मुख्य सामग्रीवर वगळा

उत्कृष्ट वक्ते, आदर्श शिक्षक : श्री. रमेश भालेराव*

उत्कृष्ट वक्ते, आदर्श शिक्षक : श्री. रमेश भालेराव
------------------------------------
     शिक्षण, सामाजिक, राजकीय व कलाक्षेत्राचा वारसा लाभलेले श्री. रमेश महाजन भालेराव यांना महात्मा ज्योतीराव फुले शिक्षक परिषद महाराष्ट्र च्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार आज नांदेड येथील कुसुम सभागृहात मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने श्री. रमेश भालेराव यांचा थोडक्यात परिचय देणारा हा लेख...
      श्री. रमेश महाजन भालेराव यांचा जन्म नायगाव ( बा.)जि. नांदेड येथे एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला.वडील महाजनराव भालेराव हे शेतीनिष्ठ शेतकरी होते. आपले वडील बंधू जिल्हा बँकेतील अधिकारी श्री. रवींद्र भालेराव यांच्या मार्गदर्शनाने श्री. रमेश भालेराव हे शिक्षण घेत राहिले. त्यांचे प्राथमिक ते पदवीपर्यंतचे शिक्षण नायगाव येथे झाले. त्यानंतर एम. ए. बी. एड. पर्यंतचे शिक्षण त्यांनी देगलूर व नांदेड येथून घेतले. आपले शिक्षण संपल्यावर श्री. भालेराव सर हे 2009 मध्ये ईश्वर माध्यमिक विद्यालय सावरगाव ( थोट ) ता. अहमदपूर जि. लातूर येथे हिंदी विषयांचे अध्यापक म्हणून रुजू झाले. येथे रुजू झाल्यावर विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून त्यांनी प्रामाणिकपणे विद्यार्थी घडविण्याचा प्रयत्न केला. येथे विद्यादानाचे काम करीत असतानाच श्री. भालेराव सरांनी शाळेतील वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम व इतर महत्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलना निमित्त सर्व कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचलनाची जबाबदारी ते पार पाडतात.शाळेमध्ये महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथीचे आयोजन करून भाषण स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थी घडवीत असतात.शाळेची शैक्षणिक सहल असेल, विविध स्पर्धा परीक्षा असतील त्या व्यवस्थित पार पाडण्याच्या दृष्टीने ते प्रयत्न करतात. शाळेतील गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करीत, त्यांच्या अडिअडचणी सोडवत त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला. विविध सामाजिक कार्यात हिरीरीने भाग घेऊन सामाजिक कार्य करण्याचा प्रयत्न करतात.लहुजी साळवे कर्मचारी महासंघाचे लातूर जिल्हा उपाध्यक्ष म्हणून भालेराव कार्यरत आहेत. या माध्यमातूनही ते शिक्षकांच्या अडिअडचणी सोडवण्याचा प्रयत्न करतात. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेला वेळोवेळी मार्गदर्शन करून अंधश्रद्धा निर्मूलन करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
   श्री. भालेराव सर हे गेल्या 15 वर्षांपासून सामाजिक कार्यात सहभागी आहेत. अहमदपूर तालुक्यात वेगवेगळ्या शाळा, महाविद्यालय व सार्वजनिक ठिकाणी महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी निमित्त वक्ते म्हणून उपस्थित राहून जनजागृती, प्रबोधन करण्याचे कार्य ते करतात. नांदेड व परभणी आकाशवाणी केंद्रावरून त्यांचे अनेक विषयावर भाषण, कार्यक्रम सातत्याने प्रसारित होत असतात . त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची नोंद घेवून त्यांना अनेक संस्थानी पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. राष्ट्रीय मूल निवासी बहुजन कर्मचारी संघाच्या वतीने त्यांना राज्यस्तरीय "डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार". आदर्श शिक्षक समिती लातूर च्या वतीने "महात्मा जोतिबा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार" तसेच साऊ ज्योती सामाजिक फाउंडेशन पुणे यांच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार , दर्पण कार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संस्था नाशिकच्या वतीने "राष्ट्रीय कर्मयोगी पुरस्कार." मायडी बहुउद्देशीय संस्था नांदेड यांच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार , रोटरी क्लब ऑफ अहमदपूरच्या वतीने राज्याचे मंत्री मा. बाबासाहेब पाटील यांचे हस्ते राष्ट्र शिल्पकार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. असे अनेक सन्मान त्यांच्या नावे आहेत. जीवनामध्ये आईवडिलांचा आशीर्वाद, वडील बंधू जिल्हा बँकेचे सेवानिवृत्त अधिकारी श्री. रवींद्र भालेराव, भावजय नायगाव पंचायत समितीच्या माजी सभापती सौ. ललिता रवींद्र भालेराव, छोटे बंधू मराठी चित्रपटातील विनोदी अभिनेते ज्युनिअर जॉनी लिवर रामेश्वर यांचे मार्गदर्शन, सहकार्य, प्रेम सोबत आहे. नायगाव येथील सामाजिक व राजकीय दृष्ट्या यांचे कुटुंब सर्व परिचित आहे. या सर्व कामासाठी मदत करणारी सहचारिणी सौ. नीलिमा भालेराव आणि परिवारातील सर्वजण श्री. रमेश भालेराव यांच्यासाठी प्रेरणादायी आहे.. अशा उत्कृष्ट वक्ता, सामाजिक कार्यकर्ते,आदर्श शिक्षक श्री. रमेश भालेराव सरांना आज नांदेड येथे महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषदेच्या वतीने '"राज्यस्तरीय शिक्षक" पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा! व अभिनंदन...

    *शंकर बोईनवाड*
    *पत्रकार, उदगीर*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

*“एक संसार, दोन शिक्षक… आणि समाजासाठी आयुष्यभराची शिदोरी”*

*“एक संसार, दोन शिक्षक… आणि समाजासाठी आयुष्यभराची शिदोरी”*   आजचा दिवस श्री. सुनील शांतप्पा क्षीरसागर (माजी मुख्याध्यापक) आणि सौ. मिनाक्षी सुनील क्षीरसागर यांच्या आयुष्यातील एक अत्यंत गौरवशाली क्षण आहे. त्यांच्या विवाहाला आज ३३ वर्षे पूर्ण होत असून, हा केवळ वैवाहिक सहजीवनाचा टप्पा नाही, तर संस्कार, शिक्षण, संयम आणि सामाजिक बांधिलकीने समृद्ध झालेल्या सहप्रवासाचा उत्सव आहे. दोघेही उच्चशिक्षित, पेशाने शिक्षक आणि विचाराने समाजघडविणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. शिक्षक हा केवळ व्यवसाय नसून तो एक संस्कार आहे, हे त्यांनी आपल्या आयुष्यभराच्या कार्यातून दाखवून दिले. अध्यापन, शिस्त, विद्यार्थ्यांच्या जडणघडणीसाठी केलेले प्रयत्न आणि शिक्षणव्यवस्थेतील निष्ठा या साऱ्या बाबी त्यांच्या कार्यकाळात ठळकपणे जाणवतात. त्यांच्या जीवनप्रवासाकडे पाहताना आपसूकच हे शब्द आठवतात   *शब्दांनी शिकवलं नाही, जगून दाखवलं ज्ञान,वर्गात घडले विद्यार्थी, घरात फुलला सन्मान,३३ वर्षांचा हा प्रवास — संस्कारांचीच ओळख पटवणारा महान* .* श्री. सुनील क्षीरसागर यांनी मुख्याध्यापक म्हणून कार्य करताना के...

*दावनगाव गणातून सर्वसामान्यांची उमेदवार म्हणून पुढे आलेल्या – सौ. कोमल कमलाकर फुले*

*दावनगाव गणातून सर्वसामान्यांची उमेदवार म्हणून पुढे आलेल्या – सौ. कोमल कमलाकर फुले* दावनगाव गण पंचायत समिती निवडणुकीत सौ. कोमल कमलाकर फुले या सर्वसामान्यांच्या, विशेषतः महिलांच्या आवाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या उमेदवार म्हणून पुढे आल्या आहेत. साधी, सुज्ञ आणि तळागाळाशी जोडलेली असल्यामुळे त्यांचा लोकांत वेगळाच ओढा निर्माण झाला आहे. सौ. कोमल फुले यांनी अल्पावधीतच गावोगाव फिरत महिलांशी, शेतकऱ्यांशी, तरुणांशी थेट संवाद साधायला सुरुवात केली आहे. शासकीय योजनांची माहिती देणे, विधवा, निराधार, श्रमिक, दिव्यांग आणि शेतकरी कुटुंबांच्या अडचणी समजून घेणे आणि त्यावर प्रत्यक्ष उपाययोजना करण्याची त्यांची धडपड लोक अनुभवत आहेत. त्यांचे पती कमलाकर बालाजीराव फुले हे अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. तरुणांना एकत्र करून त्यांना योग्य सल्ला देणे, कोणताही कार्यक्रम असो वा एखाद्या कुटुंबाची अडचण असो “सगळ्यात आधी धावून जाणारे” नाव म्हणजे कमलाकर फुले, अशी ओळख स्थानिक पातळीवर तयार झाली आहे.कमलाकर फुले यांना कोणताही राजकीय वारसा लाभला नसला, तरी त्यांच्या कुटुंबाची समाजसेवेची परंपरा मजबूत आह...

*जनतेच्या मनात स्थान मिळवलेले लोकसेवक — राम नरसिंग बिरादार चवणहिप्परगेकर.*

*जनतेच्या मनात स्थान मिळवलेले लोकसेवक — राम नरसिंग बिरादार चवणहिप्परगेकर.* देवणी तालुक्यातील सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात आपला ठसा उमटविणारे नाव म्हणजे राम नरसिंग बिरादार चवण चवणहिप्परगेकर. विकासाची गती वाढविणे, समाजातील सर्व घटकांना समान न्याय मिळवून देणे आणि प्रत्येक घरापर्यंत प्रगतीचे किरण पोहोचवणे हा त्यांचा जीवनधर्म आहे.राम नरसिंग बिरादार हे केवळ राजकारणी नाहीत, तर एक सामाजिक कार्यकर्ते, शिक्षणप्रेमी आणि सेवाभावी व्यक्तिमत्व आहेत.रास्त भाव दुकानाचे चेअरमन म्हणून त्यांनी शेकडो गरीब कुटुंबांपर्यंत परवडणाऱ्या दरात अन्नधान्य पोहोचवले.कै. गंगाई बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे सचिव म्हणून समाजातील वंचित, दिव्यांग, विधवा आणि गरजू घटकांसाठी विविध उपक्रम राबवले. त्यांची साई इंग्लिश स्कूल, चवणहिप्परगा ही संस्था ग्रामीण भागात इंग्रजी माध्यमाचे दर्जेदार शिक्षण देणारी अग्रगण्य शाळा आहे. गावातील गरिब, शेतकरी आणि मजूर वर्गातील विद्यार्थ्यांना ते मोफत प्रवेश देतात, शैक्षणिक साहित्य आणि गणवेश स्वतःच्या खर्चाने देतात.“कोणतेही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये” ही त्यांची भूमिका अस...