मुख्य सामग्रीवर वगळा

जि. प. शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी मी सदैव प्रयत्नशील : जि. प. सदस्य डॉ. सोमवंशी

*जि. प. शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी मी सदैव प्रयत्नशील : जि. प. सदस्य डॉ. सोमवंशी*
------------------------------------
उदगीर / प्रतिनिधी : ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी मी सदैव प्रयत्नशील राहणार असल्याचे मत निडेबन जिल्हा परिषद गटाचे सदस्य डॉ. दिपक सोमवंशी यांनी व्यक्त केले. ते निडेबन गटात येणाऱ्या तोंडचिर येथील पी. एम. श्री. जिल्हा परिषद शाळेत शाळाभेटी दरम्यान बोलत होते. यावेळी सरपंच प्र. सुदर्शन पाटील यांचेसह शाळेतील शिक्षकांची उपस्थिती होती.
    या भेटीदरम्यान त्यांनी शाळेतील शिक्षक, शिक्षिका व विद्यार्थ्याशी मुक्त संवाद साधत त्यातून त्यांच्या अडिअडचणी जाणून घेतल्या. शिक्षक विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यानंतर शाळेतील एका विद्यार्थिनीने राखी पौर्णिमेचे औचित्य साधून जि. प. सदस्य डॉ. दिपक सोमवंशी यांना राखी बांधून आपल्या सण व संस्कृतीचे दर्शन घडवून दिले.मुक्त संवादानंतर डॉ. सोमवंशी यांनी जिल्हा परिषद शाळांना पुरेशा सुविधा उपलब्ध करून देवून दर्जेदार व गुणवतापूर्ण शिक्षण देण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले. या शाळा भेट कार्यक्रमासाठी आलेल्या जि. प. सदस्य डॉ. दिपक सोमवंशी यांचा सर्वप्रथम शाळेतील शिक्षक वा शिक्षिका यांनी पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. कार्यक्रमास शाळेतील शिक्षक, शिक्षिका व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

*“एक संसार, दोन शिक्षक… आणि समाजासाठी आयुष्यभराची शिदोरी”*

*“एक संसार, दोन शिक्षक… आणि समाजासाठी आयुष्यभराची शिदोरी”*   आजचा दिवस श्री. सुनील शांतप्पा क्षीरसागर (माजी मुख्याध्यापक) आणि सौ. मिनाक्षी सुनील क्षीरसागर यांच्या आयुष्यातील एक अत्यंत गौरवशाली क्षण आहे. त्यांच्या विवाहाला आज ३३ वर्षे पूर्ण होत असून, हा केवळ वैवाहिक सहजीवनाचा टप्पा नाही, तर संस्कार, शिक्षण, संयम आणि सामाजिक बांधिलकीने समृद्ध झालेल्या सहप्रवासाचा उत्सव आहे. दोघेही उच्चशिक्षित, पेशाने शिक्षक आणि विचाराने समाजघडविणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. शिक्षक हा केवळ व्यवसाय नसून तो एक संस्कार आहे, हे त्यांनी आपल्या आयुष्यभराच्या कार्यातून दाखवून दिले. अध्यापन, शिस्त, विद्यार्थ्यांच्या जडणघडणीसाठी केलेले प्रयत्न आणि शिक्षणव्यवस्थेतील निष्ठा या साऱ्या बाबी त्यांच्या कार्यकाळात ठळकपणे जाणवतात. त्यांच्या जीवनप्रवासाकडे पाहताना आपसूकच हे शब्द आठवतात   *शब्दांनी शिकवलं नाही, जगून दाखवलं ज्ञान,वर्गात घडले विद्यार्थी, घरात फुलला सन्मान,३३ वर्षांचा हा प्रवास — संस्कारांचीच ओळख पटवणारा महान* .* श्री. सुनील क्षीरसागर यांनी मुख्याध्यापक म्हणून कार्य करताना के...

*दावनगाव गणातून सर्वसामान्यांची उमेदवार म्हणून पुढे आलेल्या – सौ. कोमल कमलाकर फुले*

*दावनगाव गणातून सर्वसामान्यांची उमेदवार म्हणून पुढे आलेल्या – सौ. कोमल कमलाकर फुले* दावनगाव गण पंचायत समिती निवडणुकीत सौ. कोमल कमलाकर फुले या सर्वसामान्यांच्या, विशेषतः महिलांच्या आवाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या उमेदवार म्हणून पुढे आल्या आहेत. साधी, सुज्ञ आणि तळागाळाशी जोडलेली असल्यामुळे त्यांचा लोकांत वेगळाच ओढा निर्माण झाला आहे. सौ. कोमल फुले यांनी अल्पावधीतच गावोगाव फिरत महिलांशी, शेतकऱ्यांशी, तरुणांशी थेट संवाद साधायला सुरुवात केली आहे. शासकीय योजनांची माहिती देणे, विधवा, निराधार, श्रमिक, दिव्यांग आणि शेतकरी कुटुंबांच्या अडचणी समजून घेणे आणि त्यावर प्रत्यक्ष उपाययोजना करण्याची त्यांची धडपड लोक अनुभवत आहेत. त्यांचे पती कमलाकर बालाजीराव फुले हे अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. तरुणांना एकत्र करून त्यांना योग्य सल्ला देणे, कोणताही कार्यक्रम असो वा एखाद्या कुटुंबाची अडचण असो “सगळ्यात आधी धावून जाणारे” नाव म्हणजे कमलाकर फुले, अशी ओळख स्थानिक पातळीवर तयार झाली आहे.कमलाकर फुले यांना कोणताही राजकीय वारसा लाभला नसला, तरी त्यांच्या कुटुंबाची समाजसेवेची परंपरा मजबूत आह...

नगर परिषद उदगीर प्रभाग क्रमांक 16 मधील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार सामान्यांच्या संवेदनेशी नाळ असणारा तरुण नेता - चंदन पाटील नागराळकर

नगर परिषद उदगीर प्रभाग क्रमांक 16 मधील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार  सामान्यांच्या संवेदनेशी नाळ असणारा तरुण नेता - चंदन पाटील नागराळकर या देशाचे अन मातीचे  ऋण कधीही ना विसरू  जिने आमुचे पोषण केले  तिची सदैव सेवा करू  आपण समाजाचे ,देशाचे काही देणे लागतो, सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या, अडचणीत त्यांच्या मदतीला धावून जाण्याची प्रवृत्ती, धाडसी व लोकाभिमुख नेतृत्व म्हणून पुढे आलेले उदयोन्मुख नेते म्हणून चंदन बसवराज पाटील नागराळकर यांना उदगीर परिसरात ओळखले जाते .  नगर परिषद उदगीर येथील प्रभाग क्रमांक 16 मधून ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. विचारात असलेली विकासाची गंगा प्रत्यक्षात उतरवण्यासाठी एका मजबूत व प्रयत्नशील अशा उमेदवाराला निवडून देणे हे आपले कर्तव्य आहे. संत तुकाराम महाराजांच्या उक्ती प्रमाणे , उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली. तुमच्या प्रभागामधील सर्व प्रकारच्या अडचणी दूर करुन हा उमेदवार एक भक्कम भविष्य निर्माण केल्याशिवाय राहणार नाही. उदगीर पंचक्रोशीतील अतिशय सुसंस्कृत प...