मुख्य सामग्रीवर वगळा

*कै. रसिका महाविद्यालयाच्या कु. निकिता कांबळे खेळाडूंची लातूर जिल्हा पोलीस दलात निवड*


देवणी 
           कै. रसिका महाविद्यालय देवणी येथील बीएससी तृतीय वर्षात शिक्षण घेत असलेली विद्यार्थिनी निकिता कांबळेची लातूर जिल्हा पोलीस दलात निवड झाली आहे. त्याच्या यशा बद्दल संस्था अध्यक्ष. मा.श्री गोविंदरावजी भोपणीकर साहेब त्यांच्या शुभहस्ते निकिता कांबळेचा  सत्कार करण्यात आला. यावेळी 
संस्थासचिव मा. श्री. गजाननजी भोपणीकर साहेब  महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. शिवाजी सोनटक्के, क्रीडा संचालक प्रा.डॉ. सचिन चामले उपस्थित होते. तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी निकिता कांबळेचे  अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

*विद्रोही साहित्यातील सावित्री!डॉ.प्राजक्ताताई पांडुरंग कलंबरकर*

*विद्रोही साहित्यातील सावित्री!डॉ.प्राजक्ताताई पांडुरंग कलंबरकर* ----------------------- *देवणी* : उपासपोटी संघर्षातून क्रांती व विद्रोह निर्माण होत असतो सोसलं भोगलं व अनुभवलं यातून क्रांतीची ज्वाला निर्माण होऊन बाहेर पडतात परंतु प्राजक्ताताईला कसल्याही गरिबी दारिद्र्याच्या झळा सोसाव्या लागल्या नाही समाजाच्या व्यथा वेदना पाहून प्राजक्ताताच्या शब्दा शब्दात मात्र विद्रोह दिसून येतो प्राजक्ता चे वडील पांडुरंग कलंबरकर हे वैद्यकीय अधिकारी परंतु घरात फुले शाहू आंबेडकर विचाराचे विद्रोही वातावरण त्यातून विद्रोही साहित्य निर्मिती होणं सहाजिक आहे मात्र  एम. बी. बी.एसचं वैद्यकीय उच्च शिक्षण घेता घेता अभ्यासाचा एवढा व्याप असताना विद्रोही साहित्याची निर्मिती डॉ प्राजक्ता कलंबरकरताई यांच्या हातून  विद्रोही साहित्याची निर्मिती होणं त्या साहित्याची दखल विदेशातील नामांकित फेम टाइम्स या मीडियाने दाखल घेऊन 2025 मधील सर्वात प्रेरणादायी तरुणी लेखिका म्हणून  जागतिक महिलांचा बरोबरी करणारा[Most Inspring young Woman Author Of The Year 2025] हा पुरस्कार तिला बहाल करणं म्हणजे डॉ बाबासाह...

*“एक संसार, दोन शिक्षक… आणि समाजासाठी आयुष्यभराची शिदोरी”*

*“एक संसार, दोन शिक्षक… आणि समाजासाठी आयुष्यभराची शिदोरी”*   आजचा दिवस श्री. सुनील शांतप्पा क्षीरसागर (माजी मुख्याध्यापक) आणि सौ. मिनाक्षी सुनील क्षीरसागर यांच्या आयुष्यातील एक अत्यंत गौरवशाली क्षण आहे. त्यांच्या विवाहाला आज ३३ वर्षे पूर्ण होत असून, हा केवळ वैवाहिक सहजीवनाचा टप्पा नाही, तर संस्कार, शिक्षण, संयम आणि सामाजिक बांधिलकीने समृद्ध झालेल्या सहप्रवासाचा उत्सव आहे. दोघेही उच्चशिक्षित, पेशाने शिक्षक आणि विचाराने समाजघडविणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. शिक्षक हा केवळ व्यवसाय नसून तो एक संस्कार आहे, हे त्यांनी आपल्या आयुष्यभराच्या कार्यातून दाखवून दिले. अध्यापन, शिस्त, विद्यार्थ्यांच्या जडणघडणीसाठी केलेले प्रयत्न आणि शिक्षणव्यवस्थेतील निष्ठा या साऱ्या बाबी त्यांच्या कार्यकाळात ठळकपणे जाणवतात. त्यांच्या जीवनप्रवासाकडे पाहताना आपसूकच हे शब्द आठवतात   *शब्दांनी शिकवलं नाही, जगून दाखवलं ज्ञान,वर्गात घडले विद्यार्थी, घरात फुलला सन्मान,३३ वर्षांचा हा प्रवास — संस्कारांचीच ओळख पटवणारा महान* .* श्री. सुनील क्षीरसागर यांनी मुख्याध्यापक म्हणून कार्य करताना के...

*दावनगाव गणातून सर्वसामान्यांची उमेदवार म्हणून पुढे आलेल्या – सौ. कोमल कमलाकर फुले*

*दावनगाव गणातून सर्वसामान्यांची उमेदवार म्हणून पुढे आलेल्या – सौ. कोमल कमलाकर फुले* दावनगाव गण पंचायत समिती निवडणुकीत सौ. कोमल कमलाकर फुले या सर्वसामान्यांच्या, विशेषतः महिलांच्या आवाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या उमेदवार म्हणून पुढे आल्या आहेत. साधी, सुज्ञ आणि तळागाळाशी जोडलेली असल्यामुळे त्यांचा लोकांत वेगळाच ओढा निर्माण झाला आहे. सौ. कोमल फुले यांनी अल्पावधीतच गावोगाव फिरत महिलांशी, शेतकऱ्यांशी, तरुणांशी थेट संवाद साधायला सुरुवात केली आहे. शासकीय योजनांची माहिती देणे, विधवा, निराधार, श्रमिक, दिव्यांग आणि शेतकरी कुटुंबांच्या अडचणी समजून घेणे आणि त्यावर प्रत्यक्ष उपाययोजना करण्याची त्यांची धडपड लोक अनुभवत आहेत. त्यांचे पती कमलाकर बालाजीराव फुले हे अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. तरुणांना एकत्र करून त्यांना योग्य सल्ला देणे, कोणताही कार्यक्रम असो वा एखाद्या कुटुंबाची अडचण असो “सगळ्यात आधी धावून जाणारे” नाव म्हणजे कमलाकर फुले, अशी ओळख स्थानिक पातळीवर तयार झाली आहे.कमलाकर फुले यांना कोणताही राजकीय वारसा लाभला नसला, तरी त्यांच्या कुटुंबाची समाजसेवेची परंपरा मजबूत आह...