*“खुर्चीपेक्षा माणूस मोठा असतो” – अक्का फाउंडेशनच्या सेवेतून जनतेचा विश्वास जिंकणारे भाजपचे लोकाभिमुख नेतृत्व रामलिंग शेषराव शेरे*
*“खुर्चीपेक्षा माणूस मोठा असतो” – अक्का फाउंडेशनच्या सेवेतून जनतेचा विश्वास जिंकणारे भाजपचे लोकाभिमुख नेतृत्व रामलिंग शेषराव शेरे* ---------------------- *देवणी* :राजकारणात अनेक चेहरे येतात-जातात; परंतु सेवेच्या माध्यमातून जनतेच्या मनात कायमस्वरूपी स्थान निर्माण करणारे नेतृत्व फारच कमी असते. जवळगा जिल्हा परिषद गटात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार रामलिंग शेषराव शेरे हे असेच एक लोकाभिमुख, सेवाभावी आणि जमिनीवर काम करणारे नेतृत्व म्हणून पुढे आले आहेत. आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर व अरविंद भैय्या पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपने जवळगा गटात विकासाभिमुख आणि विश्वासार्ह उमेदवार दिला असल्याची भावना सर्वसामान्य नागरिकांतून व्यक्त होत आहे. रामलिंग शेरे यांची ओळख केवळ राजकीय कार्यकर्ते म्हणून मर्यादित नाही. अक्का फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी समाजातील गरजू, होतकरू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी मोठे कार्य उभे केले आहे. या फाउंडेशनमार्फत आजपर्यंत हजारो गरीब रुग्णांवर मोफत उपचार, विविध गावांमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिरे, औषध वाटप, महिलांसाठी आरोग्य मार्गदर्शन, तसेच...