*बोरोळ जिल्हा परिषद गटात भाजपचे धोंडराज किशनराव गुणालेची प्रचारात बाजी विरोधकांचे धाबे दणाणले - बालाजी सूर्यवंशी देवणीकर* .
*बोरोळ जिल्हा परिषद गटात भाजपचे धोंडराज किशनराव गुणालेची प्रचारात बाजी विरोधकांचे धाबे दणाणले - बालाजी सूर्यवंशी देवणीकर* .
---------------------
*देवणी* तालुक्यातील बोरोळ जिला परिषद मतदार संघात भारतीय जनता पक्षाची मोठी लाट निर्माण झाली आहे धोंडराज गुणाले यांची विजयाकडे वाटचाल चालू आहे त्यामुळे विरोधकांचे धाबे दनाणाले आहेत असे मत भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे शहराध्यक्ष बालाजी सूर्यवंशी देवणीकर यांनी व्यक्त केले
देवणी तालुक्यात सध्या होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात आहेत भारतीय जनता पक्षाने कमळ चिन्हाच्या जोरावर गावोगावी पकड मजबूत केली असून, बोरोळ जिल्हा परिषद गटात भाजपचे अधिकृत उमेदवार धोंडराज किशनराव गुणाले हे प्रचारात स्पष्टपणे पुढे असल्याचे चित्र दिसत आहे. शेवटच्या टप्प्यात गुणाले यांनी घेतलेली मेहनत, सततचा जनसंपर्क, कार्यकर्त्यांची फौज आणि तालुक्यात झालेली विकासकामे यामुळे विरोधकांची धावपळ वाढली असून प्रचाराची दिशा पूर्णपणे भाजपच्या बाजूने वळली आहे. धोंडराज किशनराव गुणाले हे केवळ उमेदवार म्हणून नव्हे, तर कामातून ओळख निर्माण केलेले नेतृत्व म्हणून ओळखले जात आहेत. बोरोळ गटात रस्ते, शिवार व पाणंद रस्ते, पाणीपुरवठा योजना, घरकुल, स्मशानभूमी विकास, सार्वजनिक इमारती, दिवाबत्ती तसेच विविध वैयक्तिक लाभाच्या योजना या सर्व कामांसाठी आलेला भरीव निधी हा भाजप सरकारच्या माध्यमातूनच मिळाल्याचे मतदार आवर्जून सांगत आहेत. त्यामुळे “बोलणं कमी आणि काम जास्त” हीच राज गुणाले यांची ओळख ठरत आहे.देवणी तालुक्यातील प्रत्येक गावात भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून विकासकामांचा ठसा उमटलेला आहे. पिण्याच्या पाण्याच्या योजना, ग्रामीण रस्ते, शेतीपूरक सुविधा, आरोग्य सेवा, शाळा व अंगणवाडी इमारती, सामाजिक सभागृहे यासाठी तालुकाभरात कोट्यवधींचा निधी आला, याची जाणीव सामान्य जनतेला आहे. याच कामांचा विश्वास घेऊन धोंडराज किशनराव गुणाले यांनी प्रचार अधिक तीव्र केला असून, कमळ चिन्ह म्हणजे विकासाचा भरवसा अशी भावना गटात बळावत चालली आहे.या संदर्भात भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे शहराध्यक्ष बालाजी सूर्यवंशी यांनी स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली आहे.
ते म्हणाले,“आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर आणि अरविंद भैय्या पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपने देवणी तालुक्यात विकासाचा भक्कम पाया घातला आहे. बोरोळ जिल्हा परिषद गटात धोंडराज किशनराव गुणाले हे त्या विकासकामांचे विश्वासार्ह प्रतिनिधी आहेत. त्यामुळे या गटात भाजपचा विजय निश्चित आहे.”
बालाजी सूर्यवंशी यांनी पुढे सांगितले की,“भारतीय जनता पक्ष ही केवळ निवडणुकीपुरती मर्यादित नसून कार्यकर्ता, शेतकरी, महिला, युवक आणि सर्वसामान्य माणसासाठी काम करणारी संघटना आहे. धोंडराज किशनराव गुणाले यांनी प्रचारात जी मेहनत घेतली आहे, ती पाहता बोरोळ गटात कमळ चिन्हावर जनतेचा भरभरून कौल मिळणार आहे.” शेवटच्या टप्प्यात भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि युवक मोठ्या संख्येने प्रचारात उतरले असून, घराघरांत जाऊन विकासकामांचा लेखाजोखा मांडला जात आहे. त्यामुळे बोरोळ जिल्हा परिषद गटात भाजपची आघाडी दिवसेंदिवस घट्ट होत चालली आहे, तर विरोधकांकडे ठोस मुद्द्यांचा अभाव जाणवत आहे.एकूणच, देवणी तालुक्यातील विकासकामांचा विश्वास, मजबूत संघटनात्मक बांधणी आणि कमळ चिन्हाची ताकद यामुळे बोरोळ जिल्हा परिषद गटात धोंडराज किशनराव गुणाले यांचा विजयाचा प्रवास अंतिम टप्प्यात पोहोचल्याची चर्चा सर्वत्र ऐकू येत आहे.
*दयानंद कांबळे नागराळकर*
7887827886
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा