विलासराव देशमुखांच्या विकासविचारांचा वारसा पुढे नेत बोरोळमध्ये काँग्रेसचा सामान्य माणूस मैदानात* *““सामान्य माणसाला ताकद देणारी उमेदवारी – बोरोळमध्ये औदुंबर पांचाळसह काँग्रेसचा ठाम निर्धार””*
*विलासराव देशमुखांच्या विकासविचारांचा वारसा पुढे नेत बोरोळमध्ये काँग्रेसचा सामान्य माणूस मैदानात* *““सामान्य माणसाला ताकद देणारी उमेदवारी – बोरोळमध्ये औदुंबर पांचाळसह काँग्रेसचा ठाम निर्धार””* ---------------------- *बोरोळ* (ता. देवणी) ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास, गोरगरिबांच्या प्रश्नांना प्राधान्य आणि प्रशासनात पारदर्शकता या मूल्यांवर आधारित राजकारणाची परंपरा स्व. विलासराव देशमुख यांनी महाराष्ट्रात निर्माण केली. त्याच विचारधारेतून बोरोळ जिल्हा परिषद मतदारसंघात काँग्रेस पक्षाने सामान्य, शिक्षित आणि लोकांमध्ये वावरणारे औदुंबर पांचाळ यांना उमेदवारी दिली असून मतदारसंघात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. औदुंबर पांचाळ हे जिल्हाध्यक्ष अभय साळुंखे यांचे निकटवर्तीय सहकारी म्हणून ओळखले जातात. संघटनात्मक कामाचा अनुभव, पक्षाशी निष्ठा आणि कार्यकर्त्यांशी थेट संपर्क यामुळे ते काँग्रेस पक्षातील विश्वासार्ह चेहरा मानले जातात. जिल्हा पातळीवरील नेतृत्वाचा पाठिंबा लाभल्यामुळे बोरोळ मतदारसंघात काँग्रेसची संघटना अधिक मजबूत होत असल्याचे चित्र आहे. औदुंबर...