*ग्रामीण भागात शिक्षणाचा विस्तार करणारे : प्राचार्य मनोहर पवार* ---------------------------------------- सोमठाणा ता. नायगाव जि. नांदेड या छोट्याशा गावात अतिशय गरीब कुटुंबात सामाजिक अस्तित्व नाकारलेल्या समाजात जन्माला आलेले मनोहर पवार यांनी पराकोटीची जिद्द,चिकाटी व अपार मेहनतीच्या बळावर अगदी वयाच्या 24 व्या वर्षी आपल्या गावात अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये शैक्षणिक संस्था सुरु करून शैक्षणिक चळवळ वाढीस नेली. परिणामी ग्रामीण भागातील विद्यार्थी शिकून सवरून आपल्या पायावर उभी राहिली.ग्रामीण भागात शिक्षणाचा विस्तार करणारे प्राचार्य मनोहर पवार यांचा आज 62 वा वाढदिवस. त्यानिमित्ताने त्यांचा थोडक्यात परिचय देणारा हा लेख... मनोहर कलावतीबाई पुंडलिकराव पवार यांचा जन्म दि. 1 जून 1964 रोजी सोमठाणा ता. नायगाव येथे एका गरीब कुटुंबात झाला. घरची परिस्थिती अतिशय हलाखीची असतानाही केवळ जिद्द चिकाटीने त्यांनी शिक्षण घेतले. त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोमठाणा, माध्यमिक शिक्षण यशवंत हायस्कूल उमरी व महाविद्यालयीन शिक्षण नांदेड य...