सुनिल कल्लूरकर यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर --------------------------------------- उदगीर / प्रतिनिधी : उदगीर येथील साने गुरुजी माध्यमिक विद्यालयातील मराठी विभाग प्रमुख सुनिल तुकाराम कल्लूरकर यांची लोककला,कलावंत, साहित्यिक परिषद,महाराष्ट्र राज्य,श्रीरामपूर जि. अहिल्यानगरच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक जाहीर झाला आहे. येत्या काही दिवसात एका विशेष समारंभात मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याचे संयोजकानी कळविले आहे. श्री. सुनील कल्लूरकर यांना यापूर्वी दोन वेळेस डॉ. ना य. डोळे आदर्श शिक्षक पुरस्कार, लायन्स क्लब उदगीर यांच्यातर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार, कै. विलास भोसले मित्र मंडळ, उदगीर तर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार,लिओ क्लब उदगीरचा आदर्श शिक्षक पुरस्कार तसेच समृद्धी प्रकाशन हिंगोली येथील स्व. मारोतराव कऱ्हाळे राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार. आदी पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे. हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे उदगीर येथील नव समाज शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बापूसाहेब कज्जेवाड, सचिव मनोजद...