मुख्य सामग्रीवर वगळा

“कसाईखाने जा रही गायों को जीवनदान… देवनी की जानकी गौशाला में 250+ गौवंश की सेवा; रोज़ 30 हजार खर्च, फिर भी सेवा जारी!”

शेकापूरच्या व्यंकटराव पांचाळ यांचा पुण्यामध्ये सन्मान

शेकापूरच्या व्यंकटराव पांचाळ यांचा पुण्यामध्ये सन्मान 
---------------------------------------
उदगीर / प्रतिनिधी : तालुक्यातील शेकापूर येथील पेंटर, चित्रकार श्री. व्यंकटराव पांचाळ यांचा पुणे जिल्ह्यातील अनेक ठिकाणच्या जिल्हा परिषद शाळेवर सत्कार करण्यात आला. मुंबईच्या एका संस्थेच्या वतीने शाळा रंगरंगोटी व प्रासंगिक, समर्पक चित्र रेखाटल्याबद्दल उत्कृष्ट अशा शाळांकडून त्यांचा सन्मान करण्यात आला.
   माणूस कुठे जन्मावा हे त्याच्या हातात जरी नसले तरी तो आपल्या कर्तृत्वावर सर्वदूर पोहचू शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे शेकापूर येथील पेंटर व्यंकटराव पांचाळ. गेल्या काही दशकापासून उदगीर, लातूर जिल्हा व जवळपास मराठवाड्यातील अनेक जिल्हा परिषद शाळांच्या आपल्या कुंचल्यातून त्यांनी भिंती बोलक्या केल्या. उदगीर येथील अनेक शाळा व नगर परिषदेच्या वतीने त्यांनी रंगरंगोटी व चित्र रेखाटले. सांगली, सातारा, पुणे, कोल्हापूर, बुलढाणा अशा अनेक ठिकाणच्या जिल्हा परिषद शाळा रंगवण्याचे त्यांनी काम केले. हे करीत असतानाच त्यांनी मुंबई येथील जग्गवार लॅन्ड रोव्हर इंडिया लि. मुंबई माता बाल संगोपन या संस्थेकडून सोमनाथ आर्टस् सासवडच्या वतीने पुणे जिल्ह्यातील आदिवासी भागातील शाळा सजावटचे काम हाती घेण्यात आले.अनेक शाळा रंगरंगोटी व चित्र काढण्याचे काम पूर्ण केले असून त्यांच्या उत्कृष्ट कामाबद्दल श्री. व्यंकटराव पांचाळ यांचा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळेगाव ता. खेड जि. पुणे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रामनगर ( राणमळा ) ता. खेड जि. पुणे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जांभूळदरा ता. खेड जि. पुणे या शाळा उत्कृष्ट रंगवणे, समर्पक चित्र काढणे याबद्दल त्यांचा त्या त्या शाळाच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. श्री. व्यंकटराव पांचाळ यांनी अनेक साहित्यिकांच्या पुस्तकाला मुखपृष्ठ रेखाटले, पुस्तकांच्या आतील चित्र रेखाटले, त्यांच्या त्या पुस्तकांना अनेक पुरस्कारही मिळाले. श्री. व्यंकटराव पांचाळ यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होतं आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

*विद्रोही साहित्यातील सावित्री!डॉ.प्राजक्ताताई पांडुरंग कलंबरकर*

*विद्रोही साहित्यातील सावित्री!डॉ.प्राजक्ताताई पांडुरंग कलंबरकर* ----------------------- *देवणी* : उपासपोटी संघर्षातून क्रांती व विद्रोह निर्माण होत असतो सोसलं भोगलं व अनुभवलं यातून क्रांतीची ज्वाला निर्माण होऊन बाहेर पडतात परंतु प्राजक्ताताईला कसल्याही गरिबी दारिद्र्याच्या झळा सोसाव्या लागल्या नाही समाजाच्या व्यथा वेदना पाहून प्राजक्ताताच्या शब्दा शब्दात मात्र विद्रोह दिसून येतो प्राजक्ता चे वडील पांडुरंग कलंबरकर हे वैद्यकीय अधिकारी परंतु घरात फुले शाहू आंबेडकर विचाराचे विद्रोही वातावरण त्यातून विद्रोही साहित्य निर्मिती होणं सहाजिक आहे मात्र  एम. बी. बी.एसचं वैद्यकीय उच्च शिक्षण घेता घेता अभ्यासाचा एवढा व्याप असताना विद्रोही साहित्याची निर्मिती डॉ प्राजक्ता कलंबरकरताई यांच्या हातून  विद्रोही साहित्याची निर्मिती होणं त्या साहित्याची दखल विदेशातील नामांकित फेम टाइम्स या मीडियाने दाखल घेऊन 2025 मधील सर्वात प्रेरणादायी तरुणी लेखिका म्हणून  जागतिक महिलांचा बरोबरी करणारा[Most Inspring young Woman Author Of The Year 2025] हा पुरस्कार तिला बहाल करणं म्हणजे डॉ बाबासाह...

*“एक संसार, दोन शिक्षक… आणि समाजासाठी आयुष्यभराची शिदोरी”*

*“एक संसार, दोन शिक्षक… आणि समाजासाठी आयुष्यभराची शिदोरी”*   आजचा दिवस श्री. सुनील शांतप्पा क्षीरसागर (माजी मुख्याध्यापक) आणि सौ. मिनाक्षी सुनील क्षीरसागर यांच्या आयुष्यातील एक अत्यंत गौरवशाली क्षण आहे. त्यांच्या विवाहाला आज ३३ वर्षे पूर्ण होत असून, हा केवळ वैवाहिक सहजीवनाचा टप्पा नाही, तर संस्कार, शिक्षण, संयम आणि सामाजिक बांधिलकीने समृद्ध झालेल्या सहप्रवासाचा उत्सव आहे. दोघेही उच्चशिक्षित, पेशाने शिक्षक आणि विचाराने समाजघडविणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. शिक्षक हा केवळ व्यवसाय नसून तो एक संस्कार आहे, हे त्यांनी आपल्या आयुष्यभराच्या कार्यातून दाखवून दिले. अध्यापन, शिस्त, विद्यार्थ्यांच्या जडणघडणीसाठी केलेले प्रयत्न आणि शिक्षणव्यवस्थेतील निष्ठा या साऱ्या बाबी त्यांच्या कार्यकाळात ठळकपणे जाणवतात. त्यांच्या जीवनप्रवासाकडे पाहताना आपसूकच हे शब्द आठवतात   *शब्दांनी शिकवलं नाही, जगून दाखवलं ज्ञान,वर्गात घडले विद्यार्थी, घरात फुलला सन्मान,३३ वर्षांचा हा प्रवास — संस्कारांचीच ओळख पटवणारा महान* .* श्री. सुनील क्षीरसागर यांनी मुख्याध्यापक म्हणून कार्य करताना के...

*दावनगाव गणातून सर्वसामान्यांची उमेदवार म्हणून पुढे आलेल्या – सौ. कोमल कमलाकर फुले*

*दावनगाव गणातून सर्वसामान्यांची उमेदवार म्हणून पुढे आलेल्या – सौ. कोमल कमलाकर फुले* दावनगाव गण पंचायत समिती निवडणुकीत सौ. कोमल कमलाकर फुले या सर्वसामान्यांच्या, विशेषतः महिलांच्या आवाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या उमेदवार म्हणून पुढे आल्या आहेत. साधी, सुज्ञ आणि तळागाळाशी जोडलेली असल्यामुळे त्यांचा लोकांत वेगळाच ओढा निर्माण झाला आहे. सौ. कोमल फुले यांनी अल्पावधीतच गावोगाव फिरत महिलांशी, शेतकऱ्यांशी, तरुणांशी थेट संवाद साधायला सुरुवात केली आहे. शासकीय योजनांची माहिती देणे, विधवा, निराधार, श्रमिक, दिव्यांग आणि शेतकरी कुटुंबांच्या अडचणी समजून घेणे आणि त्यावर प्रत्यक्ष उपाययोजना करण्याची त्यांची धडपड लोक अनुभवत आहेत. त्यांचे पती कमलाकर बालाजीराव फुले हे अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. तरुणांना एकत्र करून त्यांना योग्य सल्ला देणे, कोणताही कार्यक्रम असो वा एखाद्या कुटुंबाची अडचण असो “सगळ्यात आधी धावून जाणारे” नाव म्हणजे कमलाकर फुले, अशी ओळख स्थानिक पातळीवर तयार झाली आहे.कमलाकर फुले यांना कोणताही राजकीय वारसा लाभला नसला, तरी त्यांच्या कुटुंबाची समाजसेवेची परंपरा मजबूत आह...