*नागराळ येथे श्री गुरुलिंगेश्वर मठाच्या जिर्णोद्धाराचा ऐतिहासिक सोहळा**श्री श्री श्री १००८ सिद्धलिंग राजदेशिकेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते भूमिपूजन; हजारोंच्या साक्षीने धर्मसंस्कृतीचा जागर*
*नागराळ येथे श्री गुरुलिंगेश्वर मठाच्या जिर्णोद्धाराचा ऐतिहासिक सोहळा* *श्री श्री श्री १००८ सिद्धलिंग राजदेशिकेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते भूमिपूजन; हजारोंच्या साक्षीने धर्मसंस्कृतीचा जागर* देवणी : देवणी तालुक्यातील नागराळ येथील प्राचीन व ऐतिहासिक श्री गुरुलिंगेश्वर मठ संस्थान येथे मठाच्या जिर्णोद्धार व नव्या बांधकामाचा भव्य धार्मिक सोहळा सोमवारी अत्यंत उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. उज्जैनी महापीठाचे परमपूज्य श्री श्री श्री १००८ जगद्गुरू सिद्धलिंग राजदेशिकेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या शुभहस्ते मठाच्या जिर्णोद्धाराचे भूमिपूजन करण्यात आले. या सोहळ्यास नागराळ गावासह देवणी तालुक्यातील तसेच परिसरातील अनेक गावांमधून हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित राहिल्याने संपूर्ण परिसरात धार्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.नागराळ येथील गुरुलिंगेश्वर मठाला तब्बल ७५ वर्षांनंतर मठाधीश लाभल्याचा ऐतिहासिक क्षण या सोहळ्यामुळे साकार झाला. नागराळ येथील मठाधीश म्हणून श्री म. नि. प्र. सिद्धलिंग महास्वामीजी यांच्या रूपाने गुरुपरंपरेचा नवा अध्याय सुरू झाला असून ...