*महायुतीच्या घड्याळाची चाल : दावनगाव गणात सर्वसामान्यांची उमेदवार – सौ. कोमल कमलाकर फुले*
दावनगाव पंचायत समिती गणाच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) महायुतीच्या वतीने सौ. कोमल कमलाकर फुले या सर्वसामान्यांच्या, विशेषतः महिलांच्या आवाजाचे प्रभावी प्रतिनिधित्व करणाऱ्या उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा विकास पुरुष आमदार संजयभाऊ बनसोडे यांच्या ठाम नेतृत्वाखाली महायुतीने दावनगाव गणात विकास, पारदर्शकता आणि लोकाभिमुख कारभाराचा स्पष्ट अजेंडा मतदारांसमोर मांडला आहे.
सौ. कोमल फुले या कोणत्याही राजकीय दिखाव्याविना, साधेपणा, संयम आणि थेट जनतेशी संवाद या बळावर पुढे येत आहेत. त्यांचा प्रचार म्हणजे सभा, बॅनर किंवा घोषणा यापुरता मर्यादित न राहता घराघरात जाऊन लोकांचे प्रश्न ऐकणे आणि त्यावर मार्ग काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न असा आहे. त्यामुळेच दावनगाव गणात “ही उमेदवार आपल्यातली आहे” अशी भावना मतदारांमध्ये दृढ होताना दिसत आहे.
महायुतीचे नेतृत्व करणारे आमदार संजयभाऊ बनसोडे हे दावनगाव गणासाठी नवे नाहीत. रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, सामाजिक न्याय आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सातत्याने निधी आणून विकास घडवणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे. “राज्यात सत्ता, केंद्रात सत्ता आणि मतदारसंघात विकासाचा स्पष्ट रोडमॅप” ही संजयभाऊ बनसोडे यांची ओळख महायुतीच्या उमेदवाराला मोठे बळ देणारी ठरत आहे.
सौ. कोमल फुले यांचे पती कमलाकर बालाजीराव फुले हे अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. युवकांना योग्य दिशा देणे, गरजू कुटुंबांना मदत करणे, शासकीय कामकाजात नागरिकांना मार्गदर्शन करणे – या माध्यमातून त्यांनी जनतेत विश्वास निर्माण केला आहे. “कोणताही प्रश्न असो, कमलाकर फुले हे पहिले पोहोचतात” अशी ओळख दावनगाव परिसरात रुजलेली आहे.या कुटुंबाचा सामाजिक आणि लोकाभिमुख वारसा अधिक मजबूत करणारे नाव म्हणजे बालाजी फुले. सन 2000 मध्ये पंचायत समितीचे उपसभापती म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. त्यांच्या कार्यकाळात अनेक विकासकामे मार्गी लागली, सामान्य नागरिकांना योजनांचा लाभ मिळाला. आजही अनेक गावांत “काम असलं की बालाजीराव फुलेंकडे गेलं की मार्ग निघायचा” ही भावना जिवंत आहे. हाच सेवाभाव आणि सर्वसामान्यांशी नाळ जोडणारी परंपरा आज सौ. कोमल फुले पुढे नेत आहेत. महायुतीच्या उमेदवार म्हणून सौ. कोमल फुले यांनी आपल्या प्राधान्यक्रमात महिलांचे सक्षमीकरण, विद्यार्थ्यांचे शिक्षण, शेतकऱ्यांच्या अडचणी, बेरोजगार तरुणांना मार्गदर्शन, तसेच पंचायत समितीतील कामकाजात पारदर्शकता यांचा स्पष्ट उल्लेख केला आहे. “पद हे उद्दिष्ट नाही, तर साधन आहे. उद्दिष्ट आहे – दावनगाव गणातील प्रत्येक कुटुंबापर्यंत शासन पोहोचवणे” असे त्या ठामपणे सांगतात.
दावनगाव गणातील मतदारांमध्ये आता असा सूर उमटत आहे की, घराणेशाही किंवा केवळ राजकारणासाठी नव्हे, तर प्रत्यक्ष काम करणारी, सहज भेटणारी आणि लोकांच्या अडचणी स्वतःच्या समजणारी व्यक्ती पंचायत समितीत हवी. त्या निकषांवर सौ. कोमल कमलाकर फुले या महायुतीच्या योग्य उमेदवार ठरत आहेत.
विकास पुरुष आमदार संजयभाऊ बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली, भाजप–राष्ट्रवादी (अजित पवार गट) महायुतीच्या बळावर आणि जनतेच्या विश्वासासह दावनगाव पंचायत समिती गणात ‘घड्याळ’ चिन्हाला जोरदार साथ मिळत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे.
*दयानंद कांबळे नागराळकर*
7887827886
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा