्थापित करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

— शंकर बोईनवाड
पत्रकार, उदगीर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

*विद्रोही साहित्यातील सावित्री!डॉ.प्राजक्ताताई पांडुरंग कलंबरकर*

*विद्रोही साहित्यातील सावित्री!डॉ.प्राजक्ताताई पांडुरंग कलंबरकर* ----------------------- *देवणी* : उपासपोटी संघर्षातून क्रांती व विद्रोह निर्माण होत असतो सोसलं भोगलं व अनुभवलं यातून क्रांतीची ज्वाला निर्माण होऊन बाहेर पडतात परंतु प्राजक्ताताईला कसल्याही गरिबी दारिद्र्याच्या झळा सोसाव्या लागल्या नाही समाजाच्या व्यथा वेदना पाहून प्राजक्ताताच्या शब्दा शब्दात मात्र विद्रोह दिसून येतो प्राजक्ता चे वडील पांडुरंग कलंबरकर हे वैद्यकीय अधिकारी परंतु घरात फुले शाहू आंबेडकर विचाराचे विद्रोही वातावरण त्यातून विद्रोही साहित्य निर्मिती होणं सहाजिक आहे मात्र  एम. बी. बी.एसचं वैद्यकीय उच्च शिक्षण घेता घेता अभ्यासाचा एवढा व्याप असताना विद्रोही साहित्याची निर्मिती डॉ प्राजक्ता कलंबरकरताई यांच्या हातून  विद्रोही साहित्याची निर्मिती होणं त्या साहित्याची दखल विदेशातील नामांकित फेम टाइम्स या मीडियाने दाखल घेऊन 2025 मधील सर्वात प्रेरणादायी तरुणी लेखिका म्हणून  जागतिक महिलांचा बरोबरी करणारा[Most Inspring young Woman Author Of The Year 2025] हा पुरस्कार तिला बहाल करणं म्हणजे डॉ बाबासाह...

*“एक संसार, दोन शिक्षक… आणि समाजासाठी आयुष्यभराची शिदोरी”*

*“एक संसार, दोन शिक्षक… आणि समाजासाठी आयुष्यभराची शिदोरी”*   आजचा दिवस श्री. सुनील शांतप्पा क्षीरसागर (माजी मुख्याध्यापक) आणि सौ. मिनाक्षी सुनील क्षीरसागर यांच्या आयुष्यातील एक अत्यंत गौरवशाली क्षण आहे. त्यांच्या विवाहाला आज ३३ वर्षे पूर्ण होत असून, हा केवळ वैवाहिक सहजीवनाचा टप्पा नाही, तर संस्कार, शिक्षण, संयम आणि सामाजिक बांधिलकीने समृद्ध झालेल्या सहप्रवासाचा उत्सव आहे. दोघेही उच्चशिक्षित, पेशाने शिक्षक आणि विचाराने समाजघडविणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. शिक्षक हा केवळ व्यवसाय नसून तो एक संस्कार आहे, हे त्यांनी आपल्या आयुष्यभराच्या कार्यातून दाखवून दिले. अध्यापन, शिस्त, विद्यार्थ्यांच्या जडणघडणीसाठी केलेले प्रयत्न आणि शिक्षणव्यवस्थेतील निष्ठा या साऱ्या बाबी त्यांच्या कार्यकाळात ठळकपणे जाणवतात. त्यांच्या जीवनप्रवासाकडे पाहताना आपसूकच हे शब्द आठवतात   *शब्दांनी शिकवलं नाही, जगून दाखवलं ज्ञान,वर्गात घडले विद्यार्थी, घरात फुलला सन्मान,३३ वर्षांचा हा प्रवास — संस्कारांचीच ओळख पटवणारा महान* .* श्री. सुनील क्षीरसागर यांनी मुख्याध्यापक म्हणून कार्य करताना के...

*दावनगाव गणातून सर्वसामान्यांची उमेदवार म्हणून पुढे आलेल्या – सौ. कोमल कमलाकर फुले*

*दावनगाव गणातून सर्वसामान्यांची उमेदवार म्हणून पुढे आलेल्या – सौ. कोमल कमलाकर फुले* दावनगाव गण पंचायत समिती निवडणुकीत सौ. कोमल कमलाकर फुले या सर्वसामान्यांच्या, विशेषतः महिलांच्या आवाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या उमेदवार म्हणून पुढे आल्या आहेत. साधी, सुज्ञ आणि तळागाळाशी जोडलेली असल्यामुळे त्यांचा लोकांत वेगळाच ओढा निर्माण झाला आहे. सौ. कोमल फुले यांनी अल्पावधीतच गावोगाव फिरत महिलांशी, शेतकऱ्यांशी, तरुणांशी थेट संवाद साधायला सुरुवात केली आहे. शासकीय योजनांची माहिती देणे, विधवा, निराधार, श्रमिक, दिव्यांग आणि शेतकरी कुटुंबांच्या अडचणी समजून घेणे आणि त्यावर प्रत्यक्ष उपाययोजना करण्याची त्यांची धडपड लोक अनुभवत आहेत. त्यांचे पती कमलाकर बालाजीराव फुले हे अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. तरुणांना एकत्र करून त्यांना योग्य सल्ला देणे, कोणताही कार्यक्रम असो वा एखाद्या कुटुंबाची अडचण असो “सगळ्यात आधी धावून जाणारे” नाव म्हणजे कमलाकर फुले, अशी ओळख स्थानिक पातळीवर तयार झाली आहे.कमलाकर फुले यांना कोणताही राजकीय वारसा लाभला नसला, तरी त्यांच्या कुटुंबाची समाजसेवेची परंपरा मजबूत आह...