*स्वामी विवेकानंद गणेश मंडळाच्या वतीने भव्य रक्तदान शिबीर संपन्न*
------------------------------------
उदगीर / प्रतिनिधी : गेल्या अनेक वर्षांपासून सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून, उत्कृष्ठ देखावे सादर करीत उदगीरकरांचे लक्ष वेधणारे नाईक चौक येथील स्वामी विवेकानंद गणेश मंडळाच्या वतीने दि. 16 सप्टेंबर रोजी भव्य अशा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या भव्य रक्तदान शिबिराचे उदघाटन डॉ. मदने, डॉ. कोठारे, डॉ. सचिन टाले, डॉ. व्यंकटेश वट्टमवार यांचे हस्ते करण्यात आले. या रक्तदान शिबिराचे वैशिष्टये म्हणजे रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यास गणेश मंडळाच्या वतीने मोफत हेल्मेटचे वाटप करण्यात आले. या शिबिरात 38 रक्तदात्यांनी रक्तदान केले. या भव्य रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी स्वामी विवेकानंद चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष उदयसिंह ठाकूर, गणेश मंडळाचे अध्यक्ष संगम उप्परबावडे, उपाध्यक्ष विकास जाधव, सचिव शैलेश कोंढेकर, सहसचिव सुनील चव्हाण, अशोक राठोड, कोषाध्यक्ष सतीश कंचे, कार्याध्यक्ष सुनील कारभारी, स्वागताध्यक्ष सुशील संगुळगे, सहकोषाध्यक्ष रामदास बेंबडे माजी अध्यक्ष राहुल आडे ,मा.अध्यक्ष राहूल सातापूरे,माजी अध्यक्ष विनीत पाटील, प्रशांत बिरादार, महेश स्वामी,यांच्यासह पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले. रक्तदान शिबिरानंतर लगेचच मान्यवरांच्या हस्ते रक्तदात्यांना मोफत हेल्मेटचे वाटप करण्यात आले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा