*जि.प.पंस स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका संपल्या! आता लक्ष देवणी नगरपंचायतीकडे...?* -------------------- *देवणी* : जिल्हा परिषद पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका नुकत्याच संपल्याआहेत या निवडणुकीत सर्वच पक्षाने आपली प्रतिष्ठा पणाला लागली देवणी तालुक्यात तीन गट व सहागणपैकी दोन जिल्हा परिषद गटात भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व कायम राखले तर एका गटात काँग्रेस पक्षाने आपले वर्चस्व सिद्ध केलं पंचायत समिती गणात भारतीय जनता पक्ष(4 ) काँग्रेस( 1 )व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (1) अजितदादा पक्षाने बाजी मारली देवणी पंचायत समिती भाजपाच्या ताब्यात ठेवण्यात यश मिळाले आहे येत्या आठ नऊ महिण्यात देवणी नगर पंचायतीची मुद्दत संपतअसून निवडणूक कार्यक्रम लागणार आहे भाजपाला मिळालेलं यश पाहून देवणी नगर पंचायतीसाठी कार्यकर्ते यांनी मोर्चा बांधणी चालू केली आहे देवणी नगर पंचायतीचे नगराध्यक्ष पद हे खुल्या प्रवर्गातील पुरुषांसाठी आरक्षित झालेआहे सदर निवडणुक ही जनतेतून असल्यामुळे नगराध्यक्ष हा लोकांतून निवडला जाणार आहे त्यामुळे ही निवडणूक अतिशय चूरशीची होणार आहेत सर्वच समाजात ...