मुख्य सामग्रीवर वगळा

*उपक्रमशील शिक्षक : सुनील कल्लूरकर

*उपक्रमशील शिक्षक : सुनील कल्लूरकर*
------------------------------------
     आपल्या वडिलांच्या संस्कारातून वाढलेले, प्रामाणिकपणे सेवा बजावणारे उपक्रमशील आदर्श शिक्षक श्री.सुनील कलूरकर यांचा थोडक्यात परिचय करून देणारा हा लेख खास शिक्षक दिनानिमित्त....
      श्री.सुनील तुकाराम कल्लूरकर यांचा जन्म दि.१२ ऑगस्ट १९७८ रोजी कल्लूर ता.उदगीर जि.लातूर येथे एका सुशिक्षित कुटुंबात झाला. वडील शिक्षक असल्यामुळे श्री.सुनील कल्लूरकर यांना शिक्षणाची कसलीच अडचण भासली नाही.त्यांचे प्राथमिक शिक्षण जि.प.प्रा.शाळा कल्लूर, माध्यमिक शिक्षण समर्थ विद्यालय एकुरका (रोड) ता.उदगीर येथे झाले. उच्च माध्यमिक ते पदवी पर्यंतचे शिक्षण शिवाजी महाविद्यालय उदगीर, पदव्युत्तर शिक्षण महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय उदगीर येथे झाले. अध्यापन पदवीचे शिक्षण पिलेज कॉलेज ऑफ एज्युकेशन अँड रिसर्च सेंटर चेंबूर नाका, मुंबई येथे झाले.शिक्षण संपल्यावर श्री. सुनील कल्लूरकर हे दि.१० जून २००२ रोजी उदगीर येथील साने गुरुजी माध्यमिक विद्यालय उदगीर येथे माध्यमिक शिक्षक म्हणून रुजू झाले. कायम विनाअनुदानित तत्वावर चालणाऱ्या या माध्यमिक विद्यालयात श्री.कल्लूरकर यांनी प्रामाणिक व तळमळीने अध्यापनाचे कार्य केले. वडील श्री.टी. एस.कल्लूरकर हे शिक्षक ते गटविकास अधिकारी म्हणून सेवा बजावत शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात भरीव असे कार्य केले.त्यांच्या संस्कारात, त्यांच्या मार्गदर्शनाखाली श्री.सुनील कल्लूरकर हे सेवा बजावताना दिसतात.
     श्री.कल्लूरकर हे या शाळेत जवळपास १५ वर्षे परीक्षा विभाग प्रमुख म्हणून कार्य केले. सध्या ते प्रसिध्दी विभागात कार्यरत आहेत. या शाळेचा निकाल दरवर्षी चांगला लागतो.ते आठवी ते दहावी वर्गाला मराठी व इतिहास हा विषय शिकवितात.त्यांच्या विषयाचा निकालही १००% लागतो.शैक्षणिक गुणवतेत ही शाळा आघाडीवर आहे. श्री.कल्लूरकर हे या शाळेत साजऱ्या होणाऱ्या महापुरुषांच्या जयंती-पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करतात.वक्तृत्व, गायन, वेशभूषा अशा अनेक कार्यक्रमात ते विद्यार्थी घडविण्याचा प्रयत्न करीत असतात. सण - वारा निमित्त शाळेत कार्यक्रमाचे आयोजन करून सणावाराची माहिती विदयार्थ्यांना देत असतात.सर्व राष्ट्रीय कार्यक्रमात त्यांचा सहभाग महत्वाचा असतो.विषय शिक्षकांच्या तालुकास्तरीय अनेक शिबिरात त्यांनी सहभाग नोंदवला.बी.एल.ओ. म्हणूनही त्यांनी अडीच वर्ष सेवा बजावली.कोरोना काळातही त्यांनी लोकांसाठी भरीव असे कार्य केले.साने गुरुजी विद्यालयात आयोजीत जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात त्यांचा महत्वाचा सहभाग होता. श्री.सुनील कल्लूरकर यांच्या यांच्या शैक्षणिक कार्याची नोंद घेवून त्यांना अनेक सन्मान प्राप्त झाले. डॉ. राममनोहर लोहिया जन्मशताब्दी निमित्त राष्ट्रसेवादल उदगीर तर्फे दि. २ जानेवारी २०१० रोजी आयोजीत एकदिवसीय प्रशिक्षण शिबिरात सहभागी झाल्याबद्दल प्रमाणपत्र देण्यात आले.एस.एम.जोशी जन्मशताब्दी समितीद्वारा नळदुर्ग येथे आयोजीत पथनाट्य प्रशिक्षण शिबिरात सहभागी झाल्याबद्दल प्रशस्तीपत्र प्रदान , कै.विलास भोसले मित्रमंडळ उदगीरच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार, दि लातूर क्लब द्वारा आयोजीत लातूर फेस्टिव्हल २०११ निमित्त आयोजीत जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेत विद्यार्थी सहभागी केल्याबद्दल प्रशस्तीपत्र प्रदान, अंनिस आणि विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय भारत सरकार संचलित विज्ञान बोध वाहिनी प्रकल्प अंतर्गत प्रशस्तीपत्र प्रदान, स्वप्नपूर्ती कला अकॅडमी लातूरच्या वतीने जिल्हास्तरीय भव्य रंगभरण स्पर्धा २००३- ४ मध्ये जास्तीतजास्त विद्यार्थी सहभागी केल्याबद्दल प्रशस्तीपत्र प्रदान, लायन्स व लिओ क्लब उदगीरच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.2023 मध्ये समृद्धी प्रकाशन हिंगोलीच्या वतीने स्व. मारोतराव कऱ्हाळे राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार, 2026 मध्ये लोककला, कलावंत साहित्य परिषद श्रीरामपूर जि. अहिल्यानगर चा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत.श्री.कल्लूरकर यांनी आतापर्यंत वेगवेगळ्या विषयांवर १०० पेक्षा जास्त लेख लिहिले असून अनेक लेखाना नामवंत दैनिकात प्रसिद्धीही मिळाली.
   जीवनात आई-वडील व सर्व कुटुंब, शिक्षक सुभाष पेदावार, एस.टी. बिरादार, प्रा.साली युनास, प्रा निमिषा गुंजकर यांना आदर्श मानणाऱ्या श्री.सुनील कल्लूरकर यांना भविष्यात पुस्तक निर्मिती करायची आहे.ग्रामीण भागात वाचन संस्कृती रुजवण्यासाठी कल्लूर येथे सार्वजनिक वाचनालय सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे. आज शिक्षक दिन त्यानिमित्त त्यांना शुभेच्छा देवूया !
       
     *शंकर बोईनवाड*
     संपादक, उदगीर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

*“एक संसार, दोन शिक्षक… आणि समाजासाठी आयुष्यभराची शिदोरी”*

*“एक संसार, दोन शिक्षक… आणि समाजासाठी आयुष्यभराची शिदोरी”*   आजचा दिवस श्री. सुनील शांतप्पा क्षीरसागर (माजी मुख्याध्यापक) आणि सौ. मिनाक्षी सुनील क्षीरसागर यांच्या आयुष्यातील एक अत्यंत गौरवशाली क्षण आहे. त्यांच्या विवाहाला आज ३३ वर्षे पूर्ण होत असून, हा केवळ वैवाहिक सहजीवनाचा टप्पा नाही, तर संस्कार, शिक्षण, संयम आणि सामाजिक बांधिलकीने समृद्ध झालेल्या सहप्रवासाचा उत्सव आहे. दोघेही उच्चशिक्षित, पेशाने शिक्षक आणि विचाराने समाजघडविणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. शिक्षक हा केवळ व्यवसाय नसून तो एक संस्कार आहे, हे त्यांनी आपल्या आयुष्यभराच्या कार्यातून दाखवून दिले. अध्यापन, शिस्त, विद्यार्थ्यांच्या जडणघडणीसाठी केलेले प्रयत्न आणि शिक्षणव्यवस्थेतील निष्ठा या साऱ्या बाबी त्यांच्या कार्यकाळात ठळकपणे जाणवतात. त्यांच्या जीवनप्रवासाकडे पाहताना आपसूकच हे शब्द आठवतात   *शब्दांनी शिकवलं नाही, जगून दाखवलं ज्ञान,वर्गात घडले विद्यार्थी, घरात फुलला सन्मान,३३ वर्षांचा हा प्रवास — संस्कारांचीच ओळख पटवणारा महान* .* श्री. सुनील क्षीरसागर यांनी मुख्याध्यापक म्हणून कार्य करताना के...

*दावनगाव गणातून सर्वसामान्यांची उमेदवार म्हणून पुढे आलेल्या – सौ. कोमल कमलाकर फुले*

*दावनगाव गणातून सर्वसामान्यांची उमेदवार म्हणून पुढे आलेल्या – सौ. कोमल कमलाकर फुले* दावनगाव गण पंचायत समिती निवडणुकीत सौ. कोमल कमलाकर फुले या सर्वसामान्यांच्या, विशेषतः महिलांच्या आवाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या उमेदवार म्हणून पुढे आल्या आहेत. साधी, सुज्ञ आणि तळागाळाशी जोडलेली असल्यामुळे त्यांचा लोकांत वेगळाच ओढा निर्माण झाला आहे. सौ. कोमल फुले यांनी अल्पावधीतच गावोगाव फिरत महिलांशी, शेतकऱ्यांशी, तरुणांशी थेट संवाद साधायला सुरुवात केली आहे. शासकीय योजनांची माहिती देणे, विधवा, निराधार, श्रमिक, दिव्यांग आणि शेतकरी कुटुंबांच्या अडचणी समजून घेणे आणि त्यावर प्रत्यक्ष उपाययोजना करण्याची त्यांची धडपड लोक अनुभवत आहेत. त्यांचे पती कमलाकर बालाजीराव फुले हे अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. तरुणांना एकत्र करून त्यांना योग्य सल्ला देणे, कोणताही कार्यक्रम असो वा एखाद्या कुटुंबाची अडचण असो “सगळ्यात आधी धावून जाणारे” नाव म्हणजे कमलाकर फुले, अशी ओळख स्थानिक पातळीवर तयार झाली आहे.कमलाकर फुले यांना कोणताही राजकीय वारसा लाभला नसला, तरी त्यांच्या कुटुंबाची समाजसेवेची परंपरा मजबूत आह...

*जनतेच्या मनात स्थान मिळवलेले लोकसेवक — राम नरसिंग बिरादार चवणहिप्परगेकर.*

*जनतेच्या मनात स्थान मिळवलेले लोकसेवक — राम नरसिंग बिरादार चवणहिप्परगेकर.* देवणी तालुक्यातील सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात आपला ठसा उमटविणारे नाव म्हणजे राम नरसिंग बिरादार चवण चवणहिप्परगेकर. विकासाची गती वाढविणे, समाजातील सर्व घटकांना समान न्याय मिळवून देणे आणि प्रत्येक घरापर्यंत प्रगतीचे किरण पोहोचवणे हा त्यांचा जीवनधर्म आहे.राम नरसिंग बिरादार हे केवळ राजकारणी नाहीत, तर एक सामाजिक कार्यकर्ते, शिक्षणप्रेमी आणि सेवाभावी व्यक्तिमत्व आहेत.रास्त भाव दुकानाचे चेअरमन म्हणून त्यांनी शेकडो गरीब कुटुंबांपर्यंत परवडणाऱ्या दरात अन्नधान्य पोहोचवले.कै. गंगाई बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे सचिव म्हणून समाजातील वंचित, दिव्यांग, विधवा आणि गरजू घटकांसाठी विविध उपक्रम राबवले. त्यांची साई इंग्लिश स्कूल, चवणहिप्परगा ही संस्था ग्रामीण भागात इंग्रजी माध्यमाचे दर्जेदार शिक्षण देणारी अग्रगण्य शाळा आहे. गावातील गरिब, शेतकरी आणि मजूर वर्गातील विद्यार्थ्यांना ते मोफत प्रवेश देतात, शैक्षणिक साहित्य आणि गणवेश स्वतःच्या खर्चाने देतात.“कोणतेही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये” ही त्यांची भूमिका अस...