*निळकंठ इंग्लिश स्कूलचे 11 व्या वर्षात यशस्वी पदार्पण*
---------------------------------------
उदगीर येथील भगीरथी मंगल कार्यालयाजवळ, डॅम रोड वर स्थित असलेले निळकंठ इंग्लिश स्कूल हे दहा वर्षे पूर्ण करून अकराव्या वर्षात पदार्पण करीत आहे. श्रीमती नीलम्मा मेमोरियल शैक्षणिक संस्था संचलित निळकंठ इंग्लिश स्कूल ही नर्सरी ते आठवी पर्यंत चालणारी शाळा विविध गुणवता व विविध उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा परिपूर्ण विकास साधत आहे. या शाळेचा थोडक्यात आढावा घेणारा हा लेख...
2016 मध्ये संस्थेचे अध्यक्ष श्री. बस्वराज कंटय्या स्वामी आणि सचिव श्री. दिनेश शांतवीर स्वामी यांनी सुरुवातीच्या काळात श्री. माणिक तेलंग, संत कबीर नगर येथे निळकंठ इंग्लिश स्कूलची सुरुवात केली. शाळेच्या प्राचार्या सौ. जयश्री बस्वराज स्वामी यांचेही शाळेसाठी मोठे योगदान आहे. सुरुवातीच्या काळात 45 विद्यार्थी संख्येपासून सुरु झालेली ही शाळा आणि चार शिक्षक शिकवणीला होते. दहा वर्षामध्ये शाळेचा आलेख वाढत गेला आणि आजघडीला या शाळेत 300 पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेतात तर त्यांना 13 ते 15 शिक्षक ज्ञानदानाचे काम करतात. या शाळेत शिस्तीचे, संस्काराचे व गुणवतेचे धडे दिले जातात. लहान वयापासूनच विद्यार्थी हा स्पर्धा परीक्षेत टिकावा यासाठी प्रयत्न केले जातात. अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या परीक्षासाठी प्रोत्साहित केले जाते. जवाहर नवोदय परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा असेल यात विद्यार्थी घडविले जातात. परिणामी शिष्यवृत्ती परीक्षेत या शाळेचे तीन ते चार विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरतात.या शाळेच्या विद्यार्थ्यांनी ऑलंम्पियाडमध्ये भरारी मारली. या शाळेच्या 32 विद्यार्थ्यांनी गोल्ड मेडल मिळविले, एवढेच नाही तर या शाळेचा गणेश दंडे याने 25 हजार रू. चे पारितोषिक मिळविले. सार्वजनिक शिवजयंती महोत्सवात या शाळेचे विद्यार्थी सांघिक व वैयक्तिक नृत्य स्पर्धेत प्रथम आली. सार्वजनिक शिवजयंतीमध्ये या शाळेचे लेझीम पथक सहभागी होते.या शाळेमध्ये शिवजयंती, डॉ. आंबेडकर जयंती, म. फुले, सावित्रीबाई फुले, महात्मा गांधी, प. जवाहर नेहरू व इतर महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथीचे आयोजन केले जाते व मान्यवरांना पाचरण करून त्या त्या महापुरुषाच्या जीवनावर प्रकाश टाकले जाते. शाळा प्रवेश, वाचन प्रेरणादिन, गोकुळाष्टमी, मकर संक्रात, गुडी पाडवा, दसरा, रमजान ईद, धुलिवंदन, गुरुपौर्णिमा, शिक्षक दिन, महाराष्ट्र दिन, 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 17 सप्टेंबर साजरे केले जातात. या शाळेमध्ये वार्षिक स्नेह संमेलनाचे आयोजन केले जाते. नृत्य, गीत गायन, वक्तृत्व, नाटीका आदी कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव दिला जातो. शाळेमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांचा वाढदिवस शाळेच्या वतीने साजरा केला जातो.वेगवेगळ्या दिनाचे औचित्य साधून क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले जाते. विद्यार्थी, पालक व शिक्षक यांच्यासाठी सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन केले जाते. या शाळेच्या वतीने शहरातील साहित्यिक व कविना पाचरण करून भव्य असे कवी संमेलन घेतले जाते. दरमहिन्याला पालक मेळाव्याचे आयोजन करून पालक मेळाव्यात विद्यार्थ्यांच्या गुणवतेचा अहवाल पालकांना सादर करून त्याची प्रगती कशी साधता येईल यासाठी प्रयत्न केले जातात. विद्यार्थी हे सारखेच अभ्यासात गुंतून न राहता थोडा विसावा म्हणुन शैक्षणिक सहलीचे आयोजन केले जाते. या शाळेच्या आतापर्यंत अकलूज, बिदर, चाकूर, साईधाम, हत्तीबेट, शिवम रिसॉर्ट, राजराजेश्वरी मंदिर येथे सहली काढण्यात आल्या. या शाळेत विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने राज्याचे माजी मंत्री आ. संजय बनसोडे, नगराध्यक्षा सौ. स्वाती सचिन हुडे, नगरसेवक व शिक्षण विभागातील अधिकारी यांनी भेटी दिल्या आणि विद्यार्थ्याचे कौतुक केले. भविष्यात निडेबन येथे 7 एकर जागेमध्ये भव्य असे शैक्षणिक संकुल सुरुवात करण्याचा मानस संस्थेचे अध्यक्ष बस्वराज स्वामी यांनी बोलून दाखवला. संस्थेचे अध्यक्ष बस्वराज स्वामी व सचिव दिनेश स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या प्राचार्या सौ. जयश्री स्वामी व त्यांचे सहकारी शिक्षिका सुमित्रा जाधव, सुरेखा देवणीकर, शीतल शिवणखेडे, साधना बेंबळगे, नम्रता बिरादार, नंदिनी वाडकर, नंदिनी हिवरे, प्रीती चिल्लर्गे, शुभम उदगीरकर, दत्ता गुरदाळकर, मेघा कारभारी, संजीवकुमार स्वामी आदी शाळेच्या, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नरत आहेत. भविष्यात शाळेच्या वाटचालीस शुभेच्छा देऊया!
*शंकरबोईनवाड,उदगीर*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा