मुख्य सामग्रीवर वगळा

*लोकाभिमुख कामशैली, नवकल्पनांचा वेध आणि संवेदनशीलतेतून घडलेली प्रशासनाची नवी ओळख - सागर वरंडेकर

*देवणीत सेवाकुंड ट्रस्ट च्या वतीने इफ्तार पार्टी संपन्न ; सामाजिक एकात्मतेचा संदेश* *देविदास पतंगे यांचा उपक्रम; मान्यवरांची उपस्थिती*

*देवणीत सेवाकुंड ट्रस्ट च्या वतीने इफ्तार पार्टी संपन्न ; सामाजिक एकात्मतेचा संदेश*
 *देविदास पतंगे यांचा उपक्रम; मान्यवरांची उपस्थिती*
----------------------
*देवणी*: शहरातील जमा मस्जिद येथे रमजान ईदच्या निमित्ताने दि. १७ मार्च २०२६ रोजी सेवाकुंड सामाजिक ट्रस्टच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून सामाजिक ऐक्य व बंधुभावाचा संदेश दिला. या इफ्तार पार्टीचे आयोजन माजी सरपंच देविदास पतंगे यांच्या पुढाकारातून करण्यात आले होते. या उपक्रमासाठी राजेंद्र संगेकर व पप्पू सूर्यवंशी यांनी संयोजक म्हणून महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडली. कार्यक्रमास अभय साळुंखे (जिल्हाध्यक्ष, काँग्रेस), नागेश जीवने (माजी बांधकाम सभापती, जि.प. लातूर), अजित माने (माजी सभापती, पंचायत समिती निलंगा), वैजनाथ लुले, बळीराम बिरादार, सोमनाथ लुल्ले, अमरनाथ मुर्के, सुनिल चिद्रेवार, रेवण मळभागे यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे सेवाकुंड ट्रस्टचा सामाजिक उपक्रम. डॉ. अनिलकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेला हा ट्रस्ट सामाजिक, शैक्षणिक, राजकीय व सांस्कृतिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत असून समाजातील विविध घटकांना एकत्र आणण्याचे कार्य करीत आहे. ट्रस्टच्या माध्यमातून गरजू घटकांना मदत, सामाजिक सलोखा वाढविणे तसेच विविध जनजागृती उपक्रम राबविले जातात. इफ्तार पार्टीच्या माध्यमातून सर्व धर्मीय समाजातील नागरिक एकत्र आले आणि बंधुभावाची भावना अधिक दृढ झाली. उपस्थित मान्यवरांनी अशा उपक्रमांचे कौतुक करत सामाजिक एकात्मता टिकवण्यासाठी अशा कार्यक्रमांची गरज असल्याचे मत व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व संयोजक व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. शेवटी उपस्थितांना इफ्तारचे वाटप करण्यात आले व सर्वांनी एकात्मतेचा संदेश देत कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
*गिरीधर गायकवाड*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

*विद्रोही साहित्यातील सावित्री!डॉ.प्राजक्ताताई पांडुरंग कलंबरकर*

*विद्रोही साहित्यातील सावित्री!डॉ.प्राजक्ताताई पांडुरंग कलंबरकर* ----------------------- *देवणी* : उपासपोटी संघर्षातून क्रांती व विद्रोह निर्माण होत असतो सोसलं भोगलं व अनुभवलं यातून क्रांतीची ज्वाला निर्माण होऊन बाहेर पडतात परंतु प्राजक्ताताईला कसल्याही गरिबी दारिद्र्याच्या झळा सोसाव्या लागल्या नाही समाजाच्या व्यथा वेदना पाहून प्राजक्ताताच्या शब्दा शब्दात मात्र विद्रोह दिसून येतो प्राजक्ता चे वडील पांडुरंग कलंबरकर हे वैद्यकीय अधिकारी परंतु घरात फुले शाहू आंबेडकर विचाराचे विद्रोही वातावरण त्यातून विद्रोही साहित्य निर्मिती होणं सहाजिक आहे मात्र  एम. बी. बी.एसचं वैद्यकीय उच्च शिक्षण घेता घेता अभ्यासाचा एवढा व्याप असताना विद्रोही साहित्याची निर्मिती डॉ प्राजक्ता कलंबरकरताई यांच्या हातून  विद्रोही साहित्याची निर्मिती होणं त्या साहित्याची दखल विदेशातील नामांकित फेम टाइम्स या मीडियाने दाखल घेऊन 2025 मधील सर्वात प्रेरणादायी तरुणी लेखिका म्हणून  जागतिक महिलांचा बरोबरी करणारा[Most Inspring young Woman Author Of The Year 2025] हा पुरस्कार तिला बहाल करणं म्हणजे डॉ बाबासाह...

*“एक संसार, दोन शिक्षक… आणि समाजासाठी आयुष्यभराची शिदोरी”*

*“एक संसार, दोन शिक्षक… आणि समाजासाठी आयुष्यभराची शिदोरी”*   आजचा दिवस श्री. सुनील शांतप्पा क्षीरसागर (माजी मुख्याध्यापक) आणि सौ. मिनाक्षी सुनील क्षीरसागर यांच्या आयुष्यातील एक अत्यंत गौरवशाली क्षण आहे. त्यांच्या विवाहाला आज ३३ वर्षे पूर्ण होत असून, हा केवळ वैवाहिक सहजीवनाचा टप्पा नाही, तर संस्कार, शिक्षण, संयम आणि सामाजिक बांधिलकीने समृद्ध झालेल्या सहप्रवासाचा उत्सव आहे. दोघेही उच्चशिक्षित, पेशाने शिक्षक आणि विचाराने समाजघडविणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. शिक्षक हा केवळ व्यवसाय नसून तो एक संस्कार आहे, हे त्यांनी आपल्या आयुष्यभराच्या कार्यातून दाखवून दिले. अध्यापन, शिस्त, विद्यार्थ्यांच्या जडणघडणीसाठी केलेले प्रयत्न आणि शिक्षणव्यवस्थेतील निष्ठा या साऱ्या बाबी त्यांच्या कार्यकाळात ठळकपणे जाणवतात. त्यांच्या जीवनप्रवासाकडे पाहताना आपसूकच हे शब्द आठवतात   *शब्दांनी शिकवलं नाही, जगून दाखवलं ज्ञान,वर्गात घडले विद्यार्थी, घरात फुलला सन्मान,३३ वर्षांचा हा प्रवास — संस्कारांचीच ओळख पटवणारा महान* .* श्री. सुनील क्षीरसागर यांनी मुख्याध्यापक म्हणून कार्य करताना के...

*दावनगाव गणातून सर्वसामान्यांची उमेदवार म्हणून पुढे आलेल्या – सौ. कोमल कमलाकर फुले*

*दावनगाव गणातून सर्वसामान्यांची उमेदवार म्हणून पुढे आलेल्या – सौ. कोमल कमलाकर फुले* दावनगाव गण पंचायत समिती निवडणुकीत सौ. कोमल कमलाकर फुले या सर्वसामान्यांच्या, विशेषतः महिलांच्या आवाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या उमेदवार म्हणून पुढे आल्या आहेत. साधी, सुज्ञ आणि तळागाळाशी जोडलेली असल्यामुळे त्यांचा लोकांत वेगळाच ओढा निर्माण झाला आहे. सौ. कोमल फुले यांनी अल्पावधीतच गावोगाव फिरत महिलांशी, शेतकऱ्यांशी, तरुणांशी थेट संवाद साधायला सुरुवात केली आहे. शासकीय योजनांची माहिती देणे, विधवा, निराधार, श्रमिक, दिव्यांग आणि शेतकरी कुटुंबांच्या अडचणी समजून घेणे आणि त्यावर प्रत्यक्ष उपाययोजना करण्याची त्यांची धडपड लोक अनुभवत आहेत. त्यांचे पती कमलाकर बालाजीराव फुले हे अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. तरुणांना एकत्र करून त्यांना योग्य सल्ला देणे, कोणताही कार्यक्रम असो वा एखाद्या कुटुंबाची अडचण असो “सगळ्यात आधी धावून जाणारे” नाव म्हणजे कमलाकर फुले, अशी ओळख स्थानिक पातळीवर तयार झाली आहे.कमलाकर फुले यांना कोणताही राजकीय वारसा लाभला नसला, तरी त्यांच्या कुटुंबाची समाजसेवेची परंपरा मजबूत आह...