*बोरोळला सभापतीपद मिळाले तर माझी उमेदवारी बिनशर्त मागे -प्राचार्य नवनाथ खुळे*
----------------------
*देवणी* : माणूस किती ही मोठा झाला कि मायभूमीशीअसलेली नाळ व मातीशीअसलेलं आपुलकीचं नातं कधी विसरता येत नाही काही तरी आपण गावचं देणे लागतो यांची ज्यांना जाणीव असतें तिथे कसलाही स्वार्थआडवा येत नाही निःस्वार्थ सेवा सेवाभावी वृतीतून केली जाते त्यांचे मूर्तिमंत उदाहरणं म्हणजे लोकसेवक प्राचार्य नवनाथ खुळे सर हे आहेत बोरोळ गावासाठी कोणत्याही राजकीय पक्षाने सभापती पद दिले तर आपला बोरोळ पंचायत समिती गाणातील उमेदवारी अर्ज बिनशर्त मागे घेऊ अन्यथा बोरोळसाठी पंचायत समितीचे सभापतीपद मिळत नसेल तर निवडणूक रिंगणात साम, दाम, दंड, भेद, मोठ्या ताकतीने निवडणूक रिंगणात उतरू असा गरभीत ईशारा खुळे सरांनी दिला आहे सरांचे सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रातील कार्याचाआलेख बघितला तर हा सर्वव्यापी आकाशाला गवसनी घालणाराआहे केलेले काम हे कसल्याही स्वार्थापोटी केले नाही परंतु मी गावचा गाव माझा या माध्यमातून गावचा विकास झाला पाहिजे म्हणून प्राचार्य खुळे सरांनी कोणत्याही राजकीय पक्षाने बोरोळ गावातीलचं लोक प्रतिनिधीला सभापती पद देतअसल्यास आपली उमेदवारी बिनशर्त मागे घेऊन गावातील लोक प्रतिनिधीला संधी देण्याचा प्राचार्य खुळे सर यांचा मानस आहे
प्राचार्य खुळे सर उच्च शिक्षक्षित आहेत ते शिक्षकी पेशेतअसले तरी त्यांची सामाजिक, शैक्षणिक,राजकीय, क्षेत्रात मोठा दबदबा आहे बोरोळ गावातील आजवर जे लोकप्रतिनिधी झाले व पदे उपभोगली त्यांच्या जडण घडणीत नवनाथ सरांचा सिंहाचा वाटा व फार मोठे योगदानआहे हे नाकारून चालणार नाही गावातील काही महत्वाचे पद चालून त्यांच्याकडे आले असताना सुद्धा मोठ्या त्यागीभावनेतून मनाचा मोठेपणा दाखवून दुसऱ्यांना संधी देऊन गावात मतभेद होणार नाहीत गावचा सर्वांगीण विकास कसा साधता येईल यासाठी खुळे सरांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सभापती करण्याचे भाग्य खुळे सर यांना लाभलेआहे आता राजकीय पक्षातील *निष्ठावंत* शब्द हा इतिहास जमा होतंआहे देशातील राजकीय समीकरण सध्या राजकीय पुढऱ्यांच्या सोईस्कर सोईनुसार होतं आहेत ध्येय,धोरण, उद्दिष्टे,यांचा कोणत्याही राजकीय पक्षात गंध सुद्धा येताना दिसत नाही सकाळी एका पक्षात असलेला पुढारी संध्याकाळी कोणत्या पक्षात आहेअशी खात्री करावी लागतआहे असे अभद्र राजकारण होतं आहे अशा नीतीभ्रष्ठ राजकीय लोकांना सरळ करणे गरजेचे आहे अशा लोकांमुळे निष्ठावंताची माती होतंआहे लोकप्रतिनिधी हक्काचा व बोरोळ गावचाच असावा आणि कोणत्याही पक्षाचा चालेल अशी एकमेव अट नवनाथ खुळे सरांची आहे कोणता पक्ष बोरोळला सभापती पद देण्याचा शब्द देत नसेल तर आपणास निवडणूक मैदानात उतरावे लागेल असा गर्भीत ईशारा दिला आहे
*गिरीधर गायकवाड*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा