*लोकाभिमुख कामशैली, नवकल्पनांचा वेध आणि संवेदनशीलतेतून घडलेली प्रशासनाची नवी ओळख - सागर वरंडेकर* देवणी तालुक्यातील प्रशासनात अल्पावधीतच आपली वेगळी ओळख निर्माण करणारे गटविकास अधिकारी सागर सुरेश वरंडेकर हे नाव आज सर्वसामान्यांच्या विश्वासाचे केंद्र बनले आहे. कार्यतत्परता, लोकाभिमुख दृष्टिकोन आणि संवेदनशीलतेच्या बळावर त्यांनी प्रशासनाला गतिमान करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा तालुक्यातील पळसंबे या गावात शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या सागर वरंडेकर यांनी ग्रामीण पार्श्वभूमीतून पुढे येत 2021 मध्ये MPSC नागरी सेवेतून गटविकास अधिकारी पद मिळवले. स्पर्धा परीक्षेच्या काळात त्यांच्या कुटुंबाचा विशेषतः लहान भावाचा मिळालेला पाठिंबा त्यांच्या यशामागे महत्त्वाचा ठरला. कार्यक्षेत्रात आल्यानंतर त्यांनी “संवाद आणि समन्वय” या सूत्रावर भर देत प्रशासनात काम करण्याची नवी दिशा दिली. कर्मचाऱ्यांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करून काम करून घेणे आणि जनतेच्या समस्या थेट ऐकून त्यांचे निराकरण करणे ही त्यांची खास शैली ठरली आहे. त्यांच्या कार्यकाळात अनेक उल्लेखनीय कामे ...