मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जि. प. शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी मी सदैव प्रयत्नशील : जि. प. सदस्य डॉ. सोमवंशी

*जि. प. शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी मी सदैव प्रयत्नशील : जि. प. सदस्य डॉ. सोमवंशी* ------------------------------------ उदगीर / प्रतिनिधी : ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी मी सदैव प्रयत्नशील राहणार असल्याचे मत निडेबन जिल्हा परिषद गटाचे सदस्य डॉ. दिपक सोमवंशी यांनी व्यक्त केले. ते निडेबन गटात येणाऱ्या तोंडचिर येथील पी. एम. श्री. जिल्हा परिषद शाळेत शाळाभेटी दरम्यान बोलत होते. यावेळी सरपंच प्र. सुदर्शन पाटील यांचेसह शाळेतील शिक्षकांची उपस्थिती होती.     या भेटीदरम्यान त्यांनी शाळेतील शिक्षक, शिक्षिका व विद्यार्थ्याशी मुक्त संवाद साधत त्यातून त्यांच्या अडिअडचणी जाणून घेतल्या. शिक्षक विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यानंतर शाळेतील एका विद्यार्थिनीने राखी पौर्णिमेचे औचित्य साधून जि. प. सदस्य डॉ. दिपक सोमवंशी यांना राखी बांधून आपल्या सण व संस्कृतीचे दर्शन घडवून दिले.मुक्त संवादानंतर डॉ. सोमवंशी यांनी जिल्हा परिषद शाळांना पुरेशा सुविधा उपलब्ध करून देवून दर्जेदार व गुणवतापूर्ण शिक्षण देण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगित...

*शिक्षण व सामाजिक कार्यातील अग्रेसर व्यक्तीमत्व : श्री. भूकेवाड डी. एन*

शिक्षण व सामाजिक कार्यातील अग्रेसर व्यक्तीमत्व : श्री. भूकेवाड डी. एन* ----------------------------------------     ध्येयाने प्रेरीत होवून कार्य करणारे अनेक मुख्याध्यापक शाळा आणि विद्यार्थी यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. विविध उपक्रम व योजना राबवत विद्यार्थी आणि शाळेचा विकास साधण्यात ते यशस्वी होत असतात. असेच एक मुख्याध्यापक श्री. भूकेवाड दत्तात्रय नारायणराव हे शिक्षण आणि सामाजिक कार्यात सतत अग्रेसर असतात. उत्कृष्ट अशी शैक्षणिक सेवा देत हजारो विद्यार्थी घडवून सेवेतून निवृत्त झाले. एक त्यांचा वाढदिवस त्यानिमित्ताने त्यांचा थोडक्यात परिचय देणारा हा लेख....      श्री. भूकेवाड दत्तात्रय नारायणराव यांचा जन्म दि.१२ ऑगस्ट १९६६ रोजी सावरगांव ता.देवणी जि. लातूर येथे एका सामान्य शेतकरी कुटूंबात झाला, त्यांचे वडील निरक्षर शेतकरी पण आजी राधाबाई डोपेवाड यांच्या प्रेरणेने सर शिक्षणाकडे वळले. त्यांचे प्राथमिक ते माध्यमिक पर्यंतचे शिक्षण जि.प. कें.प्रा. शाळा सावरगांव व उद्देश्वर विद्यालय सावरगांव येथे झाले. उच्च माध्यमिक शिक्षण शिवाजी महाविद्...

*आ. बस्वराजजी पाटील यांच्या पारिवारिक सत्काराचे आयोजन*

आ. बस्वराजजी पाटील यांच्या पारिवारिक सत्काराचे आयोजन*  ------------------------------------ उदगीर / प्रतिनिधी : माजी राज्यमंत्री तथा विधान परिषद सदस्य आ. बस्वराजजी पाटील मुरूमकर यांच्या पारिवारिक सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे.      या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे माजी मंत्री आ. संजयजी बनसोडे हे राहणार असून या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून औसाचे आ. अभिमन्यू पवार, मुरूमचे नगराध्यक्ष श्री. बापूरावजी पाटील, उमरगा जनता बँकेचे चेअरमन श्री. शरणजी पाटील व उदगीरच्या नगरध्यक्षा सौ. स्वाती हुडे यांची उपस्थिती राहणार आहे. सोमवारी दि. 10 ऑगस्ट रोजी सकाळी 11वा. येथील यशवंत दाल मिल, बिदर रोड या ठिकाणी संपन्न होणाऱ्या या पारिवारिक सत्कार सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक श्री. दिगंबरराव यशवंतराव बिरादार माळेवाडीकर, मधुमेह तज्ञ तथा उदगीर नगर परिषदेचे स्वीकृत नगरसेवक डॉ. बालाजी बिरादार, युवा उद्योजक श्री.दत्ता बिरादार यांनी केले आहे.

डोळस आणि चिंतनशील कवी : शंकर बोईनवाड

डोळस आणि चिंतनशील कवी : शंकर बोईनवाड ------------------‐-‐------------------ कवी आणि साहित्यिक हे समाजाचे जागृत डोळे असतात. आपल्या लेखणीच्या सामर्थ्याने ते समाजातील भावना, विचार, संस्कृती आणि जीवनमूल्ये यांचे जतन करतात. त्यांच्या शब्दांतून माणसाच्या सुख-दुःखाचे, आशा-आकांक्षांचे आणि संघर्षांचे चित्र जिवंत होते. कवीच्या संवेदनशील मनाला निसर्ग, माणुसकी आणि जीवनातील विविध अनुभवांची सुंदर जाण असते. तो आपल्या कवितांमधून समाजाला विचार करायला लावतो, तर साहित्यिक आपल्या कथा, कादंबऱ्या, निबंध आणि लेखांच्या माध्यमातून समाजाला दिशा देतो. त्यांच्या साहित्यकृती केवळ मनोरंजन करत नाहीत, तर वाचकांच्या मनात संस्कार, प्रेरणा आणि सकारात्मक विचार मांडतात अशा नामावलीत शंकर बोईनवाड यांचे नाव अग्रक्रमावर घ्यावे लागेल. बोईनवाड हे केवळ एक व्यक्तिमत्त्व नसून स्वतंत्र विचारांची एक समृद्ध संस्कृती आहे. त्यांनी नायगावमध्ये साहित्याचे नवे आयाम निर्माण केले. विविध सांस्कृतिक चळवळींमध्ये सक्रिय सहभाग घेऊन नायगावच्या साहित्यिक वातावरणाला समृद्ध करण्यासाठी त्यांनी केलेले योगदान अत्यंत प्रशंसनीय आहे. दैन...

महात्मा पब्लिक स्कूलची यशस्वी वाटचाल; दहाव्या वर्षात पदार्पण

महात्मा पब्लिक स्कूलची यशस्वी वाटचाल; दहाव्या वर्षात पदार्पण उदगीर : नाईक चौक, देगलूर रोड येथील ए-मार्टच्या शेजारी स्थित महात्मा पब्लिक स्कूलने यशस्वी शैक्षणिक वाटचालीची नऊ वर्षे पूर्ण करून आता दहाव्या वर्षात पदार्पण केले आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण, संस्कारमूल्ये आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देत शाळेने अल्पावधीतच पालकांचा विश्वास संपादन केला आहे. सन २०१७ मध्ये स्वामी विवेकानंद ग्रामसेवा प्रतिष्ठान, उदगीर अंतर्गत संचालक दीपक पाटील नेत्रगावे व सौ. संगीता नेत्रगावे यांनी महात्मा पब्लिक स्कूलची स्थापना केली. सुरुवातीला प्ले ग्रुप, नर्सरी, एलकेजी व यूकेजीच्या अवघ्या ३० विद्यार्थ्यांसह आणि सहा शिक्षकांच्या सहकार्याने सुरू झालेली ही शाळा आज ११० विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली असून सात शिक्षक विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य करीत आहेत. शाळेत विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासोबतच शिस्त, संस्कार, आत्मविश्वास आणि स्पर्धात्मकतेचे धडे दिले जातात. लहान वयापासून विद्यार्थ्यांमध्ये बौद्धिक विकास घडावा यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. नियमित अभ्यासक्रमासोबतच विविध स्पर्ध...

*निळकंठ इंग्लिश स्कूलचे 11 व्या वर्षात यशस्वी पदार्पण*

*निळकंठ इंग्लिश स्कूलचे 11 व्या वर्षात यशस्वी पदार्पण* ---------------------------------------      उदगीर येथील भगीरथी मंगल कार्यालयाजवळ, डॅम रोड वर स्थित असलेले निळकंठ इंग्लिश स्कूल हे दहा वर्षे पूर्ण करून अकराव्या वर्षात पदार्पण करीत आहे. श्रीमती नीलम्मा मेमोरियल शैक्षणिक संस्था संचलित निळकंठ इंग्लिश स्कूल ही नर्सरी ते आठवी पर्यंत चालणारी शाळा विविध गुणवता व विविध उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा परिपूर्ण विकास साधत आहे. या शाळेचा थोडक्यात आढावा घेणारा हा लेख...        2016 मध्ये संस्थेचे अध्यक्ष श्री. बस्वराज कंटय्या स्वामी आणि सचिव श्री. दिनेश शांतवीर स्वामी यांनी सुरुवातीच्या काळात श्री. माणिक तेलंग, संत कबीर नगर येथे निळकंठ इंग्लिश स्कूलची सुरुवात केली. शाळेच्या प्राचार्या सौ. जयश्री बस्वराज स्वामी यांचेही शाळेसाठी मोठे योगदान आहे. सुरुवातीच्या काळात 45 विद्यार्थी संख्येपासून सुरु झालेली ही शाळा आणि चार शिक्षक शिकवणीला होते. दहा वर्षामध्ये शाळेचा आलेख वाढत गेला आणि आजघडीला या शाळेत 300 पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेतात तर त...

*न्यायप्रिय, तत्वनिष्ठ आणि सामाजिक जाण व भान असणारे एक संयमी संघर्षशील व्यक्तिमत्व : प्राचार्य एकनाथ पाटोदेकर*

*न्यायप्रिय, तत्वनिष्ठ आणि सामाजिक जाण व भान असणारे एक संयमी संघर्षशील व्यक्तिमत्व : प्राचार्य एकनाथ पाटोदेकर* ---------------------------------------     माणसाच्या जीवनात त्याला वेळोवेळी संघर्ष करावा लागतो. दुःखाच्या, अडचणीच्या तसेच उणीवांच्या झळा सोसून देखील आपल्या विचाराशी व तत्वाशी कधीही तडजोड न करता संकटाशी दोन हात करण्याची जिद्द बाळगून जीवनात संघर्ष करावा लागतो. ही शिकवण अंगीकारूण, आपण नेहमीच इतराच्या कामी यावे. संकटकाळी, गरजेच्यावेळी इतरांसाठी धावून जावे. असा वसा घेवून जीवन जगणारी माणसं दुर्मिळच... काही माणसं अशीच भावना उराशी बाळगून जीवन जगत असतात. त्यापैकीच प्राचार्य एकनाथ पाटोदेकर हे एक नाव...        प्राचार्य एकनाथ दत्तराम पाटोदेकर हे माध्यमिक आश्रमशाळा व उच्च माध्यमिक विदयालय कुंटूर तांडा येथे जवळपास 32 वर्षे सेवा करून सेवानिवृत्त झाले आहेत. धर्माबाद तालुक्यातील पाटोदा (थडी ) सारख्या लहानशा खेड्यात त्यांचा जन्म दि. 1 जून 1965 रोजी झाला.. गावातच प्राथमिक शिक्षण संपल्यानंतर माध्यमिक शिक्षणासाठी त्यांनी कुंडलवाडी येथे पायी येणे - जाणे कर...

*ग्रामीण भागात शिक्षणाचा विस्तार करणारे : प्राचार्य मनोहर पवार*

*ग्रामीण भागात शिक्षणाचा विस्तार करणारे : प्राचार्य मनोहर पवार* ----------------------------------------       सोमठाणा ता. नायगाव जि. नांदेड या छोट्याशा गावात अतिशय गरीब कुटुंबात सामाजिक अस्तित्व नाकारलेल्या समाजात जन्माला आलेले मनोहर पवार यांनी पराकोटीची जिद्द,चिकाटी व अपार मेहनतीच्या बळावर अगदी वयाच्या 24 व्या वर्षी आपल्या गावात अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये शैक्षणिक संस्था सुरु करून शैक्षणिक चळवळ वाढीस नेली. परिणामी ग्रामीण भागातील विद्यार्थी शिकून सवरून आपल्या पायावर उभी राहिली.ग्रामीण भागात शिक्षणाचा विस्तार करणारे प्राचार्य मनोहर पवार यांचा आज 62 वा वाढदिवस. त्यानिमित्ताने त्यांचा थोडक्यात परिचय देणारा हा लेख...        मनोहर कलावतीबाई पुंडलिकराव पवार यांचा जन्म दि. 1 जून 1964 रोजी सोमठाणा ता. नायगाव येथे एका गरीब कुटुंबात झाला. घरची परिस्थिती अतिशय हलाखीची असतानाही केवळ जिद्द चिकाटीने त्यांनी शिक्षण घेतले. त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोमठाणा, माध्यमिक शिक्षण यशवंत हायस्कूल उमरी व महाविद्यालयीन शिक्षण नांदेड य...

*टी. एस. कल्लूरकर ( दादा ) एक* *आधारस्तंभ*

*टी. एस. कल्लूरकर ( दादा ) एक* *आधारस्तंभ*  --------------------------------------           बालाघाट पर्वतरांगेच्या पायथ्याशी वसलेल्या कल्लूर ता. उदगीर जि. लातूर येथील एका सामान्य कुटुंबातील पिता संग्रामबाबा व माता द्रौपदाबाई यांच्या पोटी दि. 01: 06: 1947 रोजी एक पुत्ररत्न जन्मास आले.त्या पुत्राचे नाव तुकाराम असे ठेवण्यात आले. वडिलांना बाबा तर आईला माय असे म्हणत असत. गाव लहान असल्याने कल्लूर येथे दुसरीपर्यंतच शाळा होती. तीही विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भरत असे. वडिलांचा सुतारकीचा व्यवसाय होता. म्हणून पंचक्रोशीत बाबांना संग्रामबाबा या नावानेच ओळखले जात असे. माय पहाटे लवकर उठून जात्यावर दळण दळत असे. माय ज्वारी दळत असताना स्वतःच रचलेल्या ओव्या म्हणत असे. मायने अनेक ओव्या रचलेल्या होत्या पण कोणीही या ओव्यांचा संग्रह करून ठेवले नाही. याची खंत प्रत्येकांना वाटते.अशा कठीण प्रसंगी त्यांनी आपल्या दोन मुलांना व एका मुलीला शिक्षण दिले. माय व बाबा अशिक्षित होते पण आपल्या मुलांनी खूप शिकून मोठी सरकारी नोकरी करावी असे वाटे. बाबा म्हणत, " तुला काय पाहिजे ते माग पण...

*किरण बापूरे यांच्या ‘दिलकश रुबाईयां’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन‘*

*किरण बापूरे यांच्या ‘दिलकश रुबाईयां’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन‘* उदगीर : येथील बिदर गेट परिसरातील हॉटेल आनंद येथे कवी हावगीराव उर्फ किरण बापूरे लिखित ‘दिलकश रुबाईयां’ या हिंदी काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. आनंदी मॉर्निंग ग्रुप आणि जयवंतराव पाटील ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सोहळ्यास साहित्य, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी गट शिक्षण अधिकारी के. आर. शिंदे होते. प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूरचे माजी विस्तार शिक्षण संचालक डॉ. अनिल भिकाने, ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक शंकर बोईनवाड, जमहूर ज्युनियर कॉलेजचे प्रा. महेमूद अली जहागिरदार तसेच आनंदी गुड मॉर्निंग ग्रुपचे अध्यक्ष शरद कुलकर्णी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी कवी किरण बापूरे यांचा काव्यसंग्रह प्रकाशित झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. तसेच ज्येष्ठ कला शिक्षक, पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते श्रीधर दिगंबर जाधव यांना “राज्य आदर्श महाराष्ट्र रत्न पुरस्कार २०२६” जाहीर झाल्याबद्दल ग...

*शिष्यवृत्ती परीक्षेत निळकंठ इंग्लिश स्कूलचे यश*

*शिष्यवृत्ती परीक्षेत निळकंठ इंग्लिश स्कूलचे यश*  ---------------------------------------  उदगीर/ प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत निळकंठ इंग्लिश स्कूल, डॅम रोड उदगीर विद्यालयाचे प्रज्ञा स्वप्निल शृंगारे व मनुश्री उद्धव चामवाड ही विद्यार्थी पात्र ठरले आहेत. या  विद्यार्थ्यांना सहशिक्षक साधना बेंबळगे, दत्ता गुरदाळकर, शुभम उदगीरकर, प्रीती चिल्लरगे, नंदिनी वाडकर यांनी मार्गदर्शन केले. गुणवंत विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्था अध्यक्ष प्रो. बसवराज स्वामी, मुख्याध्यापिका जयश्री बी. एस. यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले. या गुणवंताचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

बालाजी रेड्डी यांच्यामुळे शिवसेनेला गती मिळाली - स्वप्नील अण्णा जाधव

बालाजी रेड्डी यांच्यामुळे शिवसेनेला गती मिळाली - स्वप्नील अण्णा जाधव  उदगीर (प्रतिनिधी )  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला गतिमान करण्यासाठी आणि संघटन उभारण्यासाठी जिल्हाप्रमुख बालाजी भाऊ रेड्डी यांनी घेतलेले परिश्रम आणि त्यांनी संघटन कुशल नेतृत्व दाखवत सर्व शिवसैनिकांना सोबत घेऊन, "गाव तिथे शिवसेना आणि घर तेथे शिवसैनिक" मोहीम राबवल्यामुळे लातूर जिल्ह्यात प्रामुख्याने ग्रामीण भागात शिवसेनेने चांगलेच बाळसे धरले आहे. असे विचार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उदगीर जळकोट विधानसभा प्रमुख स्वप्निल (अण्णा) अनिल जाधव यांनी व्यक्त केले.  बालाजी भाऊ रेड्डी यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून स्वप्नील अण्णा जाधव यांच्या मित्र परिवाराकडून बालाजी रेड्डी सत्कार आयोजित करण्यात आला. या सत्कार प्रसंगी बालाजी रेड्डी यांना अभिष्टचिंतन करतानाच स्वप्निल अण्णा जाधव यांनी बालाजी रेड्डी यांनी ग्रामीण भागामध्ये शिवसेनेसाठी किती कष्ट घेतले, आणि संघटन उभारणीसाठी त्यांनी केलेल्या एकूण कार्याचा आढावा घेतला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला पुन्हा बळ देण्यासाठी सर्व शिवसैनिक...

सामाजिक जाणीवा जोपासणारे प्रशासकीय अधिकारी : श्री. प्रवीणजी फुलारी

सामाजिक जाणीवा जोपासणारे प्रशासकीय अधिकारी : श्री. प्रवीणजी फुलारी  ---------------------------------------     सामान्य कुटुंबातून जिद्द आणि परिश्रमाच्या बळावर मोठ्या हुद्द्यावर गेलेली लोकं सामाजिक जाण, भान जोपासत सामाजिक दायित्व स्वीकारून गोरगरिबांसाठी कामे करणारी फार कमी लोकं आहेत. त्यापैकीच छ. संभाजीनगर चे जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. प्रवीणजी फुलारी हे एक. एका शिक्षकाचा मुलगा वडिलांचे शिस्त, क्षमता आणि कर्तृत्वाची जाणीव ठेवून संस्कार घेवून प्रशासनात सामान्य, गोरगरीब यांना केंद्रबिंदू मानून त्यांच्या प्रगतीसाठी प्रयत्न केले. श्री. प्रवीणजी फुलारी साहेबांचा आज वाढदिवस त्यानिमित्ताने त्यांनी प्रशासनात राहून प्रामाणिक सेवा जोपासली त्यांचा थोडक्यात परिचय देणारा हा लेख...श्री. प्रविण बाबुराव फुलारी यांचा जन्म नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील माळाकोळी येथे एका सामान्य कुटुंबात झाला. साहेबाचे वडील श्री. बाबुराव फुलारी हे शिक्षक होते त्यामुळे शिस्तीचे, संस्काराचे व अध्यात्मचे धडे त्यांना वडिलांकडूनच मिळाले. त्या बळावरच फुलारी साहेबांनी प्रशासनात आपली यशस्वी वाटचा...

शंकर बोईनवाड यांच्या पुस्तकास राज्यस्तरीय बालसाहित्य पुरस्कार जाहीर

शंकर बोईनवाड यांच्या पुस्तकास राज्यस्तरीय बालसाहित्य पुरस्कार जाहीर ---------------------------------------- उदगीर / प्रतिनिधी : येथील साहित्यिक तथा पत्रकार शंकर बोईनवाड यांच्या आदर्श नगरीचा राजू या किशोर कादंबरीस ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रसूल सोलापुरे बहुउद्देशीय संस्था महागाव ता. गडहिंग्लज जि. कोल्हापूर चा राज्यस्तरीय बालसाहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे.एका विशेष कार्यक्रमात हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.    गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने लिखाण करणाऱ्या शंकर बोईनवाड यांचा " चिव चिव चिमणी " व " कोल्हेवाडीचा बाजार " ही दोन बालकवीतासंग्रह व "आदर्श नगरीचा राजू " ही किशोर कादंबरी, " परिसस्पर्श ", शैक्षणिक सेवेचा दिपस्तंभ " ही दोन संपादित अशी पाच पुस्तके प्रकाशीत आहेत. त्यांच्या साहित्य कृतीला परिवर्तन साहित्य संस्था नळदुर्ग ता. तुळजापूर जि. धाराशिवचा परिवर्तन राज्यस्तरीय पुरस्कार, श्री. जयभवानी भक्तगण व सांस्कृतिक कला मंडळ रांझणी ता. पंढरपूर जि. सोलापूरचा राज्यस्तरीय गुणगौरव पुरस्कार, संत गाडगेबाबा विचारमंच ओतूर त...
लोकवैभव ई-पेपर -दिवाळी अंक २०२६ आजचा पूर्ण अंक खालील विंडोमध्ये वाचा किंवा डाऊनलोड करा. पेपर डाऊनलोड करा

*कै. रसिका महाविद्यालयाच्या कु. निकिता कांबळे खेळाडूंची लातूर जिल्हा पोलीस दलात निवड*

देवणी             कै. रसिका महाविद्यालय देवणी येथील बीएससी तृतीय वर्षात शिक्षण घेत असलेली विद्यार्थिनी निकिता कांबळेची लातूर जिल्हा पोलीस दलात निवड झाली आहे. त्याच्या यशा बद्दल संस्था अध्यक्ष. मा.श्री गोविंदरावजी भोपणीकर साहेब त्यांच्या शुभहस्ते निकिता कांबळेचा  सत्कार करण्यात आला. यावेळी  संस्थासचिव मा. श्री. गजाननजी भोपणीकर साहेब  महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. शिवाजी सोनटक्के, क्रीडा संचालक प्रा.डॉ. सचिन चामले उपस्थित होते. तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी निकिता कांबळेचे  अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

“कसाईखाने जा रही गायों को जीवनदान… देवनी की जानकी गौशाला में 250+ गौवंश की सेवा; रोज़ 30 हजार खर्च, फिर भी सेवा जारी!”

“कसाईखाने जा रही गायों को जीवनदान… देवनी की जानकी गौशाला में 250+ गौवंश की सेवा; रोज़ 30 हजार खर्च, फिर भी सेवा जारी!” बिना सरकारी अनुदान के खड़ी सेवा—रवींद्र महाराज देवणीकर की मानवता को समर्पित जीवन साधना देवनी (जिला लातूर) के ग्रामीण क्षेत्र में खड़ा एक कार्य आज मानवता का सच्चा अर्थ बता रहा है। रवींद्र महाराज देवणीकर द्वारा स्थापित जानकी गौशाला केवल गायों की देखभाल करने की जगह नहीं है, बल्कि यह सेवा, त्याग और करुणा का जीवंत उदाहरण बन चुकी है। इस गौशाला में वर्तमान में 250 से अधिक गौवंश का पालन-पोषण किया जा रहा है। हर एक गाय के पीछे एक दर्दभरी कहानी छिपी है—कोई दुर्घटनाग्रस्त, कोई बीमार, तो कोई मालिक द्वारा छोड़ दी गई। ऐसे सभी गौवंश को यहाँ नया जीवन मिलता है।इस सेवा का सबसे महत्वपूर्ण पहलू यह है कि कसाईखाने ले जाई जा रही गायों को बचाने का काम लगातार किया जा रहा है। गौभक्तों की मदद से और न्यायालयीन प्रक्रिया के माध्यम से कई गायों को बचाकर यहाँ लाया जाता है। यही कारण है कि रोज़ाना दो से चार गायों की संख्या बढ़ती जा रही है। मौत के मुंह से वापस लाई गई इन गायों को यहाँ केवल भोज...

शेकापूरच्या व्यंकटराव पांचाळ यांचा पुण्यामध्ये सन्मान

शेकापूरच्या व्यंकटराव पांचाळ यांचा पुण्यामध्ये सन्मान  --------------------------------------- उदगीर / प्रतिनिधी : तालुक्यातील शेकापूर येथील पेंटर, चित्रकार श्री. व्यंकटराव पांचाळ यांचा पुणे जिल्ह्यातील अनेक ठिकाणच्या जिल्हा परिषद शाळेवर सत्कार करण्यात आला. मुंबईच्या एका संस्थेच्या वतीने शाळा रंगरंगोटी व प्रासंगिक, समर्पक चित्र रेखाटल्याबद्दल उत्कृष्ट अशा शाळांकडून त्यांचा सन्मान करण्यात आला.    माणूस कुठे जन्मावा हे त्याच्या हातात जरी नसले तरी तो आपल्या कर्तृत्वावर सर्वदूर पोहचू शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे शेकापूर येथील पेंटर व्यंकटराव पांचाळ. गेल्या काही दशकापासून उदगीर, लातूर जिल्हा व जवळपास मराठवाड्यातील अनेक जिल्हा परिषद शाळांच्या आपल्या कुंचल्यातून त्यांनी भिंती बोलक्या केल्या. उदगीर येथील अनेक शाळा व नगर परिषदेच्या वतीने त्यांनी रंगरंगोटी व चित्र रेखाटले. सांगली, सातारा, पुणे, कोल्हापूर, बुलढाणा अशा अनेक ठिकाणच्या जिल्हा परिषद शाळा रंगवण्याचे त्यांनी काम केले. हे करीत असतानाच त्यांनी मुंबई येथील जग्गवार लॅन्ड रोव्हर इंडिया लि. मुंबई माता बाल संगोपन ...

*लोकाभिमुख कामशैली, नवकल्पनांचा वेध आणि संवेदनशीलतेतून घडलेली प्रशासनाची नवी ओळख - सागर वरंडेकर

*लोकाभिमुख कामशैली, नवकल्पनांचा वेध आणि संवेदनशीलतेतून घडलेली प्रशासनाची नवी ओळख - सागर वरंडेकर*  देवणी तालुक्यातील प्रशासनात अल्पावधीतच आपली वेगळी ओळख निर्माण करणारे गटविकास अधिकारी सागर सुरेश वरंडेकर हे नाव आज सर्वसामान्यांच्या विश्वासाचे केंद्र बनले आहे. कार्यतत्परता, लोकाभिमुख दृष्टिकोन आणि संवेदनशीलतेच्या बळावर त्यांनी प्रशासनाला गतिमान करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा तालुक्यातील पळसंबे या गावात शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या सागर वरंडेकर यांनी ग्रामीण पार्श्वभूमीतून पुढे येत 2021 मध्ये MPSC नागरी सेवेतून गटविकास अधिकारी पद मिळवले. स्पर्धा परीक्षेच्या काळात त्यांच्या कुटुंबाचा विशेषतः लहान भावाचा मिळालेला पाठिंबा त्यांच्या यशामागे महत्त्वाचा ठरला. कार्यक्षेत्रात आल्यानंतर त्यांनी “संवाद आणि समन्वय” या सूत्रावर भर देत प्रशासनात काम करण्याची नवी दिशा दिली. कर्मचाऱ्यांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करून काम करून घेणे आणि जनतेच्या समस्या थेट ऐकून त्यांचे निराकरण करणे ही त्यांची खास शैली ठरली आहे. त्यांच्या कार्यकाळात अनेक उल्लेखनीय कामे ...

*देवणीत सेवाकुंड ट्रस्ट च्या वतीने इफ्तार पार्टी संपन्न ; सामाजिक एकात्मतेचा संदेश* *देविदास पतंगे यांचा उपक्रम; मान्यवरांची उपस्थिती*

*देवणीत सेवाकुंड ट्रस्ट च्या वतीने इफ्तार पार्टी संपन्न ; सामाजिक एकात्मतेचा संदेश*  *देविदास पतंगे यांचा उपक्रम; मान्यवरांची उपस्थिती* ---------------------- *देवणी*: शहरातील जमा मस्जिद येथे रमजान ईदच्या निमित्ताने दि. १७ मार्च २०२६ रोजी सेवाकुंड सामाजिक ट्रस्टच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून सामाजिक ऐक्य व बंधुभावाचा संदेश दिला. या इफ्तार पार्टीचे आयोजन माजी सरपंच देविदास पतंगे यांच्या पुढाकारातून करण्यात आले होते. या उपक्रमासाठी राजेंद्र संगेकर व पप्पू सूर्यवंशी यांनी संयोजक म्हणून महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडली. कार्यक्रमास अभय साळुंखे (जिल्हाध्यक्ष, काँग्रेस), नागेश जीवने (माजी बांधकाम सभापती, जि.प. लातूर), अजित माने (माजी सभापती, पंचायत समिती निलंगा), वैजनाथ लुले, बळीराम बिरादार, सोमनाथ लुल्ले, अमरनाथ मुर्के, सुनिल चिद्रेवार, रेवण मळभागे यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे सेवाकुंड ट्रस्टचा सामाजिक उपक्रम. डॉ. अनिलकुमार गायकवाड या...