*शिष्यवृत्ती परीक्षेत निळकंठ इंग्लिश स्कूलचे यश* --------------------------------------- उदगीर/ प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत निळकंठ इंग्लिश स्कूल, डॅम रोड उदगीर विद्यालयाचे प्रज्ञा स्वप्निल शृंगारे व मनुश्री उद्धव चामवाड ही विद्यार्थी पात्र ठरले आहेत. या विद्यार्थ्यांना सहशिक्षक साधना बेंबळगे, दत्ता गुरदाळकर, शुभम उदगीरकर, प्रीती चिल्लरगे, नंदिनी वाडकर यांनी मार्गदर्शन केले. गुणवंत विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्था अध्यक्ष प्रो. बसवराज स्वामी, मुख्याध्यापिका जयश्री बी. एस. यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले. या गुणवंताचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.