*तळेगाव पंचायत समिती गणात प्रणिता रोहित चामले यांचा विजय निश्चित – युवा नेते रतन अण्णा पाटील नागराळकर*
*तळेगाव पंचायत समिती गणात प्रणिता रोहित चामले यांचा विजय निश्चित – युवा नेते रतन अण्णा पाटील नागराळकर*
तळेगाव पंचायत समिती मतदारसंघातील राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या उमेदवार प्रणिता रोहित चामले यांनी प्रचाराच्या आघाडीवर स्पष्ट वर्चस्व मिळवले असून, त्यांचा विजय निश्चित असल्याचे मत राष्ट्रीय काँग्रेसचे युवा नेते रतन अण्णा पाटील नागराळकर यांनी व्यक्त केले आहे. सामाजिक व राजकीय क्षेत्रात अग्रगण्य असणारे भास्कर चामले यांच्या त्या सुनबाई असून, प्रणिता चामले यांना मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सध्या त्यांचा झंझावाती प्रचार दौरा सुरू असून, प्रत्येक गावात, प्रत्येक घटकात त्या थेट संवाद साधत आहेत. या प्रचाराची संपूर्ण धुरा युवा नेते रतन अण्णा पाटील नागराळकर समर्थपणे सांभाळत आहेत.
मतदारांची मानसिकता ओळखून, विकासाची स्पष्ट दिशा समोर ठेवत, विविध शासकीय योजना व लोककल्याणकारी उपक्रमांच्या माध्यमातून सर्वांगीण विकास कसा साधता येईल, याचा सुस्पष्ट आराखडा प्रणिता चामले मतदारांसमोर मांडत आहेत. त्यामुळे इतर उमेदवारांच्या तुलनेत त्या अधिक सक्षम व योग्य उमेदवार असल्याचे मतदारांमध्ये ठामपणे उमटत आहे.
राष्ट्रीय काँग्रेस पक्ष हा सर्वसामान्यांचा, गोरगरिबांचा आणि वंचितांचा पक्ष असून, विकासाची व्यापक दृष्टी असलेला पक्ष आहे, हे मतदारांपर्यंत पोहोचवण्याचे काम प्रचारादरम्यान प्रभावीपणे सुरू आहे. “प्रणिता रोहित चामले यांना प्रचंड मतांनी विजयी करा,” असे आवाहन रतन अण्णा पाटील नागराळकर सातत्याने करत आहेत. रोहित चामले यांचे देवणी तालुक्याच्या सामाजिक व विकासात्मक जडणघडणीत मोलाचे योगदान राहिले आहे. सामाजिक व राजकीय दृष्टिकोनातून पाहता त्या सर्वांपेक्षा सरस उमेदवार त्यांच्या पत्नी ठरत आहेत. सर्वसामान्यांच्या सुख-दुःखात धावून जाणे, लोकांच्या अडचणी आपल्याच समजून मोठ्या मनाने सहकार्य करणे, हीच चामले परिवाराची ओळख आहे. विविध सामाजिक उपक्रमांतून ही बांधिलकी सातत्याने जोपासली जात आहे.
राजकीय वारसा नसतानाही, अल्पावधीत जनतेच्या विश्वासावर उभे राहिलेले नाव म्हणजे प्रणिता रोहित चामले. तरुण, उच्चशिक्षित आणि अभ्यासू नेतृत्व म्हणून त्या पुढे येत असून, काहीच दिवसांत त्या तळेगाव गणात अग्रभागी ठरल्या आहेत.
“काँग्रेस पक्षाने ७० वर्षे सत्तेत असताना गोरगरीब जनतेच्या विकासासाठी काम केले आहे. पुढील काळातही तोच विकासाचा वारसा पुढे नेण्याचा आमचा निर्धार आहे. जिल्ह्यात बदल झाला, नगरपरिषदेत बदल झाला, तर पंचायत समितीतही बदल घडवून आणू,” असा विश्वास प्रचारादरम्यान व्यक्त केला जात आहे. देवणी तालुका आज स्पष्टपणे बोलतो आहे “काँग्रेसचा हात म्हणजे मदतीचा हात.”
हा हात सर्वसामान्यांसाठी, शेतकरी, महिला, युवक आणि वंचित घटकांसाठी सदैव पुढे राहील, असा विश्वास मतदार व्यक्त करत आहेत.
त्यामुळे तळेगाव पंचायत समिती गणात प्रणिता रोहित चामले यांचा विजय अटळ असल्याचा विश्वास काँग्रेस कार्यकर्ते व समर्थक व्यक्त करत असून, मतदारांनी बहुमूल्य मतदान करून त्यांच्या विजयाचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
*दयानंद कांबळे नागराळकर*
7887827886
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा