मुख्य सामग्रीवर वगळा

*लोकाभिमुख कामशैली, नवकल्पनांचा वेध आणि संवेदनशीलतेतून घडलेली प्रशासनाची नवी ओळख - सागर वरंडेकर

*लोकाभिमुख कामशैली, नवकल्पनांचा वेध आणि संवेदनशीलतेतून घडलेली प्रशासनाची नवी ओळख - सागर वरंडेकर


*लोकाभिमुख कामशैली, नवकल्पनांचा वेध आणि संवेदनशीलतेतून घडलेली प्रशासनाची नवी ओळख - सागर वरंडेकर* 

देवणी तालुक्यातील प्रशासनात अल्पावधीतच आपली वेगळी ओळख निर्माण करणारे गटविकास अधिकारी सागर सुरेश वरंडेकर हे नाव आज सर्वसामान्यांच्या विश्वासाचे केंद्र बनले आहे. कार्यतत्परता, लोकाभिमुख दृष्टिकोन आणि संवेदनशीलतेच्या बळावर त्यांनी प्रशासनाला गतिमान करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा तालुक्यातील पळसंबे या गावात शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या सागर वरंडेकर यांनी ग्रामीण पार्श्वभूमीतून पुढे येत 2021 मध्ये MPSC नागरी सेवेतून गटविकास अधिकारी पद मिळवले. स्पर्धा परीक्षेच्या काळात त्यांच्या कुटुंबाचा विशेषतः लहान भावाचा मिळालेला पाठिंबा त्यांच्या यशामागे महत्त्वाचा ठरला. कार्यक्षेत्रात आल्यानंतर त्यांनी “संवाद आणि समन्वय” या सूत्रावर भर देत प्रशासनात काम करण्याची नवी दिशा दिली. कर्मचाऱ्यांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करून काम करून घेणे आणि जनतेच्या समस्या थेट ऐकून त्यांचे निराकरण करणे ही त्यांची खास शैली ठरली आहे. त्यांच्या कार्यकाळात अनेक उल्लेखनीय कामे झाली. जिल्हा परिषद शाळांमधील पटसंख्या वाढवण्यासाठी राबविलेल्या उपक्रमाला मुख्यमंत्री 100 दिवस कार्यक्रमात जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळाला. संत गाडगेबाबा अभियानात नागतीर्थवाडीने जिल्ह्यात अव्वल स्थान पटकावले. कार्यालयाचे सुशोभीकरण करून नागरिकांसाठी अधिक सुसज्ज वातावरण तयार करण्यात आले. तालुक्यातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जलतरा प्रकल्पाच्या माध्यमातून पाणी पातळी वाढवण्यावर त्यांनी भर दिला. मुख्यमंत्री पंचायत राज अभियानांतर्गत ग्रामपंचायतींसाठी वेबसाइट तयार करण्याचा उपक्रम राबवून डिजिटल प्रशासनाची पायाभरणी केली. तसेच कार्यालयात ई-ऑफिस प्रणाली सुरू करून कामकाज अधिक पारदर्शक व गतिमान केले. नागरिकांच्या सोयीसाठी RO फिल्टर, तक्रार पेटी बसविणे आणि सभागृहाचे नूतनीकरण यांसारखे उपक्रम राबविले. नवकल्पनांमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचारी, शिक्षक आणि ग्रामसेवकांना प्रोत्साहनपर पुरस्कार देण्याची संकल्पना त्यांनी राबविली. दिव्यांग व्यक्तींना स्वखर्चातून शिलाई मशीन देऊन सामाजिक बांधिलकी जपली. तालुक्यातील 45 पैकी 24 गावांमध्ये ग्रामदरबार आयोजित करून प्रशासन थेट जनतेपर्यंत नेण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यामुळे नागरिकांच्या समस्या तात्काळ सोडविण्याला चालना मिळाली. त्यांच्या कार्याची दखल घेत मुख्यमंत्री पंचायत राज अभियानात तालुका स्तरावर प्रथम क्रमांक मिळाला. तसेच संत गाडगेबाबा अभियानातही तालुक्याने जिल्ह्यात अव्वल स्थान मिळवले. व्यक्तिगत जीवनात साधेपणा जपणारे वरंडेकर यांच्या पत्नीही शासकीय सेवेत कार्यरत आहे. कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे त्यांना कामात अधिक ऊर्जा मिळत असल्याचे सहकाऱ्यांचे मत आहे.त्यांच्या कार्यशैलीतील सर्वात वेगळेपण म्हणजे मानवी स्पर्श. कार्यालयात एखादा नागरिक जास्त वेळ थांबलेला दिसला तर स्वतः बोलावून घेऊन त्याची अडचण जाणून घेणे, तरुणांना शिक्षणाबाबत मार्गदर्शन करणे, गरजूंना छोटीमोठी मदत करणे – या गोष्टींमुळे ते जनतेच्या अधिक जवळ गेले आहेत. “लोकांचे लोकांसाठी प्रशासन” ही त्यांची कार्यदृष्टी असून भविष्यात देवणी तालुक्याचा पाणी प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी जलसंधारण प्रकल्पांवर भर देण्याचा त्यांचा मानस आहे.
आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व स्तरांतून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून,
“अधिकारी असावा तर सागर वरंडेकरांसारखा” अशी भावना जनमानसात व्यक्त होत आहे.
 *दयानंद कांबळे नागराळकर*
7887827886

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

*विद्रोही साहित्यातील सावित्री!डॉ.प्राजक्ताताई पांडुरंग कलंबरकर*

*विद्रोही साहित्यातील सावित्री!डॉ.प्राजक्ताताई पांडुरंग कलंबरकर* ----------------------- *देवणी* : उपासपोटी संघर्षातून क्रांती व विद्रोह निर्माण होत असतो सोसलं भोगलं व अनुभवलं यातून क्रांतीची ज्वाला निर्माण होऊन बाहेर पडतात परंतु प्राजक्ताताईला कसल्याही गरिबी दारिद्र्याच्या झळा सोसाव्या लागल्या नाही समाजाच्या व्यथा वेदना पाहून प्राजक्ताताच्या शब्दा शब्दात मात्र विद्रोह दिसून येतो प्राजक्ता चे वडील पांडुरंग कलंबरकर हे वैद्यकीय अधिकारी परंतु घरात फुले शाहू आंबेडकर विचाराचे विद्रोही वातावरण त्यातून विद्रोही साहित्य निर्मिती होणं सहाजिक आहे मात्र  एम. बी. बी.एसचं वैद्यकीय उच्च शिक्षण घेता घेता अभ्यासाचा एवढा व्याप असताना विद्रोही साहित्याची निर्मिती डॉ प्राजक्ता कलंबरकरताई यांच्या हातून  विद्रोही साहित्याची निर्मिती होणं त्या साहित्याची दखल विदेशातील नामांकित फेम टाइम्स या मीडियाने दाखल घेऊन 2025 मधील सर्वात प्रेरणादायी तरुणी लेखिका म्हणून  जागतिक महिलांचा बरोबरी करणारा[Most Inspring young Woman Author Of The Year 2025] हा पुरस्कार तिला बहाल करणं म्हणजे डॉ बाबासाह...

*“एक संसार, दोन शिक्षक… आणि समाजासाठी आयुष्यभराची शिदोरी”*

*“एक संसार, दोन शिक्षक… आणि समाजासाठी आयुष्यभराची शिदोरी”*   आजचा दिवस श्री. सुनील शांतप्पा क्षीरसागर (माजी मुख्याध्यापक) आणि सौ. मिनाक्षी सुनील क्षीरसागर यांच्या आयुष्यातील एक अत्यंत गौरवशाली क्षण आहे. त्यांच्या विवाहाला आज ३३ वर्षे पूर्ण होत असून, हा केवळ वैवाहिक सहजीवनाचा टप्पा नाही, तर संस्कार, शिक्षण, संयम आणि सामाजिक बांधिलकीने समृद्ध झालेल्या सहप्रवासाचा उत्सव आहे. दोघेही उच्चशिक्षित, पेशाने शिक्षक आणि विचाराने समाजघडविणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. शिक्षक हा केवळ व्यवसाय नसून तो एक संस्कार आहे, हे त्यांनी आपल्या आयुष्यभराच्या कार्यातून दाखवून दिले. अध्यापन, शिस्त, विद्यार्थ्यांच्या जडणघडणीसाठी केलेले प्रयत्न आणि शिक्षणव्यवस्थेतील निष्ठा या साऱ्या बाबी त्यांच्या कार्यकाळात ठळकपणे जाणवतात. त्यांच्या जीवनप्रवासाकडे पाहताना आपसूकच हे शब्द आठवतात   *शब्दांनी शिकवलं नाही, जगून दाखवलं ज्ञान,वर्गात घडले विद्यार्थी, घरात फुलला सन्मान,३३ वर्षांचा हा प्रवास — संस्कारांचीच ओळख पटवणारा महान* .* श्री. सुनील क्षीरसागर यांनी मुख्याध्यापक म्हणून कार्य करताना के...

*दावनगाव गणातून सर्वसामान्यांची उमेदवार म्हणून पुढे आलेल्या – सौ. कोमल कमलाकर फुले*

*दावनगाव गणातून सर्वसामान्यांची उमेदवार म्हणून पुढे आलेल्या – सौ. कोमल कमलाकर फुले* दावनगाव गण पंचायत समिती निवडणुकीत सौ. कोमल कमलाकर फुले या सर्वसामान्यांच्या, विशेषतः महिलांच्या आवाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या उमेदवार म्हणून पुढे आल्या आहेत. साधी, सुज्ञ आणि तळागाळाशी जोडलेली असल्यामुळे त्यांचा लोकांत वेगळाच ओढा निर्माण झाला आहे. सौ. कोमल फुले यांनी अल्पावधीतच गावोगाव फिरत महिलांशी, शेतकऱ्यांशी, तरुणांशी थेट संवाद साधायला सुरुवात केली आहे. शासकीय योजनांची माहिती देणे, विधवा, निराधार, श्रमिक, दिव्यांग आणि शेतकरी कुटुंबांच्या अडचणी समजून घेणे आणि त्यावर प्रत्यक्ष उपाययोजना करण्याची त्यांची धडपड लोक अनुभवत आहेत. त्यांचे पती कमलाकर बालाजीराव फुले हे अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. तरुणांना एकत्र करून त्यांना योग्य सल्ला देणे, कोणताही कार्यक्रम असो वा एखाद्या कुटुंबाची अडचण असो “सगळ्यात आधी धावून जाणारे” नाव म्हणजे कमलाकर फुले, अशी ओळख स्थानिक पातळीवर तयार झाली आहे.कमलाकर फुले यांना कोणताही राजकीय वारसा लाभला नसला, तरी त्यांच्या कुटुंबाची समाजसेवेची परंपरा मजबूत आह...