मुख्य सामग्रीवर वगळा

*टी. एस. कल्लूरकर ( दादा ) एक* *आधारस्तंभ*

*टी. एस. कल्लूरकर ( दादा ) एक* *आधारस्तंभ* 
--------------------------------------
          बालाघाट पर्वतरांगेच्या पायथ्याशी वसलेल्या कल्लूर ता. उदगीर जि. लातूर येथील एका सामान्य कुटुंबातील पिता संग्रामबाबा व माता द्रौपदाबाई यांच्या पोटी दि. 01: 06: 1947 रोजी एक पुत्ररत्न जन्मास आले.त्या पुत्राचे नाव तुकाराम असे ठेवण्यात आले. वडिलांना बाबा तर आईला माय असे म्हणत असत.
गाव लहान असल्याने कल्लूर येथे दुसरीपर्यंतच शाळा होती. तीही विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भरत असे. वडिलांचा सुतारकीचा व्यवसाय होता. म्हणून पंचक्रोशीत बाबांना संग्रामबाबा या नावानेच ओळखले जात असे. माय पहाटे लवकर उठून जात्यावर दळण दळत असे. माय ज्वारी दळत असताना स्वतःच रचलेल्या ओव्या म्हणत असे. मायने अनेक ओव्या रचलेल्या होत्या पण कोणीही या ओव्यांचा संग्रह करून ठेवले नाही. याची खंत प्रत्येकांना वाटते.अशा कठीण प्रसंगी त्यांनी आपल्या दोन मुलांना व एका मुलीला शिक्षण दिले.
माय व बाबा अशिक्षित होते पण आपल्या मुलांनी खूप शिकून मोठी सरकारी नोकरी करावी असे वाटे. बाबा म्हणत, " तुला काय पाहिजे ते माग पण अभ्यासात मागे राहू नकोस " दुसरी पास झाल्यानंतर गावापासून 5 - 6 किमी वरील वाढवणा (बु ) येथील शाळेत तिसरी वर्गात प्रवेश देण्यात आला.
उदगीर तालुक्यात त्याकाळी फक्त जिल्हा परिषद प्रशाला उदगीर येथेच एस. एस. सी. बोर्ड परीक्षेचे परीक्षा केंद्र होते. दहावीत असतांना स्वयंशासन दिन साजरा करण्यात आला.तेंव्हा दादांनी आपल्या मनोगतात ' मला भविष्यात शिक्षक किंवा शिक्षण खात्याशी संबंधीत अधिकारी व्हायचे आहे' असे सांगितले. दादा एस. एस. सी. चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले. 
बी. ए.उत्तीर्ण झाल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील शासकीय अध्यापक महाविद्यालयात बी. एड.ला प्रवेश मिळाला. एकाच ड्रेसवर बी.एडचे शिक्षण पूर्ण झाले.बी. एड.प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले.
उदगीर येथील नामवंत अशा डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यालयात माध्यमिक शिक्षकाची जागा रिक्त होती. येथील मुलाखतीत निवड झाली आणि दि. 01 ऑगस्ट 1974 रोजी माध्यमिक शिक्षक म्हणून रुजू झाले. ही नोकरी करीत असताना स्पर्धा परीक्षेचीही तयारी करीत होते. याच सुमारास मुंबई येथील रिझर्व्ह बँकेत उच्च पदाची व चांगल्या पगाराची नोकरी मिळाली पण ती दादांनी नाकारली. तेंव्हा मुंबई म्हणजे खूपच दूर होती. दादांना माय व बाबांना सोडून इतक्या दूर जाणे योग्य वाटले नाही.
01 सप्टेंबर 1980 रोजी त्यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेतून शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून निवड झाली. ते ऐकून खूपच आनंद झाला. त्यांची नियुक्ती उस्मानाबाद जिल्ह्यात करण्यात आली. 21 ऑक्टोबर 1980 रोजी उस्मानाबाद पंचायत समिती अंतर्गत कामेगाव बीटमध्ये शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून रूजू झाले.
लातूर जिल्हा निर्मितीनंतर उदगीर तालुक्यातील देवणी बीटमध्ये बदली झाली तेंव्हा देवणी तालुका अस्तित्वात नव्हता. नंतर उदगीर येथील पंचायत समितीमध्ये ( शिक्षण विभाग ) बदली झाली. 20 - 22 वर्षे येथेच जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत राहिले. तसेच काही काळ प्रभारी गट शिक्षण अधिकारी म्हणून ही काम पाहिले . उदगीर शहरातील *फोरम* (उदगीर शहर प्राथमिक शिक्षण विकास मंडळ उदगीर) हे कार्यरत आहे. ह्या फोरमची संकल्पना श्री. टी. एस. कल्लूरकर यांचीच आहे.
जन्मभूमी असलेल्या कल्लूर येथे एक ऐतिहासिक जयंती साजरी करण्यात आली. " न *भूतो न भविष्यती"* या उक्तीप्रमाणेच या जयंतीचे वर्णन करता येईल. कदाचित अशी जयंती कोठेही पहावयास मिळाली नाही कारण त्यावर्षी *रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन महामानवांची जयंती एप्रिलमध्येच आल्यामुळे संयुक्तिक जयंती* साजरी करण्यात आली. या संयुक्तिक जयंतीनिमित्त *थोर विचारवंत प्रा. डॉ ना. य . डोळे सर प्रमुख अतिथी* म्हणून उपस्थित होते. याचे सर्व श्रेय श्री टी. एस. कल्लूरकर यांनाच जाते. गावातील प्रत्येक जाती धर्माच्या नागरीकांनी मनापासून सहकार्य केले व या उपक्रमाचे कौतुकही केले.
2003 मध्ये औरंगाबाद येथे गट विकास अधिकारी या पदावर बढती होऊन बदली झाली. या दरम्यानच्या काळात तेथेही त्यांच्या कार्याची दखल घेतली गेली. 31 मे 2005 रोजी कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्तीनंतर ते लातूरच्या जल स्वराज्य अभियान अंतर्गत असलेल्या जल स्वराज्य प्रकल्पातही काम केले. त्यावेळेसचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय प्रविणजी गेडाम साहेबांनी त्यांचे विशेष कौतुक केले. त्यानंतर पुन्हा काही महिने उदगीर पंचायत समितीमध्ये साधन व्यक्ती म्हणून काम केले. त्यांना हे काम करताना कसलाही कमीपणा वाटला नाही." *साहेब, तुम्ही गट विकास अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाला आहात आणि आता असे काय करता* ?" असे अनेकजण बोलून दाखवत. तेंव्हा दादा म्हणत," *कोणतेही काम लहान अथवा मोठे नसते, ते मनापासून केले तर श्रेष्ठच असते,कोणतेही काम कमी समजू नये* " यावरून त्यांना कोणत्याही कामाबद्दल किती तळमळ होती हे दिसून येते.
दादांना 2007 मध्ये हृदयविकाराचा झटका आला. तेंव्हा उदगीर येथील डॉ. बाहेती साहेबांनी उपचार केले व हैद्राबाद येथे डॉ. राव साहेब आणि डॉ. होरे साहेब यांनी अंजीओग्राफी करून या गंभीर आजारातून सुखरूपपणाने बाहेर काढले. तर 11 एप्रिल 2024 रोजी परत तीव्र स्वरूपाचा हृदयविकाराचा झटका आला तेंव्हा उदगीर येथील डॉ. चिकमुरगे यांनी पुढील उपचारासाठी लातूर येथील डॉ. कवठाळे यांच्याकडे पाठवले. तेथे डॉ. गवरे, डॉ. आशिष सरवदे व तेथील टीमने यशस्वीपणे अंजिओप्लास्टी करून दुसऱ्यांदा गंभीर आजारातून सुखरूपपणाने बाहेर काढले.
आज ते वयाची 79 वर्षे पूर्ण करून 80 व्या वर्षात प्रवेश करीत आहेत. आज आपल्या कुटुंबियांसोबत आनंदी आहेत. कोणत्याही कर्मचाऱ्यांकडे गडगंज संपत्ती असते पण टी.एस. कल्लूरकर यांच्या बाबतीत मात्र असे दिसून येत नाही. त्यांनी आपल्या आठवणीना उजाळा देण्यासाठी ' *मागे वळून पाहताना* ' हे आत्मचरित्र लिहिले. या पुस्तकाचे प्रकाशन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडचे तत्कालीन *कुलगुरु मा. डॉ. पंडित विद्यासागरजी* व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत उदगीर येथील रघुकुल मंगल कार्यालयात पार पडले. या समारंभासाठी हजारो मान्यवर उपस्थित होते. हेच त्यांच्या कार्याचे यश दिसून येते. त्यांच्या कालकीर्दीत कसलाही डाग नसले कारणांमुळे आजही अनेक जुन्या सहकार्यांसोबत घनिष्ठ संबंध कायम आहेत. हीच त्यांच्या जीवनाची खरी कमाई आहे. त्यांच्या या यशात पत्नी शकुंतलाबाई यांचे योगदान खूप महत्त्वाचे आहे. प्रत्येक यशस्वी पुरुषांच्या मागे एका स्त्रीचा हात नेहमीच असतो. दादांचे आरोग्य चांगले, सुदृढ राहो तसेच संपूर्ण आयुष्य सुखी समाधानात व आनंदात जावो हीच त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सदिच्छा ! 

*कल्लूरकर सुनिल तुकाराम*
मराठी विभाग
साने गुरुजी विद्यालय, उदगीर
जिल्हा लातूर
9822144146

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

*“एक संसार, दोन शिक्षक… आणि समाजासाठी आयुष्यभराची शिदोरी”*

*“एक संसार, दोन शिक्षक… आणि समाजासाठी आयुष्यभराची शिदोरी”*   आजचा दिवस श्री. सुनील शांतप्पा क्षीरसागर (माजी मुख्याध्यापक) आणि सौ. मिनाक्षी सुनील क्षीरसागर यांच्या आयुष्यातील एक अत्यंत गौरवशाली क्षण आहे. त्यांच्या विवाहाला आज ३३ वर्षे पूर्ण होत असून, हा केवळ वैवाहिक सहजीवनाचा टप्पा नाही, तर संस्कार, शिक्षण, संयम आणि सामाजिक बांधिलकीने समृद्ध झालेल्या सहप्रवासाचा उत्सव आहे. दोघेही उच्चशिक्षित, पेशाने शिक्षक आणि विचाराने समाजघडविणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. शिक्षक हा केवळ व्यवसाय नसून तो एक संस्कार आहे, हे त्यांनी आपल्या आयुष्यभराच्या कार्यातून दाखवून दिले. अध्यापन, शिस्त, विद्यार्थ्यांच्या जडणघडणीसाठी केलेले प्रयत्न आणि शिक्षणव्यवस्थेतील निष्ठा या साऱ्या बाबी त्यांच्या कार्यकाळात ठळकपणे जाणवतात. त्यांच्या जीवनप्रवासाकडे पाहताना आपसूकच हे शब्द आठवतात   *शब्दांनी शिकवलं नाही, जगून दाखवलं ज्ञान,वर्गात घडले विद्यार्थी, घरात फुलला सन्मान,३३ वर्षांचा हा प्रवास — संस्कारांचीच ओळख पटवणारा महान* .* श्री. सुनील क्षीरसागर यांनी मुख्याध्यापक म्हणून कार्य करताना के...

*दावनगाव गणातून सर्वसामान्यांची उमेदवार म्हणून पुढे आलेल्या – सौ. कोमल कमलाकर फुले*

*दावनगाव गणातून सर्वसामान्यांची उमेदवार म्हणून पुढे आलेल्या – सौ. कोमल कमलाकर फुले* दावनगाव गण पंचायत समिती निवडणुकीत सौ. कोमल कमलाकर फुले या सर्वसामान्यांच्या, विशेषतः महिलांच्या आवाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या उमेदवार म्हणून पुढे आल्या आहेत. साधी, सुज्ञ आणि तळागाळाशी जोडलेली असल्यामुळे त्यांचा लोकांत वेगळाच ओढा निर्माण झाला आहे. सौ. कोमल फुले यांनी अल्पावधीतच गावोगाव फिरत महिलांशी, शेतकऱ्यांशी, तरुणांशी थेट संवाद साधायला सुरुवात केली आहे. शासकीय योजनांची माहिती देणे, विधवा, निराधार, श्रमिक, दिव्यांग आणि शेतकरी कुटुंबांच्या अडचणी समजून घेणे आणि त्यावर प्रत्यक्ष उपाययोजना करण्याची त्यांची धडपड लोक अनुभवत आहेत. त्यांचे पती कमलाकर बालाजीराव फुले हे अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. तरुणांना एकत्र करून त्यांना योग्य सल्ला देणे, कोणताही कार्यक्रम असो वा एखाद्या कुटुंबाची अडचण असो “सगळ्यात आधी धावून जाणारे” नाव म्हणजे कमलाकर फुले, अशी ओळख स्थानिक पातळीवर तयार झाली आहे.कमलाकर फुले यांना कोणताही राजकीय वारसा लाभला नसला, तरी त्यांच्या कुटुंबाची समाजसेवेची परंपरा मजबूत आह...

*जनतेच्या मनात स्थान मिळवलेले लोकसेवक — राम नरसिंग बिरादार चवणहिप्परगेकर.*

*जनतेच्या मनात स्थान मिळवलेले लोकसेवक — राम नरसिंग बिरादार चवणहिप्परगेकर.* देवणी तालुक्यातील सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात आपला ठसा उमटविणारे नाव म्हणजे राम नरसिंग बिरादार चवण चवणहिप्परगेकर. विकासाची गती वाढविणे, समाजातील सर्व घटकांना समान न्याय मिळवून देणे आणि प्रत्येक घरापर्यंत प्रगतीचे किरण पोहोचवणे हा त्यांचा जीवनधर्म आहे.राम नरसिंग बिरादार हे केवळ राजकारणी नाहीत, तर एक सामाजिक कार्यकर्ते, शिक्षणप्रेमी आणि सेवाभावी व्यक्तिमत्व आहेत.रास्त भाव दुकानाचे चेअरमन म्हणून त्यांनी शेकडो गरीब कुटुंबांपर्यंत परवडणाऱ्या दरात अन्नधान्य पोहोचवले.कै. गंगाई बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे सचिव म्हणून समाजातील वंचित, दिव्यांग, विधवा आणि गरजू घटकांसाठी विविध उपक्रम राबवले. त्यांची साई इंग्लिश स्कूल, चवणहिप्परगा ही संस्था ग्रामीण भागात इंग्रजी माध्यमाचे दर्जेदार शिक्षण देणारी अग्रगण्य शाळा आहे. गावातील गरिब, शेतकरी आणि मजूर वर्गातील विद्यार्थ्यांना ते मोफत प्रवेश देतात, शैक्षणिक साहित्य आणि गणवेश स्वतःच्या खर्चाने देतात.“कोणतेही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये” ही त्यांची भूमिका अस...