शिक्षण व सामाजिक कार्यातील अग्रेसर व्यक्तीमत्व : श्री. भूकेवाड डी. एन*
----------------------------------------
ध्येयाने प्रेरीत होवून कार्य करणारे अनेक मुख्याध्यापक शाळा आणि विद्यार्थी यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. विविध उपक्रम व योजना राबवत विद्यार्थी आणि शाळेचा विकास साधण्यात ते यशस्वी होत असतात. असेच एक मुख्याध्यापक श्री. भूकेवाड दत्तात्रय नारायणराव हे शिक्षण आणि सामाजिक कार्यात सतत अग्रेसर असतात. उत्कृष्ट अशी शैक्षणिक सेवा देत हजारो विद्यार्थी घडवून सेवेतून निवृत्त झाले. एक त्यांचा वाढदिवस त्यानिमित्ताने त्यांचा थोडक्यात परिचय देणारा हा लेख....
श्री. भूकेवाड दत्तात्रय नारायणराव यांचा जन्म दि.१२ ऑगस्ट १९६६ रोजी सावरगांव ता.देवणी जि. लातूर येथे एका सामान्य शेतकरी कुटूंबात झाला, त्यांचे वडील निरक्षर शेतकरी पण आजी राधाबाई डोपेवाड यांच्या प्रेरणेने सर शिक्षणाकडे वळले. त्यांचे प्राथमिक ते माध्यमिक पर्यंतचे शिक्षण जि.प. कें.प्रा. शाळा सावरगांव व उद्देश्वर विद्यालय सावरगांव येथे झाले. उच्च माध्यमिक शिक्षण शिवाजी महाविद्यालय उदगीर येथे झाले. त्यानंतर शासकीय अध्यापक विद्यालय मुरुड ता. जि. लातूर येथे त्यांनी अध्यापन पदवीका प्राप्त केली. टिळक महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ पुणे अंतर्गत सोलापूर येथे त्यांनी पदवीचे शिक्षण प्राप्त केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद अंतर्गत त्यांनी अध्यापन पदवी प्राप्त केली. श्री. भूकेवाड सरांनी मुरूड येथे अध्यापन पदवीका प्राप्त केल्यानंतर दि.३ ऑगस्ट १९८८ रोजी सामनगांव ता. लातूर येथील जि.प.प्रा. शाळेवर शिक्षक म्हणून रूजू झाले. तेथे त्यांनी एक वर्षे सेवा दिली. त्यानंतर जि.प.प्रा.शा.गुळखेडा ता. औसा येथे १९८९ मध्ये रूजू झाले. तेथून १९९८ ते २००१ पर्यंत बिरवली ता. औसा येथे पदोन्नत मुख्याध्यापक म्हणून सेवा दिली. २००१ ला ते जि.प.प्रा.शा. घोणसी ता. जळकोट येथे ४ वर्षे सेवा दिली. २००५ ला जि.प.प्रा.शा.
गौडगांव जि.प. शाळेवर मुख्याध्यापक म्हणून सेवा दिली.त्यानंतर जि. प. प्रा. शाळा शिऊर येथे मुख्याद्यापक म्हणून सेवा निवृत्त झाले.
श्री. भूकेवाड यांनी शिक्षक म्हणून रूजू झाल्यानंतर
विद्यार्थी आणि शाळेचा विकास साधण्याचा सतत प्रयत्न केला, कुठल्याही शाळेवर सेवेत असो विद्यार्थ्यांची प्रगती हेच त्यांचे ध्येय होते. सामणगाव जि.प. शाळेवर सेवेत असताना शिक्षणाबरोबर कुटूंब नियोजन, वृक्षारोपण या कार्यक्रमात महत्वपूर्ण कार्य केले. या शाळेवर शाळा सजावट वृक्ष लागवड, शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रयत्न केले. गुळखेडा येथे त्यांनी प्रौढ शिक्षणाचे महत्वाचे कार्य केले. गावातील निरक्षर लोकांची रात्रीचे वर्ग घेवून अनेकांना साक्षर केले. या कार्यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी प्रविण परदेशी यांचे हस्ते त्यांना प्रशस्तीपत्रही मिळाले. किल्लारी येथे झालेल्या भूकंपामध्ये भूकंपग्रस्तासाठी त्यांनी केलेले कार्यही महत्वाचे आहे. या काळात त्यांनी दोन-तीन वर्षे माळरानावर राहून भूकंपग्रस्तांना मानसिक आधार दिला. सर्व्हे करून अनेक भूकंपग्रस्तांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. अनेक भूकंपग्रस्तांना पाठपुराव्या अभावी न्याय मिळाला नाही. अशा अनेकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. जनगणनेचे कार्य उत्कृष्टरित्या केले. गांव १०० टक्के साक्षर करण्याचा प्रयत्न केले.
बिरवली येथे असतांना नुकतेच शालेय पोषण आहाराची सुरूवात झाली होती. या काळात शालेय पोषण आहाराची वाटप, नोंद योग्य प्रकारे केली. शाळेत वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबविला, गोरगरीब होतकरू विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप केले. मुलींची १००% उपस्थिती केली. दोन कि. मी. पासून मुले मुली शाळेला येत असत. डोणगांव जि.प. शाळा ता. जळकोट येथे सेवेत असताना दोन शाळा खोल्याचे
बांधकाम केले, पालकांचे प्रबोधन करून मुले-मुली शाळेत पाठवण्यासाठी प्रवृत्त
केले. घरोघर जावून शिक्षणाचे महत्व पटवून दिले, मुलांची उपस्थिती वाढवली. मुलांना पुस्तके, गणवेश वाटप केले. या शाळेत शिष्यवृत्ती व नवोदय वर्गाची जादा
तासिका घेतल्या. मुलांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न केले. शासनाच्या वतीने शाळेत राबविल्या जाणाऱ्या योजना सक्षमपणे राबविल्या. त्यानंतर जि.प.के. प्रा. शाळा गौंडगांव ता. देवणी येथे विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न केले. शिष्यवृत्ती वर्गाच्या जादा तासिका घेतल्या. २०११-२०१२ मध्ये या शाळेत तीन विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक बनले. २०१४- २०१५ मध्ये १४ विद्याथी शिष्यवृत्तीधारक बनले. त्यातील ६ विद्यार्थी जिल्ह्यात प्रथम आले. विज्ञान प्रदर्शनातही या शाळेचे विद्यार्थी जिल्हास्तरावर पोहोचले. देवणी फेस्टीव्हलमध्ये या शाळेचे विद्यार्थी गीत मंचात प्रथम आली. या शाळेत वार्षिक स्नेह संमेलनाचे आयोजन करून नृत्य, गायन, समुहगान, वक्तृत्व, भावगीत, अभंग इत्यादी स्पर्धांचे आयोजन करून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव दिला जातो. क्रिडा स्पर्धेत या शाळेचे विद्यार्थी खो खो, कबड्डीमध्ये तालुकास्तरावर पोहोचले. सरांनी जिल्हास्तरीय क्रिडा स्पर्धेचे संचलन केले होते. या शाळेचे विद्यार्थी स्काऊट, गाईडच्या तालुकास्तरीय मेळाव्यात सहभागी होतात. या शाळेत मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण केले जाते. गुणवत्ता वाढीबद्दल शिक्षणाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले होते. या शाळेत मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण केले.वक्तृत्व स्पर्धेत या शाळेच्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरावर प्रथम पुरस्कार प्राप्त केला होता. २०१५-१६ मध्ये लोकसहभागातून घेण्यात आला. भविष्यात या शाळेला आय.एस.ओ. मानांकन मिळविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. अप्रगत विद्यार्थ्यांना प्रगत करून शाळेच्या प्रवाहात आणणे, १०० टक्के उपस्थिती, साक्षर, सद्या पहिलीपर्यंत सेमी इंग्रजी माध्यम आहे. ते सातवीपर्यंत आणण्याचा त्यांचा मानस आहे. श्री. भूकेवाड सरांनी शैक्षणिक कार्य करताना समाजासाठीही जाणिवपूर्वक कार्य केले.तोगरी व गौंडगांव येथे महर्षी वाल्मिकी ऋषी जयंतीचे आयोजन करून महाप्रसादाचा कार्यक्रम घेतला, समाजाच्या बैठकीसाठी अनेकदा उपस्थिती लावली. १९८७ मध्ये विविध मागण्यासाठी समाजाच्या वतीने आयोजीत मोर्चात सहभाग नोंदविला. औरंगाबाद येथील विभागीय कार्यालयासमोर आयोजीत मोर्चात सहभाग नोंदवला. स्वगावी सावरगांव येथे गणेश उत्सवानिमित्त टॅलेंट सर्च परीक्षा, गीतगायन, वक्तृत्व, रांगोळी स्पर्धाचे आयोजन करून स्वखर्चाने बक्षीस वाटप करतात. त्यांनी गावामध्ये स्वखर्चातून गाव व परिसर हगणदारीमुक्त करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या प्रेरणेने गावात अनेक शौचालय बांधण्यात आली. सरांना वाचन, संगित व सामाजिक कार्याची आवड आहे. वृक्षलागवड व विविध पत्राचे कात्रण गोळा करणे ही आवडही त्यांनी जोपासली. सरांनी नुकतेच दिपावली निमित्त स्वच्छतेचे संदेश देणारे कार्ड वाटप करून स्वच्छतेसाठी प्रबोधन केले. त्यांच्या एकूणच कार्याची नांद घेवून अनेक संस्थांनी त्यांना सन्मानीत केले. शासनाचा वृक्षलागवडीचा वनविभागाचा विभागीय पुरस्कार, विविध कार्यासाठी जिल्हाधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी व शिक्षण अधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान प्राप्त झाला. स्वच्छता अभियानासाठी सावरगांव ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने त्यांना सन्मानीत करण्यात आले. शिक्षक पतसंस्थेच्या वतीनेही त्यांना गौरविण्यात आले. नुकतेच ई-लर्निंगच्या उद्घाटन प्रसंगी ग्रमापंचायत गौंडगांव व जि.प.कें.प्रा.शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. श्री. भूकेवाड सरांनी शैक्षणिक व सामाजिक कार्य करीत असतांना आपल्या मुलांच्या शिक्षणाकडेही जाणिवपूर्वक लक्ष दिले. त्यांचा मोठा मुलगा विनोद दत्तात्रय भूकेवाड हे पदव्यूत्तर शिक्षण घेवून अतिरीक्त पोलीस कार्यालय मुंबई येथे चांगल्या पदावर कार्यरत होते. सध्या मंत्रालयात ते कक्ष अधिकारी आहेत.तर मुलगी अनिता ही पूणे विद्यापीठातून एम.ए.बी.एड्. पर्यंत शिक्षण घेवून सद्या रोहा जि. रायगड येथे तलाठी- म्हणून सेवेत आहे. तर छोटा मुलगा विवेकानंद दत्तात्रय भूकेवाड हा एम. एस्सी. पर्यंत शिक्षण घेवून सद्या यु.पी.एस.सीची पूणे येथे तयारी करतोय. त्यांच्या प्रत्येक कार्यात पत्नी लक्ष्मीबाई दत्तात्रय भूकेवाड यांचे वेळोवेळी सहकार्य लाभते. जीवनात स्वामी विवेकानंद, डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना आदर्श मानणारे भूकेवाड सरांना भविष्यात सेवानिवृती नंतर शासनाच्या विविध योजनेच्या माध्यमातून अनेक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा मानस आहे. आज ते प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. आज सरांचा वाढदिवस त्यानिमित्ताने त्यांना शुभेच्छा देऊया!
* *शंकर बोईनवाड*
*पत्रकार, उदगीर*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा