*जि.प.पंस स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका संपल्या! आता लक्ष देवणी नगरपंचायतीकडे...?*
--------------------
*देवणी* : जिल्हा परिषद पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका नुकत्याच संपल्याआहेत या निवडणुकीत सर्वच पक्षाने आपली प्रतिष्ठा पणाला लागली देवणी तालुक्यात तीन गट व सहागणपैकी दोन जिल्हा परिषद गटात भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व कायम राखले तर एका गटात काँग्रेस पक्षाने आपले वर्चस्व सिद्ध केलं पंचायत समिती गणात भारतीय जनता पक्ष(4 ) काँग्रेस( 1 )व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (1) अजितदादा पक्षाने बाजी मारली देवणी पंचायत समिती भाजपाच्या ताब्यात ठेवण्यात यश मिळाले आहे येत्या आठ नऊ महिण्यात देवणी नगर पंचायतीची मुद्दत संपतअसून निवडणूक कार्यक्रम लागणार आहे भाजपाला मिळालेलं यश पाहून देवणी नगर पंचायतीसाठी कार्यकर्ते यांनी मोर्चा बांधणी चालू केली आहे देवणी नगर पंचायतीचे नगराध्यक्ष पद हे खुल्या प्रवर्गातील पुरुषांसाठी आरक्षित झालेआहे सदर निवडणुक ही जनतेतून असल्यामुळे नगराध्यक्ष हा लोकांतून निवडला जाणार आहे त्यामुळे ही निवडणूक अतिशय चूरशीची होणार आहेत सर्वच समाजात चालणारा लोकांभिमुख चेहरा सर्वसामाण्यात जाऊन काम करणारा लोकप्रतिनिधी यांनाच लोक स्वीकारणार आहेत भारतीय जनता पक्षाने जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकित युवा व सर्वसामान्य कार्यकर्ते यांना प्राधान्य देऊन निवडणूक रिंगणात उतरविले होते त्यामुळे देवणी नगरपंचायत निवडणूकही कार्यकर्त्यांची निवडणूक राहणारआहे भारतीय जनता पक्षांकडून भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष अमर पाटील व नागेश जीवणे, वैजनाथ अष्टुरे यांची नावे चर्चेत आहेत या पैकी कोणाचीही उमेदवारी राहण्याची शक्यता आहे तर काँग्रेस पक्षाकडून अमित मानकरी,योगेश ढगे, मनोजकुमार लांडगे, बाबुराव लांडगेसह एक मुस्लिम चेहरा यापैकी उमेदवार राहण्याची शक्यता नाकारता येत नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रा.डॉ.अनिल इंगोलेहे ही देवणी नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष दावेदार असू शकतात सध्या देवणी नगर पंचायतीवर काँग्रेस पक्षाचे स्पष्ट बहुमत असले तरी लोकांच्या समस्याला तोंड देऊन त्यांच्या मूलभूत सेवा पुरविण्यात अयशस्वी ठरले आहेत काँग्रेस पक्षाच्या कार्यकाळात काही कामे झाली त्यांचे श्रेय कोणत्या लोकप्रतिनिधीला व नगरसेवकांना जात नाही त्यांचे सर्वस्वी श्रेय ठेकेदार यांना जाते लोकप्रतिनिधी यांनी काय कामे केली हे आगामी काळात निवडणुकीत लोकांपुढे सांगायचे असेल तर ठेकेदारांनाचं निवडणूक प्रवक्ता म्हणून नियुक्त केले पाहिजे तर काँग्रेस पक्षाने केलेले कामे लोकांपर्यंत पोहचवीतील काँग्रेस पक्षाच्या कार्यकाळात झालेली आंदोलने घनकचरा व्यवस्थापनात झालेला भ्रष्टाचार सर्वसामान्य गरीब सफाई कामगारांची आर्थिक लूट पंधरा पंधरा दिवसाला मिळणारे पाणी या मूलभूत अधिकरापासून वंचित मुद्दे आगामी काळात कळीचे मुद्दे ठरू शकतात या सर्व प्रश्नांना काँग्रेस पक्षालाआगामी निवडणुकीत तोंड द्यावे लागणारआहे केंद्र व राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार असूनही विरोधक म्हणून भारतीय जनता पक्षाची देवणी तालुक्यात विकासात्मक भूमिका राहिली नाही देवणी वळूचं संशोधन केंद्र भर दिवसा देवणी वळूचा व त्या परळीचा काहीच अर्थोअर्थी काहीच संबंध नसताना पळवलं गेलं
लोकप्रतिनिधीकडून केंद्राचे वळू संशोधन केंद्र आणू असे सांगण्यात आले ते संशोधन केंद्र हवेत विरलं तर देवणी साठी महसूल, पोलीस, महावितरण विभागाचे उपविभागीय कार्यालय उदगीरला सोईचे आहे अगदी विस किमी अंतरावरले काढून चाळीस पन्नास किमी अंतरावर असलेल्या निलंगा येथे घेऊन गेले देवणीसाठी गैरसोईचे केले आहे देवणी तालुका हा उदगीर मतदार संघात जावाअशी तालुक्यातील संपूर्ण लोकांची इच्छा आहे उदगीर जळकोट तालुक्याचा विकास पाहत्ता आपण एकदम झिरोत आहोत यापूर्वी देवणी तालूका हेर या राखीव मतदार संघात असल्यामुळे याकडे कोणी गांभीर्याने बघितले नाही याआरक्षित मतदार संघाने एक दोन आमदार सोडले तर सर्व भारतीय जनता पक्षाचे आमदार दिले हा देवणी तालूका कै. गोपीनाथ मुंडे यांच्या विचार आधीपत्याखाली राहिला म्हणून कै. विलासराव देशमुख यांनी या तालुक्यात हस्तक्षेप केला नाही त्यामुळे देवणी तालुक्याचे बारा वाजवण्याचे काम भारतीय जनता पक्षाने केले आहे लोकप्रतिनिधी म्हणून निवडून गेलेले लोकांचे सेवक म्हणून काम करतो असे सांगणारे नेते हे निवडणूक झाली की चार वर्षे मतदारांना तोंड दाखवत नाहीत कारण सहा महिने निवडणुका आल्या की कोणते कार्यकर्ते कीती रुपयात विकत घेता येतात! मतदारांच्या मताची किंमत ठरविण्यात लोकप्रतिनिधीना यश मिळाले असल्यामुळे आता निवडणुका जिंकणे सोपे झाले आहे सत्तेतून पैसा पैशातून राजकारण हे सूत्र लोकप्रतिनिधीला कळाले असल्याने विकासाच्या गप्पा व कृती आता दुरापास्त होतं चालली आहे लोकशाहीत मतदारांनी आपल्या मतांचा घोडे बाजार मांडला असल्यामुळे लोकप्रतिनिधीला विकास काय केला असे म्हणण्याचे अधिकार नाही मतदाराने मतदान लिलावात काढल्यामुळे लोकशाहीची थट्टा केली जातआहे राजकीय पक्ष व निष्ठा यांचा तर ताळमेळ बसत नाही सकाळी एका पक्षात असलेला नेता रात्री कोणत्या पक्षातआहे शोधायची वेळआहे पक्ष असो बाजूला प्रत्येक पक्षातून देवणी नगराध्यक्ष पदासाठी येणारा कार्यकर्ता सामाजिक बांधिलकी असणारा व लोकांभिमुख चेहरा लोकांसमोर येणार आहेत लोकांनी नगरपालिका, महानगर पालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, या निवडणुकीत झालेला आर्थिक घोडेबाजार पहिलाआहे त्यामुळे देवणी नगरपंचायतीत काम करणाऱ्या नेते कार्य कर्ते यांना स्वीकारणार का?डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला मतांचा अधिकारी विकून टाकणार हे त्या त्या वेळची परिस्थिती ठरविणार आहे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा