*“गावासाठी झटणारं नेतृत्व हवं असेल तर हातात हात द्या – सुरेखा सोनकाबळे”*
देवणी तालुक्यातील जवळगा पंचायत समिती गणामध्ये यंदाची निवडणूक ही केवळ पदासाठी नसून, विकास, विश्वास आणि सामाजिक बांधिलकी या मूल्यांवर होणारी निवडणूक ठरत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार सुरेखा यशवंत सोनकाबळे या सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेल्या, शांत पण ठाम नेतृत्व म्हणून जनतेच्या विश्वासाचे केंद्र बनत आहेत.काँग्रेस पक्षाची ओळख ही नेहमीच गोरगरीब, शेतकरी, महिला, विद्यार्थी आणि सर्वसामान्य माणसाच्या पाठीशी उभे राहणारी राहिली आहे. हात हे निवडणूक चिन्ह केवळ एक चिन्ह नसून, तो आधार, मदत आणि विकासाचा हात आहे. याच विचारधारेतून सुरेखा सोनकाबळे या जवळगा गणात काम करण्याचा निर्धार व्यक्त करत आहेत.ग्रामीण भागातील पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण आणि महिलांचे प्रश्न यांची त्यांना प्रत्यक्ष जाणीव आहे. “गावापर्यंत विकासाची गंगा पोहोचवायची” ही त्यांची स्पष्ट भूमिका असून, प्रशासनाकडून होणारी दिरंगाई थांबवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्याचा त्यांचा मानस आहे.
महिलांना सक्षम करणे हेच खरे परिवर्तन असल्याचा त्यांचा ठाम विश्वास आहे. महिला बचतगट, स्वयंरोजगार, शासकीय योजनांचा लाभ, रोजगाराच्या संधी यासाठी त्या विशेष प्रयत्न करणार आहेत. महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या, तर संपूर्ण कुटुंब आणि गाव सक्षम होते, ही काँग्रेसची जुनी आणि ठाम भूमिका आहे.शिक्षणाच्या बाबतीतही सुरेखा सोनकाबळे यांचे पहिले प्राधान्य स्पष्ट आहे. जिल्हा परिषद शाळा स्मार्ट करणे, विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण व सुविधा देणे यासाठी त्या सक्रिय भूमिका घेणार आहेत. ग्रामीण विद्यार्थ्यांनी शहरातील विद्यार्थ्यांइतक्याच संधी मिळाव्यात, हा त्यांचा दृष्टिकोन आहे.
या सगळ्या विकासदृष्टीमागे माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांच्या विचारांचा वारसा असल्याचे स्थानिक कार्यकर्ते सांगतात. गोरगरीबांसाठी झटणारे, विकासाला मानवी चेहरा देणारे नेते म्हणून विलासराव देशमुख यांचे कार्य आजही प्रेरणादायी आहे. त्याच विचारधारेतून आज आमदार अमित विलासराव देशमुख हे लातूर जिल्ह्याच्या विकासासाठी सातत्याने काम करत असून, ग्रामीण भागासाठी निधी, योजना आणि सुविधा आणण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची ठरत आहे.काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अभय साळुंखे यांचे मार्गदर्शन आणि संघटनात्मक पाठबळही या भागाला लाभत आहे. पक्ष संघटना मजबूत ठेवत कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम करण्याची परंपरा या नेतृत्वामुळे कायम आहे.नम्रता, शील, संयम आणि शांत स्वभाव ही सुरेखा सोनकाबळे यांच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख आहे. गाजावाजा न करता, शब्दांपेक्षा कामावर विश्वास ठेवणारे हे नेतृत्व म्हणून त्या ओळखल्या जात आहेत. त्यामुळेच जवळगा पंचायत समिती गणात काँग्रेसच्या हातात विकास सुरक्षित अशी भावना ग्रामस्थांमध्ये दृढ होत चालली आहे.
यंदाची निवडणूक ही भावनांवर नव्हे, तर काम, विचारधारा आणि विश्वासावर होणार असल्याची चर्चा गावागावात सुरू आहे. आणि म्हणूनच जवळगा गणात
“हातात विकास, मनात विश्वास”
अशी भावना अधिक ठळकपणे उमटताना दिसत आहे.
दयानंद कांबळे नागराळकर
7887827886
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा