*ग्रामीण भागात शिक्षणाचा विस्तार करणारे : प्राचार्य मनोहर पवार*
----------------------------------------
सोमठाणा ता. नायगाव जि. नांदेड या छोट्याशा गावात अतिशय गरीब कुटुंबात सामाजिक अस्तित्व नाकारलेल्या समाजात जन्माला आलेले मनोहर पवार यांनी पराकोटीची जिद्द,चिकाटी व अपार मेहनतीच्या बळावर अगदी वयाच्या 24 व्या वर्षी आपल्या गावात अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये शैक्षणिक संस्था सुरु करून शैक्षणिक चळवळ वाढीस नेली. परिणामी ग्रामीण भागातील विद्यार्थी शिकून सवरून आपल्या पायावर उभी राहिली.ग्रामीण भागात शिक्षणाचा विस्तार करणारे प्राचार्य मनोहर पवार यांचा आज 62 वा वाढदिवस. त्यानिमित्ताने त्यांचा थोडक्यात परिचय देणारा हा लेख...
मनोहर कलावतीबाई पुंडलिकराव पवार यांचा जन्म दि. 1 जून 1964 रोजी सोमठाणा ता. नायगाव येथे एका गरीब कुटुंबात झाला. घरची परिस्थिती अतिशय हलाखीची असतानाही केवळ जिद्द चिकाटीने त्यांनी शिक्षण घेतले. त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोमठाणा, माध्यमिक शिक्षण यशवंत हायस्कूल उमरी व महाविद्यालयीन शिक्षण नांदेड येथे झाले. पुढे टप्प्याटप्प्याने ते एम. ए. बी. एड. व आय. टी. आय. (ड्राफ्ट्समन मेकॅनिकल) सारखे शिक्षण त्यांनी पूर्ण केले. शिक्षण सुरू असतानाच त्यांना नांदेड येथे हजूर साहीब औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत वयाच्या 21व्या वर्षी शिल्प निदेशक पदावर नोकरी मिळाली.त्याठिकाणी त्यांनी तब्बल आठ वर्षे नोकरीं केली. सदरील नोकरी करीत असतानाच दरम्यानच्या काळात वयाच्या 24 व्या वर्षी म्हणजे 1988 मध्ये विद्याविकास शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली. 6 महिन्यांमध्ये त्या अंतर्गत जन्मगावी सोमठाणा येथे मा. दीनानाथ मंगेशकर हायस्कूलला शासनाची मान्यता मिळाली. या कार्यात त्यांच्या अशिक्षित आई-वडिलांचा सिंहाचा वाटा आहे.पुढे कालांतराने ज्युनिअर कॉलेज सुरू झाले व प्राचार्य पदावर विराजमान झाल्यानंतर मनोहररावांनी मागे वळून पाहिलेच नाही.
कालांतराने संत
पुंडलिक शैक्षणिक प्रतिष्ठान नावाची दुसरी संस्था स्थापन करून 2006 मध्ये राजर्षी शाहू महाराजांच्या नावाने.जवाहर नगर तुप्पा,हिप्परगा (जा) येथे २ हायस्कूल व कोलंबी येथे श्री. दत्त प्राथमिक शाळेची सुरुवात केली. त्यानंतर 2014 मध्ये सोमठाणा येथे वरिष्ठ महाविद्यालय व नांदेड येथे रात्र महाविद्यालयास स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची मंजुरी आणली. प्रारंभी प्राचार्य मनोहर पवार यांनी यांनी मा. दीनानाथ मंगेशकर हायस्कूल सोमठाणा येथे मुख्याध्यापक म्हणून रुजू झाले. त्यानंतर कनिष्ठ महाविदयालयाची मान्यता आल्यानंतर त्या महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून दीर्घकाळ सेवा करताना त्यांनी शाळा महाविद्यालयात विविध उपक्रम राबविले.त्या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न केला. गत अनेक वर्षांपासून या शाळेचे विद्यार्थी दहावी बारावी परीक्षेत प्रविण्यासह उत्तीर्ण होत असतात. ग्रामीण भागातून मुलींचे शिक्षण झाले पाहिजे यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले आणि त्याला यशही आले. कारण आज या शाळेतून शेकडो मुली शिक्षण घेवून पुढे उच्च शिक्षणही घेतले. त्यांचे अनेक विद्यार्थी डॉक्टर, इंजिनिअर, शिक्षक, प्राध्यापक व इतर क्षेत्रात कार्यरत आहेत. क्रीडा क्षेत्रातही या शाळेचे विद्यार्थी जिल्हा व राज्यस्तरावर मजल मारली.2004 मध्ये मा. दीनानाथ मंगेशकर हायस्कूल येथे जिल्हास्तरीय स्काउट आणि गाईड मेळाव्याचे प्राचार्य पवार यांनी आयोजन केले होते. 2005 ते 2008 या तीन वर्षाच्या कालावधीत जिल्हा शिक्षण मंडळावर संचालक म्हणून बहुमताने विजयी झाल्यानंतर यशस्वीपणे काम केले. काही काळ नायगाव तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष म्हणूनही प्रभावीपणे काम केले.शाळेमध्ये विविध उपक्रम राबवून त्या माध्यमातून विविध विषयावर प्रबोधन घडवून आणले. शिक्षण क्षेत्रात दीर्घकाळ अधिराज्य गाजवल्यानंतर तब्बल 38 वर्षे सेवा करून २०२२ मध्ये नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले.
प्राचार्य पवार यांनी शैक्षणिक कार्याबरोबरच सामाजिक व राजकीय कार्य केले. समाजातील अनेक विद्यार्थ्यास त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेण्यास मदत केली.सामाजिक जाणीवा जपत प्राचार्य पवार हे अनेकांना मदत करीत असतात.राज्याचे नेते माजी मुख्यमंत्री विद्यमान खा. अशोकरावजी चव्हाण यांचे ते कट्टर समर्थक असून काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्यांनी सातत्यपूर्ण कार्य केले.सोमठाणा परिसर व तालुक्यात सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून त्यांनी कार्य केले. समाजातील अनेक गरजू विद्यार्थ्यांना ते मार्गदर्शन करीत असतात. अनेक धार्मिक कार्याला त्यांनी निधी मंजूर करून आणला. अनेक धम्म परिषदा आयोजित करून त्यांनी सामाजिक व धार्मिक कार्यात योगदान दिले.खा.
अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काम करताना पक्षांच्या नेत्या सोबत व कार्यकर्त्या सोबत स्नेहाचे संबंध राहिलेले आहेत.
सोमठाणा या गावच्या ग्रामपंचायत व सेवा सोसायटीच्या राजकारणामध्ये अनेक वर्ष नेतृत्व करण्याची संधी मिळाली व आपल्या कामाची चूणूक त्यांना दाखवता आली. 2017 मध्ये नायगाव पंचायत समितीच्या सभापतीपदी त्यांच्या सौभाग्यवती सौ वंदना मनोहर पवार यांना काम करण्याचा मान मिळाला.2023 साली नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जातीच्या जिल्हाध्यक्षपदी प्राचार्य पवार यांची नियुक्ती झाली अन त्यांना जिल्हाभर काम करण्याची संधी मिळाली. पुढे खासदार अशोकराव चव्हाण साहेबांनी काँग्रेस पक्षाचा त्याग करून भारतीय जनता पक्षा मध्ये प्रवेश केला त्याच क्षणी प्राचार्य मनोहर पवार यांनी सुद्धा आपल्या एकनिष्ठतेचा प्रत्यय दिला आणि त्यांनीही भाजपामध्ये प्रवेश केला. भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यानी स्थानिक भाजपा आमदार राजेशजी पवार यांच्या समवेत कार्य करीत आहेत.निवडणुका असो किंवा पक्षातील नेत्यांचे कार्यक्रम असो नायगाव मतदार संघात आ. राजेश पवार साहेबांच्या सोबत ते सातत्याने कार्यरत असतात. सध्या ते भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत असून या माध्यमातूनही ते सक्रिय कार्य करीत आहेत.
प्राचार्य मनोहर पवार यांच्या एकूणच शैक्षणिक कार्याची नोंद घेवून 2002 मध्ये पंचायत समिती बिलोली चा तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार, 2003 मध्ये नांदेड जिल्हा परिषदेचा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार, तसेच 2004 मध्ये भारतीय दलित साहित्य अकॅडमी नवी दिल्लीचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर फेलोशिप त्यांना प्राप्त झाला. जीवनात म.बसवेश्वर, छत्रपती शिवराय,महात्मा फुले, राजर्षीशाहू, डॉ.बाबासाहेबआंबेडकर, अण्णाभाऊ साठे यांना आदर्श मानणारे समविचारी मावळ्यांना सोबत घेऊन प्राचार्य मनोहर पवार यांना भविष्यातील राजकारणाच्या माध्यमातून शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात भरीव असे कार्य करायचे आहे.त्यांचे शुभ संकल्प यशस्वी होवो.त्यांचा आज ६2 वा *वाढदिवस त्यानिमित्ताने त्यांना शुभेच्छा देऊया!
*शंकर बोईनवाड,उदगीर*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा