*गजानन भोपणीकरांनी शैक्षणिक क्रांतीसह राजकारणातही क्रांती केली - प्राचार्य डॉ चंद्रकांत जावळे*
----------------------
*देवणी*:रसिका शैक्षणिक संकुलाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शालाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी केजी टू पीजी पर्यन्तचे सर्वच शिक्षण देवणी शहरात उपलब्ध करून देऊन शिक्षणात क्षेत्रात मोठी क्रांती निर्माण केली तसेच नुकत्याच झालेल्या पंचायत समिती बोरोळ गणातून निवडणूकित लातूर जिल्ह्यात सर्वाधिक मतदान घेऊन विजयी होऊन राजकारणातही मोठी क्रांती घडविली असल्याचे मत रसिका महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.चंद्रकांत जावळे यांनी व्यक्त केले
सविस्तर माहिती अशी की रसिका महा विद्यालयाचे सचिव श्री गजानन भोपणीकर हे बोरोळ पंचायत समिती गनातून बहुमताने निवडून आल्यामुळे रसिका शैक्षणिक संकुलतील सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोविंदराव भोपणीकर होते तर व्यासपीठावर रामभाऊ भोपणीकर,सत्यदेव गरड, प्रताप कोयले उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ चंद्रकांत जावळे यांनी केले यावेळी रसिका विद्यालयातील असोसिएट प्रोफेसरपदी पदोन्नती झालेल्या डॉ. विजयकुमार मोरे, डॉ. सुदर्शन पेडगे, डॉ. सुलोचना डेंगाळे, डॉ. वैशाली चटगे, या प्राध्यापकांचा सत्कार करण्यातआला या कार्यक्रमात श्री गजानन भोपणीकर यांची देवणी पंचायत सदस्य पदी निवड झाल्याबद्दल रामदास नागराळे, सत्यदेव गरड प्रशांत भंडे, डॉ सुदर्शन पेडगे, यांनी मनोगत व्यक्त केले सत्काराला उत्तर देताना श्री गजानन भोपणीकर म्हणाले की देवणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या सर्व गावचा सर्वांगीण विकास करण्यासाठी पंचायत समितीअंतर्गत अनेक योजना राबविणार असून सर्वसामान्य लोकांच्या आडअडचणी सोडविण्यासाठी सदैव तत्पर राहीनअसे सांगितले तर तसेच यावेळी लातूर जिल्ह्यातून सर्वाधिक बहुमताने निवडून दिल्याबद्दल सर्व कार्यकर्ते व मतदाराचे यावेळी त्यानी आभार मानले श्री गजानन भोपणीकर यांचा रसिका शैक्षणिक संकुल, अंतर्गत कै. रसिका महाविद्यालय, आबासाहेब इंग्लिश स्कूल, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ,अभ्यास केंद्र वसतिगृह विभाग कर्मचारी वाहतूक विभाग कर्मचारी अशा विविध विभागाच्या वतीने सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास काशिनाथ शेंडगे मामा, दत्ता हुरूचनाळे, शिवाजी मोतिरावे, नारायण मोरे, नारायण दोडके, रोहित बंडगर प्रशांत घोलपे, निळकंट बिरादार, सर्फराज मणियार, राजकुमार भंडे, आकाश बिरादार, इत्यादी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ शुभांगी माने यांनी केले आभार डॉ शिवाजीराव सोनटक्के यांनी व्यक्त केले
*गिरीधर गायकवाड*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा