सामाजिक जाणीवा जोपासणारे प्रशासकीय अधिकारी : श्री. प्रवीणजी फुलारी
---------------------------------------
सामान्य कुटुंबातून जिद्द आणि परिश्रमाच्या बळावर मोठ्या हुद्द्यावर गेलेली लोकं सामाजिक जाण, भान जोपासत सामाजिक दायित्व स्वीकारून गोरगरिबांसाठी कामे करणारी फार कमी लोकं आहेत. त्यापैकीच छ. संभाजीनगर चे जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. प्रवीणजी फुलारी हे एक. एका शिक्षकाचा मुलगा वडिलांचे शिस्त, क्षमता आणि कर्तृत्वाची जाणीव ठेवून संस्कार घेवून प्रशासनात सामान्य, गोरगरीब यांना केंद्रबिंदू मानून त्यांच्या प्रगतीसाठी प्रयत्न केले. श्री. प्रवीणजी फुलारी साहेबांचा आज वाढदिवस त्यानिमित्ताने त्यांनी प्रशासनात राहून प्रामाणिक सेवा जोपासली त्यांचा थोडक्यात परिचय देणारा हा लेख...श्री. प्रविण बाबुराव फुलारी यांचा जन्म नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील माळाकोळी येथे एका सामान्य कुटुंबात झाला. साहेबाचे वडील श्री. बाबुराव फुलारी हे शिक्षक होते त्यामुळे शिस्तीचे, संस्काराचे व अध्यात्मचे धडे त्यांना वडिलांकडूनच मिळाले. त्या बळावरच फुलारी साहेबांनी प्रशासनात आपली यशस्वी वाटचाल करताना दिसतात. श्री. फुलारी साहेब यांनी एम. एस्सी. कृषी चे शिक्षण घेतले त्यानंतर लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली आणि त्यात यशही संपादन केले. 2002 मध्ये फुलारी साहेब तहसीलदार म्हणून गोंदिया जिल्ह्यातील आमगाव येथे रुजू झाले. त्यानंतर अनेक ठिकाणी त्यांनी तहसीलदार, उपजिल्हाधिकारी, म्हणून सेवा दिली. सद्या ते छ. संभाजीनगर येथे जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. तेथेच त्यांनी काही काळ अप्पर जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले.
श्री. प्रवीणजी फुलारी साहेब यांनी आपल्या 20 ते 25 वर्षाच्या कालावधीत सामान्य माणसांना केंद्रबिंदू मानून प्रशासनातील सेवा दिली. संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना अशा सामान्य व गोरगरिबांसाठीच्या योजना प्रभाविपणे राबवून लाभार्थ्यांना लाभ मिळवून दिला.गोंदिया जिल्ह्यातील देवरी येथे कार्यरत असताना हा भाग नक्षलग्रस्त असल्यामुळे गावांना पुरेशा सुविधा उपलब्ध नसल्यामुळे तेथील लोकांनी मतदानवर बहिष्कार टाकला होता. त्यावेळी श्री. फुलारी साहेबांनी त्या भागातील लोकांच्या समस्या प्रशासनात मांडून त्यांची प्रश्न सोडवून त्यांना मतदानासाठी प्रवृत्त केलं. अहमदपूर जि. लातूर येथे जलयुक्त शिवार योजनेचे उत्कृष्ट कार्य त्यांनी केले. 30 ते 40 तलावाचे भुसंपादनाचे 150 कोटी रू. लाभार्थ्यांना वाटप केले. कोरोना काळातही श्री. फुलारी साहेबांनी जीव धोक्यात घालून लोकांची सेवा केली. हा काळ महामारीचा काळ होता. प्रशासनाच्या सूचना जनतेला करून कोरोना पासून कसा बचाव करावा यासाठी त्यांनी जनजागृती करून अनेकांना या आजारापासून वाचवलं. स्वतः दोनवेळा कोरोना बाधित झाले पण सामान्य, गोरगरिबांच्या पुण्याईने ते लवकरच बरे झाले. याकाळात आपले गोरगरीब नातलग, गोरगरीब मित्र यांना आर्थिक मदतही त्यांनी करून त्यांना आधार दिला. अशी महत्वपूर्ण कामे त्यांनी केली. छ. संभाजीनगर येथे ते जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून रुजू झाले. ते या जिल्ह्याचे अप्पर जिल्हाधिकारी म्हणून काही काळ काम पाहिले. पुरवठा विभागाची सूत्रे हाती घेताच त्यांनी सामान्य गोरगरीब लोकांना रेशन वेळेवर मिळावे, कुणीही रेशन पासून वंचित राहू नये यासाठी प्रयत्न करतात. पदभार स्वीकारल्या नंतर राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजने अंतर्गत 25963 शिधापत्रिकेत 92768 लाभार्थ्यांना लाभ मिळवून दिला. एपीएल शेतकरी लाभार्थ्यांना 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 या एक वर्षाच्या कालावधीत 28447 शिधा पत्रिका धारकांना 34,99,99740 रू. वाटप केले. राष्ट्रीय अन्न सुरक्षा एकेवायशी 19,04,29 लाभार्थ्यांना एकेवायसी करून राज्यात चौथा क्रमांक मिळविला. अन्न सुरक्षा योजनेत असलेल्या 4427 अधिकारी / कर्मचारी यांचे नावे शिधा पत्रिकेतून वगळण्यात आले. 2932 दिव्यांगाना अंत्योदय योजनेचा लाभ मिळवून दिला. ई - श्रम कामगारांना 720 शिधापत्रिका वाटप करण्यात आले. श्री. फुलारी साहेबाना उत्कृष्ट कार्याबद्दल प्रशासनाच्या वतीने अनेकवेळा सन्मानित करण्यात आले. त्यांच्या नावे अनेक सन्मान आहेत. ते जिथे जातील तिथे लोकांचे साहेब होवून जातात. अशा पारदर्शक, प्रामाणिक सेवा देणाऱ्या, सामाजिक जाणीवा जोपासणाऱ्या प्रशासनातील अधिकारी यांच्या कार्याला सलाम! आज त्यांचा वाढदिवस त्यानिमित्ताने त्यांना शुभेच्छा देऊया!
शंकर बोईनवाड
पत्रकार, उदगीर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा