मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

*“गावासाठी झटणारं नेतृत्व हवं असेल तर हातात हात द्या – सुरेखा सोनकाबळे”*

*महायुतीच्या घड्याळाची चाल : दावनगाव गणात सर्वसामान्यांची उमेदवार – सौ. कोमल कमलाकर फुले*

*महायुतीच्या घड्याळाची चाल : दावनगाव गणात सर्वसामान्यांची उमेदवार – सौ. कोमल कमलाकर फुले*  दावनगाव पंचायत समिती गणाच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) महायुतीच्या वतीने सौ. कोमल कमलाकर फुले या सर्वसामान्यांच्या, विशेषतः महिलांच्या आवाजाचे प्रभावी प्रतिनिधित्व करणाऱ्या उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा विकास पुरुष आमदार संजयभाऊ बनसोडे यांच्या ठाम नेतृत्वाखाली महायुतीने दावनगाव गणात विकास, पारदर्शकता आणि लोकाभिमुख कारभाराचा स्पष्ट अजेंडा मतदारांसमोर मांडला आहे. सौ. कोमल फुले या कोणत्याही राजकीय दिखाव्याविना, साधेपणा, संयम आणि थेट जनतेशी संवाद या बळावर पुढे येत आहेत. त्यांचा प्रचार म्हणजे सभा, बॅनर किंवा घोषणा यापुरता मर्यादित न राहता घराघरात जाऊन लोकांचे प्रश्न ऐकणे आणि त्यावर मार्ग काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न असा आहे. त्यामुळेच दावनगाव गणात “ही उमेदवार आपल्यातली आहे” अशी भावना मतदारांमध्ये दृढ होताना दिसत आहे. महायुतीचे नेतृत्व करणारे आमदार संजयभाऊ बनसोडे हे दावनगाव गणासाठी नवे नाहीत. रस्ते, पाणीप...

“विकासाची धुरा महिलांच्या हाती : वलांडी गटात नव्या पर्वाची सुरुवात”वलांडी जिल्हा परिषद गट : विकासाची परंपरा, शेतकऱ्यांचा कणा आणि उज्ज्वल भविष्याचा विश्वास

“विकासाची धुरा महिलांच्या हाती : वलांडी गटात नव्या पर्वाची सुरुवात” वलांडी जिल्हा परिषद गट : विकासाची परंपरा, शेतकऱ्यांचा कणा आणि उज्ज्वल भविष्याचा विश्वास ग्रामीण राजकारणात काही व्यक्ती आणि काही घराणी ही केवळ सत्तेसाठी नव्हे, तर समाजासाठी ओळखली जातात. वलांडी जिल्हा परिषद गट हे अशाच एका विकासनिष्ठ आणि जनतेशी नाळ जपणाऱ्या राजकीय परंपरेचे प्रतीक आहे. या गटामध्ये उषा संभाजी पाटील तळेगावकर या भारतीय जनता पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या घराण्यातील उमेदवार म्हणून जनतेसमोर उभ्या आहेत. त्यांची उमेदवारी ही अचानक आलेली नसून अनेक वर्षांच्या विकासकामांची, प्रशासनाशी असलेल्या सुसंवादाची आणि जनतेच्या विश्वासाची नैसर्गिक पुढची पायरी आहे. वलांडी गटातील विकासाचा पाया याआधीच भक्कम घातला गेला आहे. शंकर पाटील तळेगावकर यांनी सभापती असताना रस्ते, नाल्या, पाणीपुरवठा, दिवाबत्ती, शाळा व सार्वजनिक इमारती यांसारख्या मूलभूत सुविधा सक्षम करण्यावर भर दिला. त्यांच्या काळात झालेली अनेक कामे आजही लोक आठवणीने सांगतात. विकास हा कागदावर नव्हे तर प्रत्यक्षात दिसला पाहिजे, हा त्यांचा दृष्टिकोन होता. त्यामुळेच वलांडी ग...

*“हलगरा जिल्हा परिषद गटात विकासाचा झंझावात; इंजि. विनायक बगदुरे यांच्या उमेदवारीने राजकीय समीकरणे बदलली”*

*“हलगरा जिल्हा परिषद गटात विकासाचा झंझावात; इंजि. विनायक बगदुरे यांच्या उमेदवारीने राजकीय समीकरणे बदलली”* निलंगा तालुक्यातील हलगरा जिल्हा परिषद गटातून इंजि. विनायक बगदुरे यांची उमेदवारी अधिकृत जाहीर होताच संपूर्ण गटात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. जनतेच्या अपेक्षा आणि बदलाची तीव्र इच्छा यांचे प्रतीक म्हणून इंजि. बगदुरे यांच्याकडे पाहिले जात असून, त्यांच्या प्रचाराला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच इंजि. विनायक बगदुरे यांनी गावोगावी दौरे सुरू करत थेट जनतेशी संवाद साधला आहे. रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण, शेतकरी, महिला व युवकांचे प्रश्न हे त्यांच्या प्रचाराचे केंद्रबिंदू असून, “काम बोलणार, मी नाही” ही भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे.इंजिनिअरिंग पार्श्वभूमी असलेले, अभ्यासू आणि विकासाभिमुख नेतृत्व म्हणून त्यांची ओळख असून, जिल्हा परिषदेतील कामकाजात शिस्त, पारदर्शकता आणि दीर्घकालीन नियोजन आणण्याचा त्यांचा ठाम निर्धार आहे. केवळ आश्वासनांवर नव्हे, तर कृतीवर विश्वास ठेवणारा नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. हलगरा गटातील युवक, महि...

*विकास, विश्वास आणि भाजपाचे काम करणारे नेतृत्व : बोरोळ गटात ‘राज’ नावाचा ठाम पर्याय*

*विकास, विश्वास आणि भाजपाचे काम करणारे नेतृत्व : बोरोळ गटात ‘राज’ नावाचा ठाम पर्याय*  ---------------------- *देवणी*: तालुक्यातील बोरोळ जिल्हा परिषद गटाची निवडणूक यंदा केवळ पक्षीय गणितांवर नाही, तर भाजपाच्या विकासाच्या राजकारणावर केंद्रित झाल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे. केंद्रात, राज्यात आणि जिल्ह्यात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाने मांडलेली “सबका साथ, सबका विकास” ही भूमिका बोरोळ गटात प्रत्यक्षात उतरवणारे नाव म्हणून आज धोंडाराज (राज) किशनराव गुणाले यांच्याकडे पाहिले जात आहे. भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळख असलेल्या धोंडाराज गुणाले यांनी राजकारणात घोषणा कमी आणि काम अधिक या तत्वावर वाटचाल केली. नागतीर्थवाडी गावात उपसरपंच म्हणून काम करताना त्यांनी भाजपाच्या ग्रामविकास, स्वच्छता, डिजिटल इंडिया आणि शिक्षण या धोरणांना गावपातळीवर प्रत्यक्ष स्वरूप दिले. त्यामुळेच आज नागतीर्थवाडी हे गाव केवळ विकासाचे उदाहरण नसून भाजपाच्या विचारधारेचा मॉडेल ग्रामपंचायत नमुना म्हणून ओळखले जाते. देवणी तालुक्यातील सर्वप्रथम निर्मलग्राम म्हणून ओळख मिळवलेले नागतीर्थवाडी हे गाव भाजपाच्या...

*गजानन गोविंदराव भोपणीकर यांना बोरोळ पंचायत समिती मतदार संघात भरभरून प्रतिसाद*

*गजानन गोविंदराव भोपणीकर यांना बोरोळ पंचायत समिती मतदार संघात भरभरून प्रतिसाद*  ---------------------- *देवणी* : बोरोळ पंचायत मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजितदादा पवार) गटाचे अधिकृत उमेदवार गजानन गोविंदराव भोपणीकर यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे मतदार संघात चार पाच फेऱ्या पूर्ण झाल्या असून त्यांना मतदारातून मोठा प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे विजयाचा मार्ग सुकर होतं चालला आहे  गजानन भोपणीकर उच्च शिक्षित उमेदवार असून यांचे सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रात फार मोठे योग्यदान आहे   शिक्षण क्षेत्रात त्यानी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना होणारी गैरसोय दूर व्हावी शहरातील विद्यार्थ्यांसारखे दर्जेदार शिक्षण ग्रामीण भागातील विध्यार्थ्यांना घेता यावे जे जे शैक्षणिक दृष्टीकोनातून नवं ते देवणीला हवं असा उद्देश ठेऊन के जी टू पी जी ही शिक्षणाची सोय करून शिक्षण बाह्य विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात आणण्याचे काम गजानन भोपनिकर यांनी केले आहे राजकारणातून समाजकारण समाजकारणातून लोकसेवा करण्यासाठी बोरोळ पंचायत समिती निवडणूक रिंगणात आपले नशीब अजमावत आहेत या ...

*बोरोळला सभापतीपद मिळाले तर माझी उमेदवारी बिनशर्त मागे -प्राचार्य नवनाथ खुळे*

*बोरोळला सभापतीपद मिळाले तर माझी उमेदवारी बिनशर्त मागे -प्राचार्य नवनाथ खुळे* ---------------------- *देवणी* : मा णूस किती ही मोठा झाला कि मायभूमीशीअसलेली नाळ व मातीशीअसलेलं आपुलकीचं नातं कधी विसरता येत नाही काही तरी आपण गावचं देणे लागतो यांची ज्यांना जाणीव असतें तिथे कसलाही स्वार्थआडवा येत नाही निःस्वार्थ सेवा सेवाभावी वृतीतून केली जाते त्यांचे मूर्तिमंत उदाहरणं म्हणजे लोकसेवक प्राचार्य नवनाथ खुळे सर हे आहेत बोरोळ गावासाठी कोणत्याही राजकीय पक्षाने सभापती पद दिले तर आपला बोरोळ पंचायत समिती गाणातील उमेदवारी अर्ज बिनशर्त मागे घेऊ अन्यथा बोरोळसाठी पंचायत समितीचे सभापतीपद मिळत नसेल तर निवडणूक रिंगणात साम, दाम, दंड, भेद, मोठ्या ताकतीने निवडणूक रिंगणात उतरू असा गरभीत ईशारा खुळे सरांनी दिला आहे सरांचे सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रातील कार्याचाआलेख बघितला तर हा सर्वव्यापी आकाशाला गवसनी घालणाराआहे केलेले काम हे कसल्याही स्वार्थापोटी केले नाही परंतु मी गावचा गाव माझा या माध्यमातून गावचा विकास झाला पाहिजे म्हणून प्राचार्य खुळे सरांनी कोणत्याही राजकीय पक्षाने बोरोळ गावातीलचं लोक प्र...

*“कुऱ्हाड गुत्तेदाराच्या हातात… संरक्षण वनविभागाचे!**देवणी सह लातूर व कर्नाटक राज्य मार्गाला जोडला जाणाऱ्या रस्त्या कडेची लाखो झाडे कापली, कारवाई शून्य”***झाडे तोडून मोकळे झाले!**देवणी–लातूर–कर्नाटक राज्य मार्गावर ‘विकास’ की उघड्या डोळ्यांनी झालेला पर्यावरण घात?*

*“कुऱ्हाड गुत्तेदाराच्या हातात… संरक्षण वनविभागाचे!* *देवणी सह लातूर व कर्नाटक राज्य मार्गाला जोडला जाणाऱ्या रस्त्या कडेची लाखो झाडे कापली, कारवाई शून्य”* **झाडे तोडून मोकळे झाले!* *देवणी–लातूर–कर्नाटक राज्य मार्गावर ‘विकास’ की उघड्या डोळ्यांनी झालेला पर्यावरण घात?* देवणी तालुक्यासह लातूर ते कर्नाटक राज्याला जोडणाऱ्या महत्त्वाच्या राज्य मार्गाचे काम सध्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत सुरू आहे. मात्र रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली जे घडले आहे, ते केवळ विकासकाम नव्हे तर निसर्गावर चालवलेला बेधडक कुऱ्हाड हल्ला असल्याचे स्पष्ट दिसत आहे. या मार्गावर लाखो वृक्ष अक्षरशः तोडून टाकण्यात आले, आणि आश्चर्य म्हणजे – गुत्तेदार आणि वनविभाग दोघेही निर्धास्तपणे मोकळे झाले आहेत! रस्त्याच्या दुतर्फा आजही कापलेले बुंधे, जमिनीवर पडलेली मोठी झाडे,स्पष्टपणे दिसून येते. ही तोड एखाद्या-दोन ठिकाणी झालेली नसून, संपूर्ण मार्गभर पसरलेली आहे. एवढ्या प्रचंड प्रमाणावर वृक्षसंहार होत असताना वनविभागाने नेमकी काय भूमिका बजावली? हा प्रश्न आता जनतेतून संतापाने विचारला जात आहे. कायद्यानुसार वृक्षतोड...