मुख्य सामग्रीवर वगळा

डोळस आणि चिंतनशील कवी : शंकर बोईनवाड

डोळस आणि चिंतनशील कवी : शंकर बोईनवाड

------------------‐-‐------------------
कवी आणि साहित्यिक हे समाजाचे जागृत डोळे असतात. आपल्या लेखणीच्या सामर्थ्याने ते समाजातील भावना, विचार, संस्कृती आणि जीवनमूल्ये यांचे जतन करतात. त्यांच्या शब्दांतून माणसाच्या सुख-दुःखाचे, आशा-आकांक्षांचे आणि संघर्षांचे चित्र जिवंत होते.
कवीच्या संवेदनशील मनाला निसर्ग, माणुसकी आणि जीवनातील विविध अनुभवांची सुंदर जाण असते. तो आपल्या कवितांमधून समाजाला विचार करायला लावतो, तर साहित्यिक आपल्या कथा, कादंबऱ्या, निबंध आणि लेखांच्या माध्यमातून समाजाला दिशा देतो. त्यांच्या साहित्यकृती केवळ मनोरंजन करत नाहीत, तर वाचकांच्या मनात संस्कार, प्रेरणा आणि सकारात्मक विचार मांडतात अशा नामावलीत
शंकर बोईनवाड यांचे नाव अग्रक्रमावर घ्यावे लागेल. बोईनवाड हे केवळ एक व्यक्तिमत्त्व नसून स्वतंत्र विचारांची एक समृद्ध संस्कृती आहे. त्यांनी नायगावमध्ये साहित्याचे नवे आयाम निर्माण केले. विविध सांस्कृतिक चळवळींमध्ये सक्रिय सहभाग घेऊन नायगावच्या साहित्यिक वातावरणाला समृद्ध करण्यासाठी त्यांनी केलेले योगदान अत्यंत प्रशंसनीय आहे.
दैनिक श्रमिक एकजूट, उद्याचा मराठवाडा, अजिंठा, दैनिक सकाळ ,लोकमत यांसारख्या अनेक वृत्तपत्रांतून त्यांनी आपल्या प्रभावी लेखनाद्वारे जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली आणि न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. सामाजिक, शैक्षणिक तसेच साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अनेक प्रतिष्ठित व नवोदित व्यक्तींचा परिचय त्यांनी आपल्या लेखणीतून समर्थपणे समाजासमोर उभा केला. त्यांच्या लेखनातून समाजप्रबोधन, साहित्यप्रेम आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळतो.सामाजिक जाणीव असलेल्या शंकर बोईनवाड यांचा जन्म नांदेड जिल्ह्यातील नायगाव येथे झाला.
नायगावचे ज्येष्ठ कवी भारतभूषण गायकवाड यांच्या निधनानंतर नायगावच्या साहित्यविश्वात एक मोठी पोकळी निर्माण झाली होती. त्या पोकळीची भर काही प्रमाणात घालण्याचे कार्य त्यांचे शिष्य शंकर बोईनवाड यांनी केले. साहित्य, संस्कृती आणि समाजप्रबोधन यांचा वारसा त्यांनी समर्थपणे पुढे नेला.

काही कारणास्तव शंकर बोइनवाड आज लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे स्थायिक झाले आहेत. उदगीरला समृद्ध सांस्कृतिक आणि साहित्यिक परंपरा लाभलेली आहे. या परंपरेला अधिक बळकटी देण्यासाठी त्यांनी ‘शालेय संकल्पʼ हे साप्ताहिक सुरू केले. या माध्यमातून त्यांनी सांस्कृतिक चळवळींमध्ये सक्रिय सहभाग घेतला आणि विविध सामाजिक, शैक्षणिक व साहित्यिक उपक्रमांमध्ये नेहमीच आघाडीची भूमिका बजावली.
लातूर जिल्ह्यातील अनेक कवी, साहित्यिक आणि लेखकांचा परिचय त्यांनी ‘शालेय संकल्प’च्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहोचविला. ‘चिव चिव चिमणी’ ‘’ कोल्हेवाडीचा बाजार ,आदर्श नगरीचा राजू यांसारख्या विविध साहित्यकृतींची निर्मिती करून त्यांनी मराठी साहित्याची मोलाची सेवा केली आहे.

उत्तम कवी, संवेदनशील लेखक, आदर्श व्यक्तिमत्त्व आणि साहित्य-संस्कृतीचे अखंड उपासक म्हणून शंकर बोईनवाड यांचे कार्य प्रेरणादायी आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना निरोगी, आनंदी आणि दीर्घायुषी जीवनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

वीरभद्र मिरेवाड
साहित्यिक ,नायगाव


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

*“एक संसार, दोन शिक्षक… आणि समाजासाठी आयुष्यभराची शिदोरी”*

*“एक संसार, दोन शिक्षक… आणि समाजासाठी आयुष्यभराची शिदोरी”*   आजचा दिवस श्री. सुनील शांतप्पा क्षीरसागर (माजी मुख्याध्यापक) आणि सौ. मिनाक्षी सुनील क्षीरसागर यांच्या आयुष्यातील एक अत्यंत गौरवशाली क्षण आहे. त्यांच्या विवाहाला आज ३३ वर्षे पूर्ण होत असून, हा केवळ वैवाहिक सहजीवनाचा टप्पा नाही, तर संस्कार, शिक्षण, संयम आणि सामाजिक बांधिलकीने समृद्ध झालेल्या सहप्रवासाचा उत्सव आहे. दोघेही उच्चशिक्षित, पेशाने शिक्षक आणि विचाराने समाजघडविणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. शिक्षक हा केवळ व्यवसाय नसून तो एक संस्कार आहे, हे त्यांनी आपल्या आयुष्यभराच्या कार्यातून दाखवून दिले. अध्यापन, शिस्त, विद्यार्थ्यांच्या जडणघडणीसाठी केलेले प्रयत्न आणि शिक्षणव्यवस्थेतील निष्ठा या साऱ्या बाबी त्यांच्या कार्यकाळात ठळकपणे जाणवतात. त्यांच्या जीवनप्रवासाकडे पाहताना आपसूकच हे शब्द आठवतात   *शब्दांनी शिकवलं नाही, जगून दाखवलं ज्ञान,वर्गात घडले विद्यार्थी, घरात फुलला सन्मान,३३ वर्षांचा हा प्रवास — संस्कारांचीच ओळख पटवणारा महान* .* श्री. सुनील क्षीरसागर यांनी मुख्याध्यापक म्हणून कार्य करताना के...

*दावनगाव गणातून सर्वसामान्यांची उमेदवार म्हणून पुढे आलेल्या – सौ. कोमल कमलाकर फुले*

*दावनगाव गणातून सर्वसामान्यांची उमेदवार म्हणून पुढे आलेल्या – सौ. कोमल कमलाकर फुले* दावनगाव गण पंचायत समिती निवडणुकीत सौ. कोमल कमलाकर फुले या सर्वसामान्यांच्या, विशेषतः महिलांच्या आवाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या उमेदवार म्हणून पुढे आल्या आहेत. साधी, सुज्ञ आणि तळागाळाशी जोडलेली असल्यामुळे त्यांचा लोकांत वेगळाच ओढा निर्माण झाला आहे. सौ. कोमल फुले यांनी अल्पावधीतच गावोगाव फिरत महिलांशी, शेतकऱ्यांशी, तरुणांशी थेट संवाद साधायला सुरुवात केली आहे. शासकीय योजनांची माहिती देणे, विधवा, निराधार, श्रमिक, दिव्यांग आणि शेतकरी कुटुंबांच्या अडचणी समजून घेणे आणि त्यावर प्रत्यक्ष उपाययोजना करण्याची त्यांची धडपड लोक अनुभवत आहेत. त्यांचे पती कमलाकर बालाजीराव फुले हे अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. तरुणांना एकत्र करून त्यांना योग्य सल्ला देणे, कोणताही कार्यक्रम असो वा एखाद्या कुटुंबाची अडचण असो “सगळ्यात आधी धावून जाणारे” नाव म्हणजे कमलाकर फुले, अशी ओळख स्थानिक पातळीवर तयार झाली आहे.कमलाकर फुले यांना कोणताही राजकीय वारसा लाभला नसला, तरी त्यांच्या कुटुंबाची समाजसेवेची परंपरा मजबूत आह...

*जनतेच्या मनात स्थान मिळवलेले लोकसेवक — राम नरसिंग बिरादार चवणहिप्परगेकर.*

*जनतेच्या मनात स्थान मिळवलेले लोकसेवक — राम नरसिंग बिरादार चवणहिप्परगेकर.* देवणी तालुक्यातील सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात आपला ठसा उमटविणारे नाव म्हणजे राम नरसिंग बिरादार चवण चवणहिप्परगेकर. विकासाची गती वाढविणे, समाजातील सर्व घटकांना समान न्याय मिळवून देणे आणि प्रत्येक घरापर्यंत प्रगतीचे किरण पोहोचवणे हा त्यांचा जीवनधर्म आहे.राम नरसिंग बिरादार हे केवळ राजकारणी नाहीत, तर एक सामाजिक कार्यकर्ते, शिक्षणप्रेमी आणि सेवाभावी व्यक्तिमत्व आहेत.रास्त भाव दुकानाचे चेअरमन म्हणून त्यांनी शेकडो गरीब कुटुंबांपर्यंत परवडणाऱ्या दरात अन्नधान्य पोहोचवले.कै. गंगाई बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे सचिव म्हणून समाजातील वंचित, दिव्यांग, विधवा आणि गरजू घटकांसाठी विविध उपक्रम राबवले. त्यांची साई इंग्लिश स्कूल, चवणहिप्परगा ही संस्था ग्रामीण भागात इंग्रजी माध्यमाचे दर्जेदार शिक्षण देणारी अग्रगण्य शाळा आहे. गावातील गरिब, शेतकरी आणि मजूर वर्गातील विद्यार्थ्यांना ते मोफत प्रवेश देतात, शैक्षणिक साहित्य आणि गणवेश स्वतःच्या खर्चाने देतात.“कोणतेही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये” ही त्यांची भूमिका अस...